Category Archives: सिंधुदुर्ग
पट्टेरी वाघ कि बिबट्या?
Fact Check: कोकणातील परुळे गावात सिंहाचा वावर? नेमके सत्य काय? – Kokanai https://t.co/Ac9j6XyUGr#fakenews #lion pic.twitter.com/11WjdCOVlM
— Kokanai Digital News Channel (@kokanai21) March 7, 2025




सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच एसटी महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार आहेत. यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमणवार यांची विधानभवनातील आपल्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली.
या बैठकीत जिल्ह्यातील एसटी सेवांबाबत आणि कारभाराबाबत चर्चा केली. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात मिनी बस सेवा सुरू करणे तातडीची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. या मागणीला एसटी महामंडळाच्या संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मिनी बस सेवा सुरू करण्याचे सांगितले.पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी जिल्ह्यातील काही बसस्थानके दुरावस्थेत असल्याचे ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या बसस्थानकांची तात्काळ डागडुजी करून सुशोभीकरण करण्याच्या सूचना ही पालकमंत्री यांनी दिल्या. गावा गावांचा संपर्क वाढविण्यासाठी बसेच्या फेऱ्यात वाढ करण्याच्या सूचना ही पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रिक्त असलेले विभाग नियंत्रक पद तात्काळ भरण्याच्या सूचना ही अधिकाऱ्यांना दिल्या.




सावंतवाडी : सावंतवाडी टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. रेल्वे मंत्र्यांना या मागणीच पत्र श्री. राणे यांनी दिलं आहे. याबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ने खासदार श्री. राणेंचे आभार मानले आहेत.
या निवेदनात खास. राणे यांनी म्हटले आहे की, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी कडून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कोकण रेल्वेवरील सावंतवाडी स्टेशन टर्मिनसचा विकास करण्याची विनंती केली आहे. सावंतवाडी हे हजारो लोक विशेषतः उत्सवाच्या काळात वापरणारे एक महत्त्वाचे स्थानक आहे. सावंतवाडीचा विकास कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी सर्वात उपयुक्त ठरेल. त्यामुळे या प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष घालून संबंधित संघटनेची विनंती स्वीकारण्याची, ती मान्य करण्याची सूचना द्या अशी मागणी खास. राणेंनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांच्याकडे केली आहे. याबाबत खास नारायण राणे यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून आभार मानले आहेत.
मुंबई: दोडामार्ग तालुक्यातील भेडशी खानयाळ गावची सुकन्या आणि सद्यस्थितीत मुंबई-दहिसर येथे स्थायिक असलेल्या साक्षी बंड्या गावडे हिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून दिनांक २८ फेब्रुवारी रोजी निवड झाली असून तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. साक्षी हिने मास मीडिया मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. इयत्ता सातवी पासून लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहे. तिचे वडील बंड्या गावडे यांना क्रिकेटची फार आवड. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिची यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये १६ आणि १९ वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिचा परफॉर्मन्स पाहून गोवा क्रिकेट अकॅडमीने तिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी ऑलराऊंडर म्हणून निवड केली आहे. सध्या ती गोवा येथे रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील अशोक नारायण परब (मांजरेकर) यांची ती नात असून रणजी संघामध्ये झालेल्या निवडीबद्दल तिच्या मामेगावी कलंबिस्त येथे तिचे कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत, निलेश पास्ते, अशोक राऊळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.




सिंधुदुर्ग: दोडामार्ग तालुक्यातील अडाळी – खालची वाडी येथील १३ वर्षे वय असलेल्या कु. वंशिका विष्णु सावंत हिचे आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे तातडीने यकृत प्रत्यारोपणाची Liver Transplant गरज निर्माण झाली आहे. सध्या ती गोवा येथील बांभूळी येथील रुग्णालयात असून यकृत प्रत्यारोपण तसेच पुढील उपचारासाठी बंगलोर किंवा मुंबई येथे हलवावे लागणार आहे.
पुढील उपचार अत्यंत खर्चिक असून घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. तिचे आई वडील शेतीवर आपला उदरनिर्वाह करत आहेत. हाती असलेली काहीशी बचत आणि नातेवाईकांनी केलेली मदत आतापर्यंतच्या उपचारासाठी खर्ची झाली असून पुढील उपचारासाठी पैसे कसे उभे करावे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. त्यामुळे त्यांनी मुलीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी जमेल तेवढी मदत करावी असे आवाहन केले आहे.
मदत करण्यासाठी Gpay नंबर – 7588862507 (उदय कोठावळे, मुलीचा मामा)
संपर्क- 7588209887 (आरती विष्णु सावंत, मुलीची आई)
रुग्णालयाचे अहवाल आणि इतर कागदपत्रे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://drive.google.com/file/d/1Sg0QOusEVnGz8SSQxJwSgol09lD7OyQG/view?usp=sharing
https://drive.google.com/file/d/1pAbeV4K1ReUEASzQNJM9eQwTxkU0brgE/view?usp=sharing




वैभववाडी: वैभववाडी रेल्वे स्थानक येथे वैभववाडी रेल्वे कर्मचारीवृंद तर्फे काल सालाबादाप्रमाणे सत्यनारायण पूजा आणि शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात सर्वात मोठे आकर्षण ठरले ते सत्यनारायण पूजेच्या मखरासाठी केळीच्या खोडा आणि पानांपासून पूजेच्या मखरासाठी बनविण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा.
सावंतवाडीच्या निरवडे कोनापाल या गावातील आनंद यशवंत मेस्त्री या तरुणाने कल्पकतेने ही प्रतिमा साकारली होती. यापूर्वी त्याने अनेक ठिकाणी नावीन्यपूर्ण आणि आकर्षक मखर बनवले आहेत. त्याने श्री देव विठ्ठल, कोल्हापूरची महालक्ष्मी तसेच ईतर बर्याच कलाकृतींचे मखर बनवले आहेत आणि प्रशंसाही मिळवली आहे. एक छंद म्हणुन त्याने ही कला जोपासली आहे.
या उत्सवा दरम्यान दिवसभरात सत्यनारायण महापूजा, हळदीकुंकू आणि भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री ९ वाजता रेंबो फ्रेंड सर्कल, कवठणी प्रस्तुत “गावय” या दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती वैभववाडी रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी नारायण नाईक यांनी दिली.