Tag Archives: Ganesh Chaturthi 2023

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून साहित्य वाटपासाठी २५० भजनी मंडळाची निवड…. यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना साहित्य पुरविणे या जि. प. च्या योजनेची काल दिनांक ७ सप्टेंबर रोजी जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात याची सोडत काढण्यात आली. या सोडतीत तालुक्यातील गावांचे गट पाडून प्रत्येक गटातून चार मंडळाची निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील भजनी मंडळांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भजनी मंडळांना साहित्य पुरविणे ही योजना सुरू केली आहे. एक पखवाज, एक चकी आणि पाच टाळ असे साहित्य प्रत्येक निवड झालेल्या भजनी मंडळाला दिले जाणार आहे. यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली दरम्यान, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळांनी घ्यावा, यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जि. प. कडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला अनुसरून आतापर्यंत जि. प. कडे ३२०६ अर्ज प्राप्त झाले होते. एवढ्या मंडळांना साहित्य देणे शक्य नसल्याने विभागवार लकी ड्रॉ पद्धतीने मंडळांची निवड केली गेली.या लकी ड्रॉ पद्धतीत निवडलेल्या २५० मंडळांना याचा लाभ दिला जाणार आहे.

 

 

 

Loading

Ratnagiri: बस वाहतूकदारांकडून चाकरमान्यांची होणारी लूट थांबणार; मुंबई-पुण्यासाठी खाजगी बस वाहतुकीचे दरपत्रक जाहीर

रत्नागिरी: हंगामात खाजगी बस वाहतूकदारनकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या RTO राज्य परिवहन प्राधिकरणने पाउले उचलली आहेत. मुंबई-पुण्यासाठीच्या खाजगी बसेसचे दरपत्रक ठरवून देण्यात आले असुन बस वाहतूकदारांना या दरांच्या  ५०% जास्त भाडे आकारण्यास परवानगी दिली आहे. या दरांपेक्षा जर कोणी बस व्यावसायिक अतिरिक्त दर आकारत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमी अंतराला अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार हमखास घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने मुंबई,ठाणे आणि पुण्यासाठीच्या बसेसच्या भाड्याचे दरपत्रक ठरवून जाहीर केले आहे. या दरापेक्षा अधिक दर एखादा वाहतूकदार आकारत असल्यास त्याच्या विरोधात तक्रार 02352 – 225444 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर  नोंदविण्यात यावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. तक्रार नोंदविताना वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.

Loading

Mumbai Goa Highway | गणेशोत्सवात महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतुक पोलिसांची विशेष बैठक

नवी मुंबई : गणेशोत्सव काळात कोंकणातील गणेश भक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहचता यावे व गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी न होता हा सण निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आज अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली नवीमुंबई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

19 सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून चाकरमाने कोकणात मोठया संख्येने जातात. शासकीय सुट्टीला जोडून दि. 16 व 17 रोजी शनिवार व रविवार आल्याने महामार्ग क्र. 66 वरील वाहतुक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात या बैठकीत आले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी डेल्टा फोर्स व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविण्यात आली आहे. आवश्यक त्याठिकाणी सुचना फलक, रंबलर स्ट्रीप, गतीरोधक फलक, वाहतुक नियंत्रण सुचना फलक आदि लावण्यात आले आहेत अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे 

तसेच राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या विविध अपघातात मदत करणाऱ्या मृत्युंजय दूतांचा अपर पोलीस महासंचालक(वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search