Tag Archives: Kokan

सिंधुदुर्ग – कुडाळ येथे डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी वर विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्ग : कुडाळ आणि रत्नागिरी येथे फणस प्रक्रिया प्रशिक्षण च्या यशस्वी आयोजनानंतर मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी असलेल्या डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी वर विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे करण्यात आले आहे.

22-23-24 जुलै रोजी हे प्रशिक्षण कुडाळ येथील दुर्वांकुर सभागृहात संपन्न होणार आहे.

फळं, फुलं, भाज्या, मसाल्याचे पदार्थ, हंगामी पीके, मासे अशा अनेक वस्तू डिहायड्रेशन पद्धतीने कशा तयार करायच्या याचं सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षणात दिले जाणार आहे.

तंत्र एक आणि उद्योगाचे मंत्र अनेक असं डिहायड्रेशनचं महत्व असून आंबा, काजू, फणस, डाळिंब, चिकू, कोकम, नारळ, कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, कडिपत्ता, शेवगा, भोपळा अशा अनेक वस्तूंपासून विविध उत्पादने तयार करता येतात.

या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी कृपया 8767473919 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे करण्यात आलेले आहे.

निसर्गसंपन्न असलेलं कोकण नानाविध फळं, फुलं, भाज्या, औषधी वनस्पती, मासे आणि इतर अनेक गोष्टींनी समृद्ध आहे.अशा या वैभवशाली कोकणातील स्थानिक लोकांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरित करणे, त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देणे, व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, विविध उद्योग संधी कडे त्यांचे लक्ष वेधणे आणि त्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी सातत्याने प्रयत्न करत आहे.

Loading

सर्व यंत्रणांचे आपत्ती व्यवस्थापन नियोजन चांगले – पालक सचिव वल्सा नायर-सिंह

जिल्ह्यात सद्या पावसाचा रेड अलर्ट असल्याच्या पार्श्वभूमीवर पालक सचिव श्रीमती नायर-सिंह यांनी आज सर्व विभागांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली होती.

सर्व यंत्रणांचे आपत्ती व्यवस्थापन नियोजन आहे आणि जिवितहानी होणार नाही ही आपली जबाबदारी आहे असे त्या म्हणाल्या.

 

दरड प्रवण भागात विशेष खबरदारी घ्या. साधन सामग्री, त्यांची सुस्थिती, त्यांचे इंधन याची चोख व्यवस्था करा. सद्यस्थितीत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. सामाजिक संस्थांची यादी संपर्कासाठी तयार ठेवा. असे त्या पुढे म्हणाल्या.

प्रत्येक जिल्ह्यात NDRF ची पथके तयार ठेवली आहेत. मागील वर्षाच्या पुरामुळे झालेली जिवितहानी ह्या वर्षी होऊ नये ह्याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहेत. जिथे डोंगर खचण्याचा  धोका आहे तिथून नागरिकांना हलवण्यात येत आहे. नद्या आणि धरणांच्या पातळीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नदीने धोका पातळी ओलांडल्यावर त्या परिसरातील नागरिकांना सावध करण्यात येत आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search