जिल्ह्यात सद्या पावसाचा रेड अलर्ट असल्याच्या पार्श्वभूमीवर पालक सचिव श्रीमती नायर-सिंह यांनी आज सर्व विभागांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली होती.
सर्व यंत्रणांचे आपत्ती व्यवस्थापन नियोजन आहे आणि जिवितहानी होणार नाही ही आपली जबाबदारी आहे असे त्या म्हणाल्या.
दरड प्रवण भागात विशेष खबरदारी घ्या. साधन सामग्री, त्यांची सुस्थिती, त्यांचे इंधन याची चोख व्यवस्था करा. सद्यस्थितीत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. सामाजिक संस्थांची यादी संपर्कासाठी तयार ठेवा. असे त्या पुढे म्हणाल्या.
प्रत्येक जिल्ह्यात NDRF ची पथके तयार ठेवली आहेत. मागील वर्षाच्या पुरामुळे झालेली जिवितहानी ह्या वर्षी होऊ नये ह्याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहेत. जिथे डोंगर खचण्याचा धोका आहे तिथून नागरिकांना हलवण्यात येत आहे. नद्या आणि धरणांच्या पातळीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नदीने धोका पातळी ओलांडल्यावर त्या परिसरातील नागरिकांना सावध करण्यात येत आहे.