Follow us on
वैभववाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात रेल्वे स्टेशन सुशोभीकरण आणि मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिक ओंकार लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री कार्यालय आणि कोकण रेल्वे प्रशासनाला टॅग करत सोशल मीडियावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत वैभववाडी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था स्पष्ट दिसत आहे. खड्डे, गाळ, खडी आणि पाण्याचे डबके यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
“आम्ही आयुष्यभर हाच त्रास सहन करायचा का? अशा रस्त्यावरून प्रवास म्हणजे तालुक्यातील लोकांचा अपमान आहे,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी त्वरित लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
सद्यस्थितीत कोकणातील आंबा महोत्सव आणि शेतकऱ्यांच्या विकासावर चर्चा सुरू असताना, स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधांबाबतची ही तक्रार वैभववाडीतील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उभे करते. नागरिक आता प्रशासनाकडून लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघण्याची अपेक्षा करत आहेत.
वैभववाडी रेल्वे स्टेशन चे सुशोभीकरण आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण कधी होणार ? आम्ही आयुष्यभर हाच त्रास सहन करायचा का ? अश्या रस्त्यावरून प्रवास म्हणजे तालुक्यातील लोकांचा अपमान आहे .. कृपया त्वरित लक्ष घालावे.. @KonkanRailway @Dev_Fadnavis @CMOMaharashtra pic.twitter.com/0awAvOtI6z
— ONKAR LAD (@ONKARLAD27) May 10, 2026


