नागपूर: नागपूर आणि कोकण रेल्वे मार्गावरून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. नागपूर-मडगाव (NGP-MAO) दरम्यान चालवली जाणारी विशेष ट्रेन आता नियमित (Regularize) करण्यात आली आहे. या गाडीला आता नवीन क्रमांक देण्यात आला असून ती द्वि-साप्ताहिक (Bi-weekly) स्वरूपात धावणार आहे.
नवीन गाडी क्रमांक आणि वेळापत्रक
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जुनी विशेष ट्रेन (०११३९/०११४०) आता ११२०३/११२०४ नागपूर-मडगाव एक्सप्रेस या नवीन क्रमांकाने ओळखली जाईल.
गाडी क्र. ११२०३ (नागपूर ते मडगाव):
ही गाडी नागपूरवरून दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी १५:०५ वाजता सुटेल.
ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी १७:४५ वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी १६ मे २०२६ पासून होईल.
गाडी क्र. ११२०४ (मडगाव ते नागपूर):
ही गाडी मडगाववरून दर शुक्रवारी आणि सोमवारी रात्री २०:०० वाजता सुटेल.
नागपूरला ही ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री २१:२५ वाजता पोहोचेल.
या गाडीची नियमित सेवा मडगाववरून १७ मे २०२६ पासून सुरू होईल.
ही एक्सप्रेस ट्रेन प्रवासादरम्यान खालील स्थानकांवर थांबेल:
नागपूर जंक्शन, वर्धा जंक्शन, पुलगाव जंक्शन, धामणगाव, बडनेरा जंक्शन, अकोला जंक्शन, शेगाव, मलकापूर, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जंक्शन, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी आणि मडगाव जंक्शन.
प्रवासाचा तपशील
एकूण अंतर: १३४२ किलोमीटर.
सरासरी वेग: ५० ते ५२ किमी प्रति तास.
प्रवासाचा वेळ: साधारण २६ तास ४० मिनिटे (नागपूर-मडगाव).
ही ट्रेन नियमित झाल्यामुळे विदर्भ आणि खानदेशातील प्रवाशांना थेट गोव्याला जाण्यासाठी कायमस्वरूपी सोय उपलब्ध झाली आहे. विशेषतः सुट्ट्यांच्या काळात आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.


