कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. उद्या सकाळी १० वाजता कुडाळ येथे, तर ११ वाजता सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर हा उद्घाटन सोहळा होणार आहे.
प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी या नव्या सुविधेची सुरुवात महत्त्वाची मानली जात आहे. उन्हाळा, पाऊस किंवा प्रतीक्षेच्या वेळेत प्रवाशांना या वातानुकूलित कक्षांचा चांगला आधार मिळू शकेल.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन आमदार निलेश राणे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना या नव्या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे. स्थानकांवरील सोयीसुविधांमध्ये भर पडल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


