वनविभागाच्या संवेदनशील आणि तत्पर मोहिमेमुळे आईच्या कुशीत पुन्हा विसावले सांबरचे पिल्लू

   Follow us on        

भुईबावडा घाटाच्या परिसरात फिरताना आईपासून दुरावलेले एक अत्यंत अल्पवयीन सांबरचे पिल्लू काही नागरिकांना रस्त्याकडेला नाजूक आणि अशक्त अवस्थेत दिसून आले. जंगलातील वातावरण आणि वन्यजीवांची पुरेशी माहिती नसल्यामुळे हेवनविभागाच्या संवेदनशील आणि तत्पर मोहिमेमुळे हा निष्पाप जीव सतत आपल्या आईचा शोध घेत होते, परंतु वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे आणि इतर प्राण्यांच्या धोक्यामुळे त्याच्या जिवावर सतत मोठा धोका ओढवला होता.

​या प्रकारची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने याची खबर वनविभागाला दिली. मिळालेल्या माहितीनुसार, गगनबावड्याचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रामदास दुगे, वनसेवक कृष्णा पाटाडे आणि इतर बचाव पथकाचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

​पिल्लाच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा असल्यामुळे वनविभाग व रेस्क्यू टीमने अत्यंत संयमाने आणि सावधगिरीने पावले उचलली. ज्या परिसरात ते पिल्लू आढळले होते, त्याच परिसरात त्याची आई असण्याचा अंदाज बांधत पथकाने रात्री उशिरापर्यंत त्या पिल्लाच्या हालचालींवर आणि संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष केंद्रित केले.

​अखेር पिल्लाला त्याच्या आईजवळ सुखरूप सोडून देण्याचे नियोजन यशस्वी ठरले. जशी आईची नजर तिच्या पाडसावर पडली, तशी तिने एका क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली आणि काही क्षणार्धातच ताटातूट झालेली ती मायलेकरे पुन्हा एकदा एकमेकांच्या मिठीत विसावली.

​वनविभागाच्या या संवेदनशील आणि तत्पर मोहिमेमुळे केवळ एका मुक्या जिवाचे प्राण वाचले नाहीत, तर वन्यजीवांच्या संरक्षणाचे एक उत्तम उदाहरण समोर आले. या संपूर्ण यशस्वी अभियानामध्ये रितेश तेली, विठ्ठल बिडये, ममयूर राणे, निलेश मोरये आणि हरेश सावंत या बचाव पथकातील सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search