सावंतवाडी बस स्थानकातील सोने चोरी प्रकरणातील मुद्देमाल हस्तगत; पती-पत्नी अटकेत

   Follow us on        

सावंतवाडी बस स्थानक परिसरातून १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या संशयित पती-पत्नीला स्थानिक गुन्हे अन्वेषण व सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले होते. सावंतवाडी पोलिसांकडून आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी हे सर्व दागिने कर्नाटकातील आपल्या निवासस्थानी लपवून ठेवल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कर्नाटक येथे जाऊन चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल यशस्वीरित्या हस्तगत केला.

​सावंतवाडी पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर २०२६ रोजी सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषəणाचा सखोल अभ्यास केला. या तांत्रिक तपासाच्या आधारे सदर चोरी दीपक सकट व अमृता सकट यांनीच केल्याचे पोलिसांच्या निष्पन्न झाले.

​माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सावंतवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने कणकवली तालुक्यातील गळदनीजवळील उभादेव मंदिर परिसरात सापळा रचला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी सुरू केली. चौकशीच्या दरम्यान आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला तसेच कर्नाटकातील निवासस्थानी १२ तोळे दागिने असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले.

​आरोपींच्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील व त्यांच्या पथकाने थेट कर्नाटक गाठले आणि पंचांसमक्ष चोरीचा माल जप्त केला. पोलिसांनी जप्त केलेल्या या मुद्देमालमध्ये मंगळसूत्र, कानतले, बांगड्या आणि हर अशा विविध दागिन्यांचा समावेश असून एकूण वजन १२ तोळे आहे.

​पोलिसांनी सर्व मुद्देमाल कायदेशीररीत्या आपल्या ताब्यात घेतला असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर सुनावणीदरम्यान त्यांचा जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. या संपूर्ण यशस्वी कारवाईमध्ये सावंतवाडीचे पोलीस उपअधीक्षक राजेस भागवत, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह अनेक अधिकारी व अंमलदार उपस्थित होते आणि या कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search