सिंधुदुर्गाच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा ‘EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिअल रीफ अँड सबमरीन टुरिजम प्रोजेक्ट’ आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (MTDC) हा प्रकल्प ‘द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’ मधील प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन अवॉर्ड’साठी निवडला गेला आहे. या प्रकल्पाची ‘Best Innovation/Product’ आणि ‘Best Creative/Campaign’ या दोन महत्त्वाच्या श्रेणींमध्ये निवड झाली आहे.

​या उल्लेखनीय यशामध्ये जिल्हा प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना या पुरस्कार सोहळ्यासाठी अधिकृत आमंत्रण पाठवले आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या प्रवासात प्रशासनाने दाखव लेल्या या सहकार्याची दखल विशेषाgने घेण्यात आली आहे. समुद्राखालील पर्यटनाचा अत्यंत अनोखा आणि वेगळा अनुभव देणारा हा ‘EX-INS गुलदार’ प्रकल्प संपूर्ण कोकणातील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

​या प्रकल्पाच्या माध्यमातून सागरी वारसा जपणे, कृत्रिम प्रवाळभित्तिका तयार करणे आणि पाանակडील किंवा पाण्याखालील संग्रहालयासारख्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पत्रानुसार, गुरुवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्लीतील द ओबेरॉय, प्रेसिडेंट्स म्युझियम अँड लायब्ररी येथे या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

​केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याचे या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निवडीमुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला केवळ राष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळाली नसून, कोकणातील सागरी पर्यटनाला अधिक गतिशीलता मिळण्याच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ‘Golden Banyan Award’ साठी झालेली ही निवड म्हणजेच सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search