एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी क्यूआर कोडची सुविधा; पावती ३० दिवस ग्राह्य!

   Follow us on        

एसटी महामंडळाच्या एनसीएमसी कार्डसाठी अर्ज करणाऱ्या प्रवाशांना प्रत्यक्ष कार्ड मिळेपर्यंत ३० दिवसांसाठी क्यूआर कोडयुक्त पावतीवर सवलतीचे तिकीट मिळण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच पुणे विभागात या कार्डाच्या नोंदणी आणि वितरणाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, ‘भीम’ अ‍ॅपद्वारे हे कार्ड घरबसल्या रिचार्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

​एसटी महामंडळाच्या नवीन नियमानुसार महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या प्रवास सवलतींचा लाभ घेण्यासाठी एक ऑक्टोबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्ड काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर ते प्रत्यक्षात प्रवाशांच्या हातात मिळेपर्यंत साधारणपणे एक महिना लागत असल्याने, या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

​कार्ड नोंदणी केल्यानंतर प्रवाशांना एक क्यूआर कोड असलेली पावती दिली जाते. एसटीच्या ई-तिकीट यंत्रावर हा क्यूआर कोड स्कॅन करून प्रवाशांना नियमानुसार सवलतीचे तिकीट दिले जाते, ज्यामुळे प्रत्यक्ष कार्ड हातात येईपर्यंत प्रवाशांना सवलतीपासून वंचित राहावे लागत नाही.

​ही क्यूआर कोड असलेली पावती नोंदणी केल्याच्या तारखेपासून केवळ ३० दिवसांपर्यंतच ग्राह्य धरली जाते. या ठरवून दिलेल्या मुदतीत लाभार्थ्यांनी आपले प्रत्यक्ष एनसीएमसी कार्ड मिळवून ते सक्रिय करणे आणि त्यात आवश्यक रक्कम टॉप-अप करणे बंधनकारक आहे.

​पुणे विभागात आतापर्यंत जवळपास दहा लाख कार्डची नोंदणी झाली असून आठ लाखांच्या आसपास कार्डचे वितरण पूर्ण झाले आहे. कार्ड मिळाल्यानंतर प्रवाशांना केंद्रांवर फेऱ्या मारण्याची गरज पडू नये, यासाठी ‘भीम’ अ‍ॅपच्या माध्यमातून हे कार्ड सहज रिचार्ज करण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search