कणकवली: इन्स्टाग्रामवर ओळख करून १४ वर्षीय विद्यार्थिनीवर लैगिंक अत्याचार; आरोपी ताब्यात

   Follow us on        

कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नववीत शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३९ वर्षीय महेंद्र गणपत घाडीगावकर (रा. किर्लोस, गावठाणवाडी, ता. मालवण) या नराधमाला आपल्या ताब्यात घेतले असून, ही धडक कारवाई कणकवली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी पार पाडली आहे.

​पीडित विद्यार्थिनीची आणि आरोपीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती, ज्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिला विविध आमिषे दाखवली आणि खोटे बोलून आपल्या जाळ्यात ओढले. यानंतर कणकवली तालुक्यातील एका निर्जन ठिकाणी नेऊन आरोपीने तिच्यावर सलग पाच ते सात वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पिडीतेच्या नातेवाईकांनी केला आहे.

​पिडीतेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कणकवली तालुक्यातील एका बागेत काम करत होता आणि या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली मोटारसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी १५ नोव्हेंबर रोजी सर्वप्रथम कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

​घटनास्थळ कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हा गुन्हा शून्य क्रमांकाने कणकवली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरवत कणकवली पोलिसांनी संशयित आरोपी महेंद्र घाडीगावकर याला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

​या संपूर्ण गंभीर गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटर सायकल पोलिसांनी ताब्यात घेतली असून, आरोपीला १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search