रत्नागिरी विमानतळ जानेवारी २०२७ पर्यंत सुरू होणार; दोन फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या माध्यमातून शेकडो तरुणांना मिळणार रोजगाराच्या नवीन संधी

   Follow us on        

रत्नागिरीवासीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून, पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत पर्यटन उद्योग आणि नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

​रत्नागिरी येथे दोन नवनवीन फाईव्ह स्टार हॉटेल्स उभी राहत असून, यामध्ये ‘एक्सप्रेस इन’ आणि ‘महिंद्रा क्लब’ या दोन्ही हॉटेल्सच्या माध्यमातून तब्बल 600 ते 700 स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही फाईव्ह स्टार हॉटेल्सना टाटाच्या स्किल सेंटरशी टायअप करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, या केंद्रातून विविध कोर्सेस पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना याच हॉटेल्समध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

​रत्नागिरीची विमानतळ सेवा आगामी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होण्याची दाट शक्यता असून त्याचे टर्मिनल बिल्डिंग पूर्णपणे सज्ज झाले आहे. सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ पूर्ण होण्यास मोठा काळ लागला होता, परंतु रत्नागिरी विमानतळाचे टर्मिनल काम अगदी कमी वेळेत पूर्ण करण्यात आले असून हे विमानतळ जिल्हाधिकारी कार्यालयापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीचे ठरणार आहे.

​जिल्ह्यातील आरोग्य आणि आपत्कालीन सुविधा बळकट करण्यावर भर दिला जात असून, ठाण्याच्या धर्तीवर रत्नागिरीत १५ जणांची आरडीआरएफ आपत्कालीन टीम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच जिल्ह्यातील एकही डायलिसिस सेंटर बंद पडू दिले जाणार नाही. याशिवाय, अलिकडेच आगीच्या दुर्घटनेत भक्षस्थानी पडलेला श्री महालक्ष्मी मॉल आणि बाधित व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करत असून मयूर खानविलकर यांच्यासह सर्व व्यापाऱ्यांना लवकच दिलासा दिला जाईल.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search