स्वतंत्र कोकणराज्य अभियान वेबसाईट उद्घाटन व ‘कोकणरत्न’ पदवी प्रदान सोहळा संपन्न

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीकांत विठ्ठल सावंत यांच्यासह १० मान्यवरांना मानाच्या ‘कोकणरत्न’ पदवीने सन्मानित

   Follow us on         ​’स्वतंत्र कोकणराज्य अभियाना’तर्फे मुंबईतील आझाद मैदानाजवळील मुंबई मराठी पत्रकार भवन येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रजागृती, समाजजागृती आणि कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यादरम्यान ‘स्वतंत्र कोकणराज्य अभियान’च्या नवीन वेबसाईटचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.

​या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ‘स्वतंत्र कोकणराज्य अभियान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय कोकरे सर यांनी भूषवले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध पत्रकार श्री. सचिनभाऊ कळझुनकर सर उपस्थित होते, तर उद्योजक लायनल वेलोज सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची रंगत वाढली.

​सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीकांत विठ्ठल सावंत यांच्यासह १० मान्यवरांना मानाच्या ‘कोकणरत्न’ पदवीने सन्मानित करण्यात आले. या गौरव सोहळ्यात श्री. रमेश बाळकृष्ण मेस्त्री, श्री. विनायक जयवंत खानविलकर, श्री. मंगेश राजाराम जाधव, श्री. श्रीकांत विठ्ठल सावंत, श्री. नारायण (रमण) भिकाजी प्रभुखानोलकर, श्री. उमेश गणपत चाफे, श्री. योगेश अनंत पांचाळ, श्री. वासुदेव बाबाजी घोले, डॉ. शिवाजी नारायण पोफळे आणि श्री. गोविंद विठ्ठल घाडीगावकर समाजसेवकांचा समावेश होता.

​’कोकणरत्न’ पदवीसाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावे:

​१. श्री. रमेश बाळकृष्ण मेस्त्री

​२. श्री. विनायक जयवंत खानविलकर

​३. श्री. मंगेश राजाराम जाधव

​४. श्री. श्रीकांत विठ्ठल सावंत

​५. श्री. नारायण (रमण) भिकाजी प्रभुखानोलकर

​६. श्री. उमेश गणपत चाफे

​७. श्री. योगेश अनंत पांचाळ

​८. श्री. वासुदेव बाबाजी घोले

​९. डॉ. शिवाजी नारायण पोफळे

​१०. श्री. गोविंद विठ्ठल धाडीगावकर

​या पुरस्कार समारंभानंतर बोलताना श्रीकांत सावंत यांनी कोकण विकासाचे रोखठोक विचार मांडले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही आणण्यासाठी प्रत्येकाने आपल्या गावापासून सुरुवात केली पाहिजे. गिरणी कामगार उध्वस्त झाला त्याच वेळी कोकण उध्वस्त झाले आणि आज त्यांच्या थडग्यावर टॉवर उभे राहत आहेत, याचे कोणत्याही पक्षाला व नेत्याला सोयरसुतक नाही. त्यामुळे कोणतेही राजकारण न करता मुंबई, ठाणे, वसई, विरार, कर्जत, नालासोपारा, कसारा तसेच देश-विदेशात पसरलेल्या आपल्या गावकऱ्यांना एकत्र केले पाहिजे. ‘माझ्या गावाचा सर्वांगीण विकास म्हणजेच राष्ट्राचा सर्वांगीण विकास’ हा निश्चय प्रत्येकाने केला तर पुढील दोन वर्षांत रखडलेला कोकणाचा विकास सहज साध्य होईल.”

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search