महत्त्वाची बातमी! उद्यापासून कोकण रेल्वे मार्गावर बिगर-मान्सून वेळापत्रक लागु होणार

   Follow us on        

कोंकण रेल्वे प्रशासनाकडून उद्या दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ पासून नवीन बिगर-मान्सून (Non-Monsoon) वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. पावसाळा संपल्यानंतर प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि गाड्यांच्या वेळेत सुसूत्रता आणण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या सर्व एक्सप्रेस, पॅसेंजर आणि मेमू गाड्यांच्या वेळेत बदल होणार असून, प्रवाशांना सुधारित वेळापत्रकाची माहिती असणे आवश्यक आहे.

या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी २१ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल, ज्यामध्ये मूळ स्थानकावरून सुटणाऱ्या सर्व गाड्यांचा समावेश असेल. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व प्रमुख स्थानकांवर या बदलांची व्यापक माहिती देण्याच्या सूचना स्थानक व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या जनसंपर्क विभागामार्फत वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारेही या वेळापत्रकाचा प्रसार केला जात आहे.

या अधिसूचनेनुसार, प्रवाशांच्या आरक्षणात किंवा तिकिट बुकिंग प्रणालीमध्ये (PRS) कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित रेल्वे विभागांना आपापल्या प्रणालीतील वेळा अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक गाड्यांच्या चालण्याचे दिवस आणि वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः राजधानी, वंदे भारत, तेजस आणि जनशताब्दी यांसारख्या महत्वपूर्ण गाड्यांच्या वेळांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व ५७ गाड्यांच्या संदर्भातील तपशीलवार वेळापत्रक या अधिसूचनेसोबत जोडण्यात आले आहे. यामध्ये प्रयोगात्मक थांब्यांवर विशेष खुणा (स्टार चिन्ह) करण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांना थांब्यांबाबत कोणतीही दुविधा राहणार नाही. नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदार, व्यापारी आणि चाकरमान्यांसाठी हे सुधारित वेळापत्रक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या संबंधित गाडीची नवीन वेळ रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा स्थानकावरून तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. २१ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या या बिगर-मान्सून वेळापत्रकामुळे कोकणातील रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि वेळेत पार पडण्यास मदत होईल.

 

कोकण रेल्वेचे बिगर-मान्सून वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Non- Monsoon PTT-2026

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search