कुडाळमध्ये बँक लूटण्याचा प्रयत्न फसला! नागरिकांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोर जेरबंद

   Follow us on        

कुडाळ शहराच्या पानबाजार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दुपारी ३ च्या सुमारास चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा खळबळजनक प्रकार घडला. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी भक्ताराज सडवेलकर हा कुडाळ पानबाजार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घुसून बँकेतील महिला कर्मचाऱ्याला चाकू दाखवला आणि भीतीचे वातावरण निर्माण करत कॅश काउंटरवरील लाखांची रोकड बळकावली. हाताशी रोकड येताच त्याने तिथून पळ काढला, परंतु संशयित रोकड घेऊन पळत सुटत असतानाच बँक कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला.

​त्या आवाजाने बँकेबाहेरील आणि परिसरातील नागरिक तातडीने सतर्क झाले आणि कोणतीही वेळ न घालवता त्वरित पाठलाग करत त्या संशयित दरोडेखोराला शिताफीने जेरबंद केले. बँक कर्मचारी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर पळून जाण्यात अपयशी ठरला आणि मोठा अनर्थ टळला.

​संतप्त नागरिकांनी संशयिताला पकडून चांगलाच चोप दिला आणि नंतर त्याला कुडाळ पोलिसांच्या हवाले केले. या गुh्यात जेरबंद करण्यात आलेल्या मुख्य संशयित आरोपीची ओळख पटली असून, भक्ताराज वासुदेव सडवेलकर (वय २८ वर्षे, रा. पिंगुळी, ता. कुडाळ) असे त्याचे नाव आहे.

​पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून शोध कुडाळ पोलिसांकडून घेतला जात असून पुढील तपास सुरू आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search