कोकण आणि नाशिक विभागाची कोतवाल भरती परीक्षा पुढे ढकलली, नवीन वेळापत्रक जाहीर

   Follow us on        

​महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या पत्रानुसार, येत्या १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली कोकण व नाशिक विभागाची महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदाची लेखी परीक्षा सध्या तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे.

​पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू असणे तसेच वयोमर्यादेमध्ये योग्य ती शिथिलता देण्याबाबत शासन निर्णय अपेक्षित असणे, ही या परीक्षेचे नियोजन बदलण्यामागची मुख्य कारणे आहेत.

​या स्थगितीमुळे इच्छुकांना दिलासा मिळाला असून, आता या भरती प्रक्रियेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, ज्यानुसार डिसेंबर महिन्यात पुन्हा कार्यवाही सुरू होईल.

​नवीन नियोजनानुसार, या रिक्त पदांसाठीची जाहिरात आगामी १६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल.

​या संपूर्ण प्रक्रियेचा निकाल दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १८ जानेवारी २०२७ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडीच्या तशीसीलदारांकडून देण्यात आली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search