Konkan Railway: दिवाळीसाठी मडगाव आणि तिरुवनंतपुरम विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

   Follow us on        

दिवाळी आणि छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विविध मार्गांवर ३६ विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नॉर्थ या विशेष गाड्यांचा समावेश आहे. सण-उत्सवांच्या काळात कोकणात जाणाऱ्या आणि दक्षिण भारताकडे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची सोय व्हावी, यासाठी या अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

​कोकण मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव साप्ताहिक विशेष गाडी (०११७९), जी पूर्वी २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत दर शुक्रवारी चालवली जाणार होती, तिला मुदतवाढ देऊन आता ती २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालवण्यात येईल. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासासाठी मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (०११८०) देखील २० नोव्हेंबरऐवजी आता २७ नोव्हेंबर २०२६ रोजी अतिरिक्त फेरीसह धावेल.

​दक्षिण भारताला जोडणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नॉर्थ साप्ताहिक विशेष गाडीच्या (०१४६३) फेरीतही वाढ करण्यात आली आहे. ही गाडी पूर्वी १९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत दर गुरुवारी चालवण्यात येणार होती, ती आता २६ नोव्हेंबर २०२६ रोजी अतिरिक्त फेरी मारेल. तसेच परतीची तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (०१४६४), जी २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत दर शनिवारी चालवण्यात येणार होती, ती आता २८ नोव्हेंबर २०२६ रोजीही आपल्या सेवेत उपलब्ध राहील.

​या सर्व विशेष गाड्यांचे सध्याचे वेळापत्रक, थांबे, डब्यांची रचना आणि भाडे पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. एलटीटीवरून सुटणाऱ्या या विशेष गाड्यांच्या तिकिटांचे बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search