नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवांचे बुकिंग सुरू, १६ नोव्हेंबर रोजी उड्डाण भरणार पहिले विमान!

   Follow us on         नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या दोन्ही गंतव्यस्थानांच्या दरम्यान फ्लाई ९१ (Fly91) या विमान कंपनीच्या वतीने विमानसेवा सुरू करण्यात आली असून, आता प्रवाशांना या मार्गावरील तिकिटे बुक करता येणार आहेत.

​या नवीन विमानसेवेमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुकर आणि वेगवान होणार आहे. रस्तेमार्गे किंवा इतर वाहतुकीने होणारा वेळखाऊ प्रवास टाळून आता नागरिक कमी वेळेत आपले अंतर पार करू शकतील, ज्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावरील अत्यंत महत्त्वाची असलेली पहिली विमानफेरी येत्या १६ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या पहिल्या उड्डाणासोबतच नियमित विमानसेवेचा श्रीगणेशा होणार असल्याने कोकणवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

​भाजप नेते नितेश राणे यांनी देखील आपल्या सोशल मीडिया हँडलवर याबद्दलची माहिती शेअर करत कोकणवासीयांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. “येवा कोकण आपलाच आसा!” असे म्हणत त्यांनी या सुविधेचे स्वागत केले असून नागरिकांना विमानसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

​सध्या ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी आपल्या सोयीनुसार तारखांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात या विमानसेवेमुळे कोकण आणि मुंबई परिसरातील दळणवळण अधिक मजबूत होईल आणि पर्यटनाला देखील मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search