मध्यरेल्वे: लोकल गाड्यांच्या सततच्या ‘लेटमार्क्स’ मुळे चाकरमान्यांच्या नोकर्‍या धोक्यात!

अंबरनाथ-बदलापूर ते दादर प्रवास दीड ते पावणेदोन तासांवर; रेल्वेच्या नियोजनाअभावी नोकरदारांचे हाल, नोकरी आणि कौटुंबिक आयुष्यावर परिणाम

   Follow us on        

अंबरनाथ आणि बदलापूर येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नोकरदारांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. पूर्वी जलद लोकलने दादरपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण एक तास लागत होता. मात्र, आता हाच प्रवास करण्यासाठी दीड ते पावणेदोन तास लागत असल्याने नोकरदारांचा मोठा वेळ रेल्वे प्रवासातच खर्च होत आहे. मध्य रेल्वेकडून उपनगरीय रेल्वेची मूळ वाहतूक क्षमता आणि उपलब्ध लोकल फेऱ्यांमध्ये पुरेशी वाढ न करता मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने उपनगरीय प्रवाशांच्या अडचणी वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे.अंबरनाथ आणि बदलापूर येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नोकरदारांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. पूर्वी जलद लोकलने दादरपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण एक तास लागत होता. मात्र, आता हाच प्रवास करण्यासाठी दीड ते पावणेदोन तास लागत असल्याने नोकरदारांचा मोठा वेळ रेल्वे प्रवासातच खर्च होत आहे. मध्य रेल्वेकडून उपनगरीय रेल्वेची मूळ वाहतूक क्षमता आणि उपलब्ध लोकल फेऱ्यांमध्ये पुरेशी वाढ न करता मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने उपनगरीय प्रवाशांच्या अडचणी वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या वाढलेल्या प्रवासाचा परिणाम केवळ प्रवाशांच्या वेळेवर होत नसून त्यांच्या नोकरीवरही होऊ लागला आहे. कार्यालयात वेळेवर पोहोचणे आणि बायोमेट्रिक हजेरीची वेळ पाळणे अनेकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. रेल्वेच्या विलंबामुळे कार्यालयात उशीर झाल्यास त्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर येते. काहींना तर वेळेवर हजेरी लावता न आल्याने नोकरी गमावण्याची भीती किंवा प्रत्यक्ष नोकरी गमावण्याची वेळ येत आहे.
दुसरीकडे, मुंबईतील कंपन्यांकडून ठाण्यापलीकडे राहणाऱ्या उमेदवारांना नोकरी देताना कमी प्राधान्य दिले जात असल्याची तक्रारही समोर येत आहे. लांबचा प्रवास, रेल्वेची अनिश्चितता आणि कार्यालयात वेळेवर पोहोचण्याची अडचण यामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या नोकरदारांसाठी रोजगाराच्या संधींवरही मर्यादा येत आहेत.
या धावपळीचा कौटुंबिक आयुष्यावरही विपरीत परिणाम होत आहे. सकाळी लवकर घर सोडून रात्री उशिरा घरी परतावे लागत असल्याने कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येत नाही. परिणामी घरात मतभेद आणि कौटुंबिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे. विशेषतः नोकरी करणाऱ्या महिलांना कार्यालयीन जबाबदाऱ्या, घरातील कामे आणि मुलांची काळजी या सर्व गोष्टी सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल राखणे त्यांच्यासाठी अधिकच कठीण बनत आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search