कोकणकन्या एक्सप्रेसच्या ‘सुपरफास्ट दर्जा’ मुळे मांडवी एक्सप्रेसचे वेळापत्रक बिघडले

   Follow us on         ​

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसला सातत्याने विलंबाचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या कोकण विकास समितीने कोकणकन्या एक्सप्रेसचा सुपरफास्ट दर्जा त्वरित रद्द करण्याची ठाम मागणी पुढे केली आहे. समितीच्या मते, कोकणकन्या एक्सप्रेसच्या वेळापत्रकात जो सुपरफास्ट दर्जा देताना बदल करण्यात आला, तोच बदल मांडवी एक्सप्रेसच्या अभूतपूर्व विलंबाला कारणीभूत ठरत आहे.

​या गंभीर विषयावर कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत शंकरराव दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी अधिकृतपणे रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. जानेवारी २०२३ मध्ये जेव्हा कोकणकन्या एक्सप्रेसला सुपरफास्ट दर्जा देण्यात आला, तेव्हा तिची मडगाव येथून सुटण्याची वेळ सायंकाळी ६ वरून बदलून ७ वाजण्यात आली. या एका तासाच्या बदलामुळे दोन्ही गाड्यांच्या रेक जोडणी तसेच देखभालीच्या संपूर्ण व्यवस्थेवर मोठा ताण व परिणाम पडल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

​कोकणकन्या एक्सप्रेसला होत असलेल्या विलंबाची साखळी प्रतिक्रिया थेट दुसऱ्या दिवशी धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसवर दिसून येत आहे. माणगाव, संगमेश्वर, आडवली, राजापूर आणि वैभववाडी या महत्त्वाच्या स्थानकांवरील हजारो प्रवाशांसाठी मांडवी एक्सप्रेस अत्यंत सोयीची आहे. परंतु, या गाडीला होणाऱ्या बेसुमार विलंबाळुळे प्रवाशांची नोकरी, व्यवसाय, वैद्यकीय उपचार तसेच पुढील महत्त्वाच्या प्रवासाचे नियोजन पूर्णपणे कोलमडत असून त्यांची नाहक गैरसोय होत आहे.

​प्रवाशांची हीच बिकट परिस्थिती लक्षात घेऊन, मांडवी एक्सप्रेसची नियमितता आणि वेळापत्रक पूर्ववत कायम ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आक्रमक मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोकणकन्या एक्सप्रेसचा सध्याचा सुपरफास्ट दर्जा पूर्णपणे काढून टाकावा.

​तसेच, या गाडीचे जुने १०१११ आणि १०११२ हे ट्रेन नंबर पूर्ववत सुरू करावेत आणि मडगाववरून सुटण्याची सायंकाळी ६ वाजıची जुनी वेळ पुन्हा लागू करावी. याशिवाय, मांडवी एक्सप्रेसची आधीची जुनी रेक देखभाल व्यवस्था देखील पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावी, जेणेकरून प्रवाशांचा त्रास संपुष्टात येईल अशी आग्रही मागणी समितीने केली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search