मिठाईवरील वर्ख खरा की खोटा हे कसे ओळखायचे? तुकाराम मुंडे यांनी सांगितली सोपी चाचणी

   Follow us on        

सणासुदीचे दिवस जवळ आले की बाजारपेठेत विविध प्रकारच्या मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. अशा वेळी मिठाई अधिक आकर्षक आणि सुंदर दिसावी यासाठी तिच्यावर चमकणारा वर्ख लावला जातो. मात्र, बाजारात मिळणाऱ्या सर्वच मिठाईंवर लावलेला वर्ख हा अस्सल चांदीचाच असेल असे नाही. याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करत एका सोप्या चाचणीची माहिती दिली आहे.


सामान्य ग्राहकांना खरा आणि बनावट वर्ख यातील फरक सहजासहजी ओळखता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन तुकाराम मुंडे यांनी एक अतिशय सोपी आणि व्यावहारिक पद्धत स्पष्ट केली आहे. मिठाईवरील वर्ख बोटांच्या मध्ये धरून हलक्या हाताने चोळल्यास तो जर लगेच विरघळून किंवा बारीक होऊन नाहीसा झाला, तर तो अस्सल चांदीचा वरख असतो. ही सोपी चाचणी करून नागरिक खरेदी करतानाच वर्ख अस्सल आहे की नाही याची खात्री करू शकतात.


सध्याच्या काळात मिठाईचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असताना काही व्यापारी अधिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने किंवा खर्च वाचवण्यासाठी चांदीच्या ऐवजी अल्युमिनियमच्या पतऱ्याचा वापर करतात. अल्युमिनियमचा हा वर्ख दिसायला हुबेहूब चांदीसारखाच वाटत असला, तरी तो आरोग्यासाठी अजिबात योग्य नसतो. त्यामुळे अशा प्रकारच्या बनावट वर्ख चा वापर मिठाईवर केला जाणे ही एक अत्यंत गंभीर बाब बनली आहे.


चांदीचा वर्ख मर्यादित प्रमाणात शरीरासाठी हानिकारक नसतो, परंतु अल्युमिनियमचा पोटात जाणारा अंश मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो. अशा भेसळयुक्त मिठाईचे सेवन केल्यास पोटाचे विकार तसेच आरोग्याच्या इतर विविध समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ मिठाईचा देखावा न पाहता तिच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे ठरते.


नागरिकांनी मिठाई खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी आणि घाईगडबडीत कोणतीही वस्तू विकत घेणे टाळावे, असे सांगत तुकाराम मुंडे यांनी सर्वांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. सण-उत्सव आनंदाने साजरे करतानाच स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची सुरक्षा प्रथम स्थानी ठेवावी, असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search