विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची वन विभागाकडून सुखरूप सुटका

   Follow us on        

मार्गताम्हाणे परिसरातील सुतारवाडी भागात प्रताप सुर्वे यांची खासगी विहीर आहे. या विहिरीत अचानक एक दुर्मिळ पिसोरी प्रकारचे हरण पडल्याची घटना समोर आली. विहिरीत पाणी असल्याने ते हरण जीव वाचवण्यासाठी पाण्यातच पोहू लागले होते.

​या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिसोरी हरणाला कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून त्याची सुरक्षित सुटका करण्याचे नियोजन केले. बचाव कार्य सुरू असताना पिसोरी हरण पाण्यात इकडेतिकडे पोहत होते.

​वन कर्मचाऱ्यांनी मोठ्या कौशल्याने आणि अथक प्रयत्न करत जाळीचा वापर करून त्या पिसोरी हरणाला सुरक्षितपणे पकडले. या यशस्वी मोहिमेत चिपळूणचे वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले तसेच आरआरटी पथकाचे सदस्य अथर्व घाग यांनी महत्त्वाची भूमिका बजावत सहभाग घेतला.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search