ठाण्यात दिवाळीचा उत्साह द्विगुणित; अशोक वैती यांच्या हस्ते किल्ले आणि रांगोळी स्पर्धेची पाहणी

   Follow us on        

​ठाणे:

दिवाळीनिमित्त ठाण्यात स्व. बारकू वैती प्रतिष्ठान आणि श्री साईधाम आनंद संस्था, काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्र मंडळातर्फे आयोजित भव्य किल्ला व रांगोळी स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. तब्बल ३८ वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही सांस्कृतिक परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत लहान मुलांनी कल्पकतेतून सुंदर गड-किल्ले साकारले, तर महिला व तरुणींनी रंगीबेरंगी रांगोळ्यांच्या माध्यमातून आपली कलात्मकता सादर केली.

​या उपक्रमाला जनसेवक तथा ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून प्रत्यक्ष भेट दिली आणि किल्ले व रांगोळी सजावटीची पाहणी केली. यावेळी त्यांनी चिमुकल्यांशी संवाद साधून त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला. या स्पर्धेत किल्ला व रांगोळी सजावटीसाठी आकर्षक रोख पारितोषके, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान नागरिकांना ही कलाकृती पाहण्याची संधी मिळाली असून, १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी श्री साईबाबा मंदिर, काजूवाडी येथे भव्य दीपोत्सव सोहळ्याने या उपक्रमाची सांगता झाली.

नव्या पिढीत ऐतिहासिक जाणिवा रुजविणारा हा उपक्रम सामाजिक एकोप्याचे प्रतीक ठरला असून आयोजक अशोक बारकू वैती यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले आहेत.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search