प्रवाशांना खुशखबर! गोव्यासाठीची नवीन वंदे भारत एक्सप्रेस १५ नोव्हेंबरपासून धावणार

   Follow us on        

दक्षिण पश्चिम रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बेंगळुरू, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोवा यांच्यातील रेल्वे प्रवास प्रवाशांसाठी अत्यंत सुलभ व्हावा म्हणून ही नवी वंदे भारत सेवा सुरू करण्यात येत आहे. येसवंतपूर ते मडगावदरम्यान चालवली जाणारी ही नियमित ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार असून, यामध्ये एकूण १६ डबे असणार आहेत.

​या नव्या ट्रेनच्या उद्घाटनासाठी १३ नोव्हेंबर रोजी दोन विशेष वंदे भारत ट्रेन चालवल्या जाणार आहेत. पहिली उद्घाटन विशेष ट्रेन एसएमव्हीटी बेंगळुरूहून दुपारी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे मडगावला पोहोचेल, तर दुसरी ट्रेन मंगळुरू जंक्शनहून सुटून त्याच दिवशी रात्री एसएमव्हीटी बेंगळुरूला पोहोचेल. या दोन्ही उद्घाटन विशेष गाड्यांना १६ डबे जोडलेले असतील.

​नियमित वेळापत्रकानुसार, ट्रेन क्रमांक २६६५५ येसवंतपूरहून सकाळी ७:३५ वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ८:५५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक २६६५६ मडगावहून सकाळी ८:२० वाजता सुटून रात्री ९:१५ वाजता येसवंतपूरला परत येईल. ही परतीची ट्रेन गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस सेवा देईल.

​येसवंतपूरहून मडगावकडे आणि मडगावहून येसवंतपूरकडे प्रवास करताना ही ट्रेन श्रवणबेळगोळ, हसन, सकलेशपूर, सुब्रह्मण्य रोड, काबकापुत्तूर, मंगळुरू जंक्शन, उडुपी, कुंदापूर, मुकांबिका रोड बिंदूर, मुरुडेश्वर, गोकर्ण रोड आणि कारवार या प्रमुख स्थानकांवर थांबेल. यामुळे किनारपट्टीवरील पर्यटनस्थळे, मंदिरं आणि समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे.

​नव्या वंदे भारत ट्रेनच्या सुरुवातीसोबतच ट्रेन क्रमांक २०६४५/२०६४६ मडगाव-मंगळुरू सेंट्रल-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस १५ नोव्हेंबरपासून बंद केली जाणार आहे. या ट्रेनमध्ये एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि चेअर कार असे आधुनिक डबे असून, याचा पर्यटक, व्यावसायिक, विद्यार्थी आणि भाविकांना मोठा लाभ मिळणार आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search