Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचे प्रवासभाडे जास्त; प्रवासी नाराज

   Follow us on        

कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू केलेल्या यशवंतपूर ते कारवार दरम्यान धावणाऱ्या नव्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वाढीव प्रवासqभाड्या बद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. जवळपास समान अंतर असलेल्या मंगळूर सेंट्रल ते तिरुवनंतपुरम सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेसच्या तुलनेत चेअर कारसाठी ४८० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी तब्बल ७५० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. मंगळूर ते तिरुवनंतपुरम या ६२० किलोमीटर अंतरासाठी चेअर कारचे भाडे १,६४० रुपये आहे, तर यशवंतपूर ते कारवार प्रवासासाठी हेच भाडे २,१२० रुपये आकारले जात आहे; तसेच याच वर्गातील एक्झिक्युटिव्ह श्रेणीचे भाडे २,९७० रुपयांऐवजी ३,७२० रुपये आहे.

या मार्गावरील भाडेवाढीमागे रेल्वे प्रशासनाकडून आकारले जाणारे फुगवलेले अंतर हे मुख्य कारण ठरले आहे. मंगळूर-तिरुवनंतपुरम मार्गावर प्रवाशांकडून प्रत्यक्ष प्रवासाच्या अंतराचेच भाडे घेतले जाते, याउलट यशवंतपूर ते कारवार प्रवास करणाऱ्यांना प्रत्यक्ष ६१० किलोमीटर अंतराऐवजी ७६० किलोमीटर या फुगवलेल्या inflated अंतराचे भाडे द्यावे लागते. यामध्ये कोकण रेल्वे महामंडळाच्या नेटवर्कवर सुमारे ४० टक्के दराने जवळपास १०० किलोमीटर आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या साकलेशपूर-सुब्रह्मण्य रोड घाट विभागात १०० टक्के दराने ५५ किलोमीटर अंतर अतिरिक्त पकडले जाते.

कोकण रेल्वे मार्गावरील ठोकुूर ते मडगाव विभागात जवळपास १२० किलोमीटरपर्यंत अंतर फुगवले गेले असून, त्यामुळे मंगळूर जंक्शन ते मडगाव दरम्यानचे आकारणीयोग्य अंतर थेट ४२३ किलोमीटरवर पोहोचते. याशिवाय, यशवंतपूर आणि मंगळूर जंक्शन दरम्यानचे ३५७ किलोमीटरचे प्रत्यक्ष अंतर देखील वाढवून ४१२ किलोमीटर धरले गेले असून, याच गणितीय वाढीमुळे संपूर्ण प्रवासाचे तिकीट दर भडकले आहेत.

फक्त अंतरच नव्हे तर अधिक प्रवासाच्या वेळेमुळे देखील या गाडीचे भाडे महाग झाले आहे. यशवंतपूर-मडगाव वंदे भारत गाडीला अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी १३ तास २० मिनिटे आणि कारवारपर्यंत पोहोचण्यासाठी १२ तास लागतात, तर परतीच्या प्रवासात मडगाव ते यशवंतपूरसाठी १२ तास ५५ मिनिटे लागतात. या लांबलेल्या प्रवासामुळे प्रवाशांना दोनवेळचे जेवण आणि एक नाश्ता घ्यावा लागतो, ज्यामुळे कॅटरिंग शुल्क जवळपास दुप्पट होते.

या गाडीच्या गतीबाबत आणि शुल्काबाबत देखील रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दुहेरी मार्गावरून धावणाऱ्या तिरुवनंतपुरम वंदे भारतचा सरासरी वेग ताशी ७२ किलोमीटर आहे, तर एकाच लोहमार्गावरून व घाट विभागातून धावणाऱ्या मडगाव वंदे भारतचा सरासरी वेग ताशी ५२ किलोमीटर पेक्षाही कमी आहे. प्रत्यक्ष सामान्य मेल किंवा एक्सप्रेस गाडीएवढा वेग असतानाही या गाडीला सुपरफास्ट श्रेणीत समाविष्ट करून अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क देखील प्रवाशांच्या माथी मारले जात आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search