दिवा–पनवेल मार्गावर एका आठवड्याचा पॉवर ब्लॉक! कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

   Follow us on         मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील दिवा ते पनवेल पट्ट्यात पॉवर ब्लॉकच्या कामामुळे काही रेल्वेगाड्यांवर नियमन करण्यात येणार आहे, तर काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही माहिती २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली असून होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

​२२ नोव्हेंबर २०२६ ते २८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान सुरू होणाऱ्या गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसला आपटा स्थानकावर ५० मिनिटे थांबवून नियमन केले जाईल. याच कालावधीत सुरू होणाऱ्या गाडी क्रमांक २०११२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेसचे सोमाटणे स्थानकावर १० मिनिटे नियमन होईल.

​२३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रवास सुरू करणाऱ्या गाडी क्रमांक २२११४ तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक (टर्मिनस) सुपरफास्ट एक्सप्रेसला आपटा येथे १०९ मिनिटे थांबवले जाईल. तसेच २४ नोव्हेंबर २०२६ आणि २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सुरू होणारी गाडी क्रमांक २२१४९ एर्नाकुलम जंक्शन – पुणे एक्सप्रेस आपटा येथे १०९ मिनिटे नियमन अंतर्गत राहील.

​२५ नोव्हेंबर २०२६ रोजी सुरू होणारी गाडी क्रमांक २२६५५ एर्नाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्सप्रेस आपटा येथे ६० मिनिटे थांबवली जाईल, तर २८ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रवास सुरू करणाऱ्या गाडी क्रमांक २२६५३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसचे आपटा येथे १०९ मिनिटे नियमन केले जाईल.

​दुसरीकडे, लोकमान्य टिळक (टर्मिनस) येथून २४, २७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक (टर्मिनस) – मडगाव जंक्शन एक्सप्रेस १२० मिनिटे उशिराने सोडण्यात येईल. याशिवाय २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सुरू होणारी गाडी क्रमांक २२११५ लोकमान्य टिळक (टर्मिनस) – करमाळी सुपरफास्ट एक्सप्रेस देखील लोकमान्य टिळक (टर्मिनस) स्थानकावरून १२० मिनिटे उशिरा सुटेल, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी दिली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search