महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून १५ अनारक्षित विशेष गाड्यांची सोय

   Follow us on         ​

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी प्रवास करणाऱ्या भाविक-प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ४ डिसेंबर २०२६ ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत १५ अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान ४ गाड्या चालवल्या जाणार असून, ४ डिसेंबर २०२६ रोजी ०१२६० क्रमांकाची गाडी नागपूरहून १८.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल, तर ०१२६२ क्रमांकाची गाडी नागपूरहून २३.५५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी १६.१५ वाजता सीएसएमटीला येईल. तसेच ५ डिसेंबर २०२६ रोजी ०१२६४ ही विशेष गाडी नागपूरहून ०७.४० वाजता सुटून त्याच दिवशी २३.५५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल आणि ०१२६६ क्रमांकाची गाडी नागपूरहून १८.१० वाजता निघून दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता सीएसएमटीला दाखल होईल.

​सीएसएमटी ते नागपूर मार्गावर एकूण ४ विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये ६ डिसेंबर २०२६ रोजी ०१२४९ क्रमांकाची गाडी सीएसएमटीवरून २०.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ११.२० वाजता नागपूरला पोहोचेल. त्यानंतर ७ डिसेंबर २०२६ रोजी ०१२५१ क्रमांकाची गाडी सीएसएमटीहून १०.३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता नागपूरला येईल आणि ०१२५५ क्रमांकाची गाडी सीएसएमटीवरून १२.३५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता नागपूरला पोहोचेल. याशिवाय ८ डिसेंबर २०२६ रोजी ०१२५७ क्रमांकाची विशेष गाडी सीएसएमटीहून ००.२५ वाजता सुटून त्याच दिवशी १६.१० वाजता नागपूरला दाखल होईल. वरील नागपूर-सीएसएमटी आणि सीएसएमटी-नागपूर गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जळंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबे देण्यात आले आहेत.

​दादर ते नागपूर दरम्यान १ विशेष सेवा चालवण्यात येणार असून, ७ डिसेंबर २०२६ रोजी ०१२५३ क्रमांकाची गाडी दादरहून ००.४० वाजता सुटून त्याच दिवशी १६.१० वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, जळंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी असे थांबे असतील. या सर्व मुंबई-नागपूर विशेष गाड्यांची रचना १६ सेकंड स्लीपर / जनरल सेकंड क्लास / चेअर कार आणि २ सेकंड सीटिंग कम गार्ड्स ब्रेक व्हॅन अशा एकूण १८ आयसीएफ डब्यांची असेल.

​कलबुर्गी-सीएसएमटी-कलबुर्गी दरम्यान २ विशेष गाड्या धावणार असून, ०१२४५ क्रमांकाची गाडी ५ डिसेंबर २०२६ रोजी कलबुर्गी येथून १८.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता सीएसएमटीला पोहोचेल, तर ०१२४६ क्रमांकाची गाडी ७ डिसेंबर २०२६ रोजी सीएसएमटीहून ००.२५ वाजता निघून त्याच दिवशी ११.१० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. या गाड्यांना दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, अक्कलकोट रोड आणि गाणगापूर रोड येथे थांबे असून यांची रचना २२ सेकंड स्लीपर / जनरल सेकंड क्लास / चेअर कार आणि २ सेकंड सीटिंग कम गार्ड्स ब्रेक व्हॅन अशा २४ आयसीएफ डब्यांची असेल.

​अमरावती-सीएसएमटी-अमरावती मार्गावर २ विशेष गाड्या चालवल्या जाणार असून, ०१२१८ क्रमांकाची गाडी ५ डिसेंबर २०२६ रोजी अमरावतीहून १७.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ०५.२५ वाजता सीएसएमटीला येईल आणि ०१२१७ क्रमांकाची गाडी ७ डिसेंबर २०२६ रोजी सीएसएमटीवरून ००.४० वाजता सुटून त्याच दिवशी १२.५० वाजता अमरावतीला पोहोचेल. या गाड्यांना दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा येथे थांबे असतील. तसेच कोल्हापूर-सीएसएमटी-कोल्हापूर दरम्यान २ विशेष गाड्या धावणार असून, ०१४०२ क्रमांकाची गाडी ५ डिसेंबर २०२६ रोजी कोल्हापूरहून १६.४० वाजता निघून दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल, तर ०१४०१ क्रमांकाची गाडी ६ डिसेंबर २०२६ रोजी सीएसएमटीवरून २२.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता कोल्हापूरला पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर आणि हातकणंगले येथे थांबे दिले आहेत. ०१२१८, ०१२१७, ०१४०२ आणि ०१४०१ या गाड्यांची रचना १६ सेकंड स्लीपर / जनरल सेकंड क्लास / चेअर कार आणि २ सेकंड सीटिंग कम गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी १८ आयसीएफ डब्यांची राहील.

​अनारक्षित डब्यांसाठी सर्वसामान्य शुल्कासह तिकीट बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल तसेच प्रवासी रेलवन ॲप डाउनलोड करूनही तिकिटे आरक्षित करू शकतात. या विशेष गाड्यांच्या स्थानकांवरील सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करावे. प्रवाशांच्या सोयीसाठी व मार्गदर्शनासाठी रेल्वे प्रशासनाने पुरेशी व्यवस्था केली असून या विशेष सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्धीपत्रक क्रमांक २०२६/११/४० अन्वये केले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search