एसटी महामंडळाच्या जमिनीची विकासकामे केवळ मराठी विकासकांनाच मिळावीत

   Follow us on        

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भूखंडांवर साकारले जाणारे विविध विकासप्रकल्प हे केवळ भूमिपुत्र आणि मराठी विकासकांच्याच हाती सोपवले गेले पाहिजेत, अशी ठाम भूमिका मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी मांडली आहे. राज्यातील पायाभूत सुविधांचा विस्तार होत असताना स्थानिक उद्योजकांना या प्रक्रियेत पूर्ण वाव मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

​प्रत्येक तालुक्यातील एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जागांचा विकास करताना त्याच तालुक्यातील स्थानिक मराठी कंत्राटदार आणि विकासकांना प्राधान्यक्रमाने कामे मिळायला हवीत. यामुळे केवळ स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळणार नाही, तर ग्रामीण व तालुका स्तरावरील अर्थकारणालाही मोठी चालना मिळू शकेल.

​या महत्त्वपूर्ण मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी राज्यातील सर्व मराठी उद्योजक व विकासकांनी एकत्र येऊन एकीचे बळ दाखवणे आवश्यक आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या विषयाचे गांभीर्य पटवून द्यावे व मागणीचा जोरदार आग्रह धरावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

​या अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक विकासकांनी या प्रयत्नांमध्ये पुढाकार घेऊन आपला सक्रिय सहभाग नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळेच स्थानिक उद्योजकांच्या हक्कांचे रक्षण होऊन ही मागणी धोरणात्मक पातळीवर मान्य होण्यास मदत होईल.

​ही मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद, मसुरा सर्वांगीण विकास परिषद आणि राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी लावून धरली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search