सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘दक्षिण कोकणची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे यंदा देवगड हापूस आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली. या उपक्रमामुळे मंदिरात भक्ती, श्रद्धा आणि पर्यटन यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, या वर्षी या उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्ताने ‘आंबा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचा मुख्य उद्देश पर्यटकांना अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देणे आणि हापूसच्या नावाने होणारी फसवणूक थांबवणे हा आहे. यासाठी देवस्थान ट्रस्टतर्फे शेतकऱ्यांसाठी १० स्टॉल्स विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते. २०१७ मध्ये शैलेश बोंडाळे यांनी मांडलेल्या या संकल्पनेला आता मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे.
Facebook Comments Box


