मुंबई: भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे भरती विभागामार्फत ‘सहाय्यक लोको पायलट’ (ALP) पदासाठी २०२४ ची मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, यासाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ मे पासून सुरू होत आहे. रेल्वेमध्ये आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे ITI, डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगमधील पदवी (Degree) असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे निश्चित करण्यात आली असून नियमानुसार वयामध्ये सवलतही दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना उत्कृष्ट सरकारी वेतन आणि भत्ते मिळणार आहेत.
या भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त मराठी तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघा’तर्फे करण्यात आले आहे. प्रत्येक मराठी तरुण सरकारी सेवेत असावा, या उद्देशाने महासंघाने पुढाकार घेतला आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी, अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी आणि संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी महासंघातर्फे विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
ज्यांना अर्ज भरायचे आहेत किंवा अधिक माहिती हवी आहे, त्यांनी पवन सुनील पांचाळ (उपाध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ सोशल मीडिया सेल) यांच्या 8097391278 या क्रमांकावर किंवा गणेश बाबाजी परब (अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ ठाणे ते पनवेल युनिट) यांच्या 7045086960 या क्रमांकावर व्हॉट्सअँपद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त तरुणांनी आपला उत्साह दाखवून या संधीचा लाभ घ्यावा, असेही महासंघाने नमूद केले आहे.


