रत्नागिरी:उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव आणि पनवेल दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाड्यांचे वेळापत्रक आणि मार्ग:
गाडी क्र. ०११०६ (मडगाव – पनवेल साप्ताहिक स्पेशल): ही गाडी रविवार, १० मे २०२६ रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्र. ०११०५ (पनवेल – मडगाव साप्ताहिक स्पेशल): ही गाडी सोमवार, ११ मे २०२६ रोजी पनवेल येथून पहाटे ०५:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
गाडीचे थांबे:
ही ट्रेन प्रवासात करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना (Composition):
या विशेष ट्रेनमध्ये एकूण २३ डबे असतील, ज्यात खालीलप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे:
AC 3 Tier: ०३ डबे
Sleeper (शयनयान): ११ डबे
General (सामान्य): ०७ डबे
SLR: ०२ डबे
प्रवाशांना अधिक माहितीसाठी आणि वेळपत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे किंवा ‘KR Mirror’ ॲप वापरण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


