Tag Archives: Mumbai
मुंबई :कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. मुंबईत कारमधून प्रवास करणऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमामध्ये वाहतूक विभागाकडून मोठा बदल करण्यात आला आहे. आता मुंबईमध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट वापरणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी कारमध्ये आवश्यकते बदल करण्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
सीट बेल्ट बांधणे टाळून या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर १ नोव्हेंबर २०२२ पासीन मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ १९४(ब)(१) अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.
Vision Abroad
मुंबई : आता मुंबई उपनगरीय रेल्वे लोकल्सच्या फर्स्ट क्लास श्रेणीतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. ज्या प्रवाशांनी फर्स्ट क्लास चा त्रैमासिक आणि सहामाही आणि वार्षिक पास काढला आहे ते प्रवासी AC लोकल आणि फर्स्ट क्लास श्रेणीच्या भाड्याचा फरक भरून एसी लोकल ने प्रवास करू शकतात.
दिनांक २४.०९.२०२२ पासून रेल्वेच्या उपनगिरीय टिकेट्स खिडक्यांवर हा फरक भरून प्रवाशांना आपला पास अपग्रेड करता येईल.दिनांक ह्या निर्णयामुळे त्रैमासिक आणि सहामाही आणि वार्षिक पासधारक एसी लोकलकडे वळतील असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबई : पाश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी आणि AC लोकल्सना मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन पाश्चिम रेल्वे प्रशासनाने AC आणि Non-AC फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ऑक्टोबरपासून 20 AC लोकल्स आणि 10 Non-AC लोकल्स ह्या मार्गावर वाढविण्यात येतील.
सध्या चर्चगेट ते डहाणू ह्या मार्गावर एकूण 1375 लोकल्स फेर्या चालविण्यात येत आहेत त्यामधे 48 फेर्या AC लोकल्स च्या आहेत. ह्या मार्गावर सुमारे 30 लाख प्रवाशी दररोज प्रवास करतात त्यामधे सुमारे 1 लाख प्रवासी AC लोकल्सने प्रवास करतात. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात AC लोकल्सने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या 25% वाढली आहे. मध्य उपनगरीय रेल्वेशी तुलना करता ह्या मार्गावर AC लोकल्सना मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ह्या मार्गावर 20 AC लोकल्स वाढवायच्या निर्णय घेतला आहे.
ह्या सर्व वाढिव सेवांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई: मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील एकूण 10 गाड्या वातानुकूलित (AC locals) मध्ये परावृत्त करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने आज एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
AC locals ना वाढता प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला काहीसे महाग असलेले तिकीट कमी केल्याने ह्या गाड्यांच्या प्रतिसादात वाढ झाली आहे, त्यामुळे ह्या वातानुकूलित गाड्यांचा फेर्यांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.
दिनांक 19 ऑगस्ट 2022 पासून खालील गाड्या AC locals म्हणुन चालविण्यात येतील.
ह्या वाढलेल्या 10 लोकल्स पकडून आता मध्य उपनगरीय मार्गावर चालणार्या AC लोकल्सची संख्या एकूण 66 एवढी झाली आहे. पूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून pdf फाइल डाऊनलोड करा.
Mumbai-AC-Main-Line-Suburban-Time-Table-19.08.2022