Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-includes/functions.php on line 6114
Mumbai Goa highway Archives - Kokanai

Tag Archives: Mumbai Goa highway

Mumbai Goa Highway | मनसे कार्यकर्त्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाका फोडला

Mumbai Goa Highway News :मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन मनसे आता आक्रमक झाली आहे. मनसेने खळखट्याक आंदोलन सुरु केलं असून, टोलनाक्यांना लक्ष केलं आहे. मनसे कार्यकर्त्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाका फोडला आहे.रत्नागिरी-सिंधुदूर्गाच्या सीमेवर राजापूरमध्ये हा टोलनाका आहे. हा टोलनाका अद्याप सुरु झालेला नाही. पण त्याआधीच मनसेने तो फोडला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा असं आवाहन केलं होतं. तसंच सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे असं म्हटलं होतं. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

मनसेच्या एका कार्यकर्त्याने हातात झेंडा घेऊन टोलनाक्यावरील काचा फोडल्या. यावेळी त्याने तोंडावर रुमाल बांधला होता. हातातील काठीने काचा फोडल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. दरम्यान, या घटनेनंतर टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Loading

Mumbai-Goa Highway | पावसाळ्यात परशूराम घाटातील वाहतुक धोकादायक बनण्याची शक्यता

खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनीही व्यक्त केली भीती


Mumbai-Goa Highway |परशुराम घाटातील चौपदरीकरण करण्यासाठी केले जात असलेले डोंगर कटाईचे काम अजून अपूर्ण आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी पावसाळ्यापूर्वी येथील काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक पावसाळ्यात हे काम चालू असेपर्यंत धोकादायक बनून येथे दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनीही अशी भीती व्यक्त केली आहे.

डोंगर कटाईचे काम चालू असल्याने येथील काही भाग धोकादायक बनून पहिल्या पावसात केव्हाही दरड कोसळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कंत्राटदार कंपनीस येथील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काम जलद गतीने होण्यासाठी मध्ये घाट काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र डोंगर कटाई करताना मध्येच कठीण कातळ लागले होते. पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीमुळे सुरक्षिततेच्या कारणाने या कातळ भागात सुरुंग लावण्याची परवानगी पण नाकारली गेली होती. यामुळे कामाचा वेग मंदावला होता. त्यामुळे दिलेल्या अवधीत हे काम पूर्ण झाले नाही.

पावसाळ्यात काम चालू असताना सावधानता म्हणुन कंत्राटदार कंपनीला योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना देण्यात येतील. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यातही वाहनधारकांसह प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊनच घाटातून प्रवास करावा लागणार आहे असे दिसत आहे.

Loading

Mumbai Goa Highway | सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. रवींद्र चव्हाण यांना मुंबई-गोवा महामार्ग जन आक्रोश समितीतर्फे सविस्तर निवेदन

समितीच्या चिपळूण प्रतिनिधी ऍडव्होकेट स्मिता कदम यांनी महामार्गाची सद्य दुरावस्था व्यक्तिशः मांडली.  

 

Mumbai Goa Highway | सार्वजनिक बांधकाम मंत्रीमहोदय मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या अलीकडच्या चिपळूण भेटीत मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीच्या चिपळूण प्रतिनिधी ऍडव्होकेट स्मिता कदम यांनी भेट घेऊन सविस्तर निवेदनाचे पत्र दिले. मा. मंत्री महोदयांना भेटण्यापूर्वी ऍडव्होकेट स्मिता कदम यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाचे चिपळूण येथील शाखा अभियंता श्री. मराठे साहेब यांची भेट घेऊन समितीच्या पत्रामधील विषयावर सविस्तर चर्चा करून विषयाचे गांभीर्य समजवून सांगितले.  त्यामुळे मा. मंत्रीमहोदय हे सिंधुदुर्ग जिल्हयाचा दौरा करून चिपळूणला पोचल्यावर व्यस्त असूनही  केवळ समितीच्या प्रतिनिधी ऍडव्होकेट स्मिता कदम मॅडम आणि मीडियाचे प्रतिनिधीी  यांना वेळ दिला. ऍडव्होकेट स्मिता कदम यांनी  मा. मंत्रीमहोदयांना थोडक्यात विषयाचे गांभीर्य सांगताना समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे महामार्गाची प्रत्यक्ष परिस्थिती समजून आली आहे . मागील १३ वर्ष महामार्गाचे कामं रखडलं आहे आणि दरवेळी नवनवीन तारखाचे वायदे मिळत आहेत व ते वायदेही पाळले जात नाहीत. ३१ मे पूर्वी एक मार्गिका उपलब्ध करण्याचे आश्वासनही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे या बाबतीत कोकणी जनतेच्या भावना तीव्र होत असून कोकणातील जनता नाराज आहे. समितीच्या पत्रात व सोबत जोडलेल्या जोडपत्रात निवड्क टप्प्यातील सत्य परिस्थिती सविस्तर मांडली आहे. या बाबतीत सर्व मुद्दे चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या बरोबर आपल्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात मिटिंग लावली तर समितीचे प्रतिनिधी येऊन सविस्तर सांगतील, असे प्रतिपादन केले. ऍडव्होकेट स्मिता कदम यांच्या प्रश्नांना प्रतिसाद देताना मा. मंत्रिमहोदयांनी महामार्गाचे काम नोव्हेंबर मध्ये पूर्ण होईल आणि गणपतीपूर्वी किमान एक मार्गिका उपलब्ध होईल असे आश्वासन दिले.

Loading

निर्बंध हटणार; २ दिवसांनंतर परशुराम घाटातील वाहतुक नियमित होणार…

Mumbai Goa Highway News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटातील  चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी मागील काही दिवसांपासून निर्बंध आणण्यात आले होते. चौपदरीकरणा अंतर्गत घाटात तयार करण्यात आलेल्या मार्गिकेच्या भरावाचे बहुतांश काम पूर्ण झाल्यामुळे हा घाट नियमित वाहतुकीसाठी 11 मे पासून खुला करण्यात येणार आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. परशुराम घाटातील अवघड वळणावरील काम वाहतूक सुरू असताना पूर्ण करणे कठीण जाऊ लागल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी 25 एप्रिल ते 10 मे 2023 या कालावधीसाठी अंशतः बंद करण्यात आला होता. या कालावधीत दुपारी बारा ते पाच यावेळी हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. वाहतूक बंदी असलेल्या कालावधीत महामार्गावरील वाहतूक खेड तालुक्यामधील चिरणी -लोटे मार्गे वळवण्यात आली होती.

[email-subscribers-form id=”2″]

Loading

परशुराम घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद होणार?

रत्नागिरी-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा मार्गाच्या पूर्णत्वाची डेडलाइन दिल्यापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. कोकणवासीयां साठी ही एक चांगली बातमी म्हणावी लागेल. या महामार्गाचा एक धोकादायक भाग म्हणुन ओळखल्या जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील काम सुद्धा जलदगतीने सुरू आहे. या घाटावरील डोंगर कटाईचे काम चालू असल्याने वाहतूक अतिशय धोकादायक बनली आहे. या कामा दरम्यान, अधुनमधून रस्त्यावर दगड येत असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. 

अपघात होऊ नये या साठी दिवसातील काही तास परशुराम घाट वाहतुकीस बंद ठेवण्याची मागणी होत आहे. तसा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला गेला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परिणामी अतिशय धोका पत्करून या ठिकाणी वाहतूक सुरू आहे. 

वाहतुक सुरू ठेवून खोदकाम करण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठी खेड हद्दीतील ठेकेदार कल्याण टोलवेजने परशुराम घाटातील १२ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याची मागणी केली होती. तसा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभाग पेणकडून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी चिपळूण तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांना तो अहवाल देण्यात आला आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही आहे. मात्र सद्य परिस्थिती पाहता तो निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Loading

केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्या मुंबई- गोवा महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे भूमीपूजन

मुंबई- कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू , राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (राजेवाडी फाटा ते वरंध गाव) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाड गाव, ता.पनवेल येथे गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता संपन्न होणार आहे.

या भूमीपूजन सोहळा कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री ना.श्री.रविंद्र चव्हाण, राज्यसभा सदस्य खासदार श्री.कुमार केतकर, लोकसभा सदस्य, मावळ खासदार श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य, रायगड खासदार श्री.सुनिल तटकरे, विधानपरिषद सदस्य, सर्वश्री आमदार श्री.निरंजन डावखरे, श्री.अनिकेत तटकरे, श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार श्री.भरत गोगावले, श्री.प्रशांत ठाकूर, श्री.रविंद्र पाटील, श्रीमती आदिती तटकरे, श्री.महेंद्र थोरवे, श्री.महेश बालदी, श्री.महेंद्र दळवी यांची उपस्थिती राहणार आहे.

Loading

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची “कहाणी अधुरीच”… काम पुन्हा ठप्प

रायगड : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काही पूर्ण होण्याची चिन्हे दिसेनात. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या ठप्प आहे. जागोजागी खासकरून महामार्गाची वडखळ ते इंदापूर या पट्टय़ात दुरवस्था झाली आहे.

दुसरीकडे महामार्गावरील अपघातांचे दृष्टचक्र थांबताना दिसत नाही. रायगड जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत या मार्गावर ४९ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम २०११ साली सुरू झाले होते. २०२२ हे वर्ष सरायला आले तरी ८४ किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. मूळ ठेकेदाराची हकालपट्टी करूनही कामाला गती मिळू शकलेली नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत काम बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना खडतर परिस्थितीला सामोरे जात प्रवास करावा लागत आहे.

महामार्गाची दुरवस्था झालेली असतानाच महामार्गावरील अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या दहा महिन्यांत रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गावरील भागात १४५ अपघात झाले असून, त्यामध्ये ४९ जणांचा मृत्यू तर १६० जण जखमी झाले आहेत, त्यामुळे दुहेरी संकटाला कोकणवासीयांना सामोरे जावे लागत आहे.

कोकणातील जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे. कोकणच्या विकासाला उपयुक्त असा एक चौपदरी रस्ता मिळविण्यासाठी आजून किती वर्षे वाट पाहावी लागेल ह्याच उत्तर कोणाकडे नाही. कोकणातील नेते फक्त राजकारणात व्यस्त असल्याचे दिसत आहेत. ह्या प्रश्नासाठी तरी सर्व नेत्यांनी एकजुट दाखवावी अशी अपेक्षा कोकणवासीयां कडून केली जात आहे.

 

 

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search