Author Archives: Kokanai Digital

Mumbai Local | उद्यापासून मध्य रेल्वेचे एकापेक्षा दोन मोठे ब्लॉक; लोकल्सच्या ९३० फेर्‍या रद्द, प्रवाशांचे हाल होणार

   Follow us on        
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज रात्री पासून ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी ६३ तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत हा ब्लाॅक असेल. तर मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील १०-११ फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी ब्लाॅकची मालिका सुरू आहे. त्याचाच भाग म्हणुन आता अंतिम कामे करण्यासाठी सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक घेण्यात येईल. या कालावधीत मध्य रेल्वेवरील ९३० लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत तर, ८९० लोकल फेऱ्या अंशत: रद्द होतील. तसेच ७४ रेल्वेगाड्या रद्द होणार असून १२२ रेल्वेगाड्या अंशत:रद्द होणार आहेत. परिणामी, मध्य रेल्वेवरील  प्रवाशांचे हाल होणार आहे.



सीएसएमटी फलाट क्रमांक १०-११ वर सध्या १६ डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबत असून या फलाटावर २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी फलाटाचा विस्तार केला जात आहे. मध्य रेल्वेकडून हे काम पूर्ण करण्यासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सीएसएमटी येथील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या बहुतांशी मेल/एक्स्प्रेस रद्द, तर अंशत: रद्द करण्यात आल्या असून त्याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे. ब्लाॅक काळात मध्य रेल्वेवरील एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द होतील. शनिवारच्या दिवशी सुट्टीकालीन वेळापत्रक चालविण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत. ठाणे येथील फलाटाच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांची तारांबळ उडणार आहे
ब्लॉक १ – ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक
ब्लॉक कालावधी – गुरुवारी मध्यरात्रीच्या १२.३० ते रविवार दुपारपर्यंत
ब्लॉक २ – सीएसएमटी येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक
ब्लॉकची कालावधी – शुक्रवार मध्यरात्रीच्या १२.३० ते रविवार दुपारी १२.३० पर्यंत
ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद, धीमा मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल.
शुक्रवारी मध्य रेल्वेवरील १६१ लोकल फेऱ्या रद्द, शनिवारी ५३४ लोकल फेऱ्या रद्द आणि ६१३ लोकल अंशत: रद्द, रविवारी २३५ लोकल फेऱ्या आणि २७० लोकल अंशत: रद्द असतील. त्याप्रमाणे शुक्रवारी ४ रेल्वेगाड्या रद्द आणि ११ रेल्वेगाड्या अंशत: रद्द असतील. शनिवारी ३७ रेल्वेगाड्या रद्द आणि ३१ रेल्वेगाड्या अंशत: रद्द, रविवारी ३१ रेल्वेगाड्या रद्द आणि ८० रेल्वेगाड्या अंशत: रद्द असतील.
पश्चिम रेल्वेवरील रविवारचा ब्लाॅक न घेण्याचे कळविले आहे. त्यानुसार ते त्यांचा निर्णय घेतील. राज्याचे प्रधान सचिव यांना देखील ब्लाॅक संदर्भात माहिती दिली असून त्यांच्याद्वारे योग्य पावले उचलली जाणार आहेत. तसेच पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस विभागाला सीएसएमटी, भायखळा या परिसरात जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची विनंती केली आहे. बेस्ट उपक्रम, एसटी महामंडळ यांना देखील जादा बस सोडण्याबाबत कळवले आहे. बेस्ट उपक्रमाला सीएसएमटी, भायखळा, वडाळा भागात नियमित बस चालविण्यासह जादा २५ ते ३० बस चालवण्यात येण्याचे कळविले आहे. तसेच एसटी महामंडळाला पुणे, नाशिक, ठाणे, पनवेल येथे जादा बस सोडण्याचे कळविले आहे, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी सांगितले.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.



Loading

धक्कादायक! सावंतवाडी तालुक्यातील वेत्येत सापडली मानवी हाडे

   Follow us on        

सावंतवाडी दि. २८ मे. सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावातील कैलास धाब्याच्या पाठीमागे मानवी हाड कवटी सहित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वेत्ये रोडवर असलेल्या कैलास धाब्याच्या पाठीमागे काल संध्याकाळी येथील एका स्थानिकाला मानवी हाडे असल्याचे दिसली, त्यांनी संबंधित धाबे मालकाला याची कल्पना दिली त्यानंतर वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी घटनास्थळी येत पाहणी करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सदरची हाडे पंचनामा करून ताब्यात घेतली अधिक तपास सुरू आहे.

 

Loading

10th Result 2024: मराठी भाषा ‘नापास’ होत आहे

   Follow us on        
10th Result 2024: दोन दिवसांपूर्वीच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. मागच्या या वर्षी या परीक्षेचा एकूण निकाल 95.81% इतका लागला आहे. मागच्यावर्षी पेक्षा साधारण 1.98 % ने यामध्ये वाढ झाली असली तरीही या निकालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे मराठीमध्ये नापास झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मातृभाषेच्या विषयातच  हजारो विद्यार्थ्यांनी  गटांगळ्या खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना अशी स्थिती आहे.
प्रथम भाषा इंग्रजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच इंग्रजीमध्ये नापास होण्याचं प्रमाण हे मराठी प्रथम भाषा निवडून नापास होणाऱ्यांपेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांनी मराठी या विषयाची परीक्षा दिली. त्यापैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच राज्यामध्ये 38 हजार 437 विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत.
वाचकांच्या प्रतिक्रिया 
“एक काळ होता जेव्हा परकीयांची इंग्रजी भाषा दहावी बारावी परीक्षा पास होण्याकरता सर्वात मोठा अडथळा ठरत होती. आता मात्र चित्र उलट दिसत आहे. मराठी भाषा परकी होत चाललेली दिसत आहे.”
श्री. दिगंबर गणपत राणे, माहीम 
“राज्य शिक्षण मंडळाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना मराठी विषय अवघड का जात आहे याबाबत सविस्तर विश्लेषण केले पाहिजे आणि त्यानुसार शिक्षणपद्धतीत बदल केला गेला पाहिजे.”
सौ. आश्विनी रा. गवस, विरार

Loading

Palghar Train Accident: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येणार

   Follow us on        
Konkan Railway News:मंगळवारी संध्याकाळी पालघर स्थानकावरील दुर्घटनेमुळे गुजरात मुंबई दरम्यान होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. अजूनही रूळ वाहतुकीसाठी उपलब्ध झाले नसून काही गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेट व पर्यायी मार्गावरून वळविण्यात आलेल्या आहेत. या दुर्घटनेचा फटका कोंकण रेल्वेलाही फटका बसला असून पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकण मार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. यातील काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या असून त्याबाबत पश्चिम रेल्वेने प्रवाशांना प्रसिद्धी माध्यमातून सूचित केले आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील दोन गाड्या सुरत – जळगाव – इगतपुरी – कल्याण – पनवेल – रोहा या मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत.
१) दिनांक २८ मे रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३११  श्रीगंगानगर – कोचुवेली एक्सप्रेस
२) दिनांक २८ मे रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०९३२ इंदोर – कोचुवेली एक्सप्रेस

Loading

पालघर मालगाडी दुर्घटना: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्या रखडणार

   Follow us on        

Palghar Train Derailment : पश्चिम रेल्वेच्या पालघर येथे यार्डात मालगाडी घसरल्याने सुरत ते मुंबई अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. मालगाडीत मोठ्या प्रमाणावर लोखंडी प्लेटची वाहतूक केली जात होती. या घटनेनंतर मालगाडीचा डबे उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. या अपघातानंतर अनेक गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट केले आहे तर काही गाड्यांना वळविण्यात आले आहे. मात्र या मार्गावरील धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाणार्‍या खालील दोन गाड्यांचा समावेश आहे.

आज दिनांक २८ मे या दिवशी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १२४३२ – हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस.

आज दिनांक २८ मे या दिवशी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १९२६०– कोचुवेली एक्सप्रेस.

पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर मालगाडीचे 7 डब्बे रुळावरून घसरले आहेत. डहाणूवरून मुंबईच्या दिशेने येणारी सर्व रेल्वे वाहतूक सेवा त्यामुळे ठप्प झाली आहे. लोखंडी कॉइल घेऊन गुजरातवरून मुंबईच्या अप दिशेने येणाऱ्या मालगाडीचे डबे पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर घसरले आहेत. रुळावर मालगाडीचे डब्बे तीन डबे घसल्याने, दोन्ही रेल्वे रुळावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. पालघर रेल्वेस्थानाकात एकूण चार रेल्वे मार्ग आहेत. सध्या मुंबई, विरारहून डहाणू, गुजरातच्या दिशेला जाणारी रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे. मात्र गुजरातवरून मुंबई, विरारकडे येणारी सेवा ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासन, पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ सर्व यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली आहे. यंत्रसामुग्री आणून घसरलेले डब्बे बाजूला करून रेल्वे सेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल असे म्हटले जात आहे.

Loading

प्रवाशांचे हाल संपता संपेनात; अजून एका एक्सप्रेसची सेवा ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित

   Follow us on        
Konkan Railway News:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म नंबर 10 आणि 11 चे काम सुरू असल्यामुळे कोंकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सेवा दादर आणि पनवेल पर्यंत काही  कालावधीसाठी मर्यादित केली आहे, त्यामध्ये आता ११००४ सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस या गाडीचीही भर पडली आहे.
कोकण रेल्वेने आज दिनांक २८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार दिनांक २८ मे ते ०२ जून पर्यंत ११००४ सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस या गाडीची सेवा ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित Terminate करण्यात येणार आहे.
ऐन हंगामात प्रवाशांना मनस्ताप
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांची सेवा पनवेल, दादर आणि ठाणे या स्थानकापर्यंत मर्यादित केली असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मांडवी एक्सप्रेस ही गाडी पनवेल स्थानकापर्यंत  चालविण्यात येत आहे. मात्र तिचे वेळापत्रक पाळले जात नसून तिला पनवेल पर्यंत पोहोचायला उशीर होत आहे. अनेकदा त्या वेळेपर्यंत पनवेल ते ठाणे या लोकल मार्गावरील लोकल सेवा रात्री बंद होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवासात वरिष्ठ नागरिक, लहान मुलांना सांभाळत घरी पोहोचणे जिकरीचे झाले आहे.

Loading

खळबळजनक: रत्नागिरीतील कंपनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८ जणांची फसवणूक केल्याचे उघड; गुन्हा दाखल

   Follow us on        
कुडाळ, दि.२८ मे: रत्नागिरी येथील एका कंपनीने सिंधुदुर्गात २.२५ कोटीची फसवणूक केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी येथील एका जॉब वकर्सच्या नावाखाली प्रस्थापित झालेल्या प्रा. लि. कंपनीच्या विरोधात सिंधुदूर्गातील ७८ जणांनी आपली २.२५ कोटीची फसवणूक झाल्याचा गुन्हा कुडाळ पोलिसांत दाखल केला आहे.
ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील असून जॉब वकर्सच्या नावाने या कंपनीने सिंधुदुर्गातही आपली शाखा उघडली होती. विशेष म्हणजे पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा कार्यरत होती. रत्नागिरीत या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी कुडाळ पोलिस ठाणे आवारात गर्दी केली. यावेळी ७८ जणांनी एकत्र येत आपल्या फसवणूकीची तक्रार कुडाळ पोलिसांकडे दिली आहे. त्यावर ७८ जणांची नावे व त्यासमोर आपण जमा केलेली रक्कम टाकण्यात आल्याचे समजते. यामध्ये २५ हजारांपासून १ लाख ७५ हजारांपर्यंतची रक्कम नमुद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जवळपास २ कोटी २५ लाख रुपयांची ही ७८ जणांची रक्कम आहे.
दरम्यान, फसवणूक झालेल्यांचा आकडा अजुनही मोठा असून रक्कमही त्याच पटीत वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांत रितसर तक्रार झाली नसल्याचे सांगण्यात आले असून या फसवणुकीत अनेक जनसामान्यांना गंडा बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तकार दारांच्या अर्जाची दखल घेऊन फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगाब्लॉक; दोन गाड्या उशिराने धावणार

   Follow us on        
Konkan Railway News: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी  आहे. येत्या शुक्रवारी दिनांक २४/०५/२०२४ रोजी सकाळी  ०७:०० ते ०९:०० या वेळेत सावर्डा – भोके विभाग दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे रेल्वेसेवेवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम जं. – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसचा या गाडीचा दिनांक २३/०५/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी ते मडगाव जंक्शन दरम्यान ११० मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. २०९२३ तिरुनेलवेली – गांधीधाम एक्सप्रेसचा दिनांक २३/०५/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी ते मडगाव जंक्शन दरम्यान ७० मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

प्रवाशांना दिलासा; कोकण रेल्वे मार्गावरील विशेष गाडीचा जून १५ पर्यंत विस्तार

   Follow us on        
Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीत कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या एका विशेष गाडीची सेवा १५ जूनपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक 07309 / 07310  वास्को दा गामा – मुझफ्फरपूर जं. – वास्को द गामा विशेष (साप्ताहिक) गाडीच्या सेवेचा विस्तार होणार आहे. संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे
07309 वास्को दा गामा – मुझफ्फरपूर जं. (साप्ताहिक) विशेष  या गाडीची सेवा दिनांक 08/05/2024 या दिवशी समाप्त होणार होती. मात्र आता ही गाडी दिनांक 12/06/2024 पर्यंत चालविण्यात येणार आहे.ही गाडी  वास्को द गामा येथून दर बुधवारी संध्याकाळी 16:00 वाजता सुटेल ती  मुझफ्फरपूर जंक्शनला तिसऱ्या दिवशी सकाळी 09:45 वाजता पोहोचेल.
07310 मुझफ्फरपूर जं. – वास्को दा गामा (साप्ताहिक) विशेष  या गाडीची सेवा दिनांक 11/05/2024 या दिवशी समाप्त होणार होती. मात्र आता ही गाडी दिनांक 15/06/2024 पर्यंत चालविण्यात येणार आहे. ही गाडी मुझफ्फरपूर जंक्शन येथून दर शनिवारी दुपारी 13:00 वाजता निघेल ती तिसऱ्या दिवशी सकाळी 06:30 वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छोकी, पं. . दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण 20 एलएचबी कोच = 2 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी इकॉनॉमी – 02 कोच, स्लीपर – 10 डबे, जनरल – 04 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; कुठे चेक कराल?

   Follow us on        

CBSE Board 12th Result Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने यंदाच्या वर्षातील इयत्ता आज बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये बारावीच्या परीक्षेत एकूण 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या या परीक्षेत सुमारे 17 लाख विद्यार्थी बसले होते.या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 91% मुलीं या परीक्षेत पास झाल्या आहेत. तर मुलांचा निकाल 85.12% एवढा लागला आहे.

या लिंकवर पाहा तुमचा निकाल

cbseresults.nic.in

results.cbse.nic.in

cbse.nic.in

cbse.gov.in

digilocker.gov.in

results.gov.in

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search