सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपास वर एक अपघात झाला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरून कणकवलीच्या दिशेने वेगात जाणारी कार ब्रिजवरून थेट महामार्गा वरून खाली कोसळली. या अपघातात रुपेश पांडुरंग तांबे ( ३५, रा. जिल्हा कारवार, कर्नाटक ) हा जखमी झाला असून त्याला उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारवार येथून तो कणकवली येथे जात असताना मळगांव हायवे ब्रीज वर हा अपघात घडला.
पनवेल: पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांच्या आसपास सौम्य हादरे होऊन कंप झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी अनेक इमारती हालल्याचं बोललं जात आहे. तसंच घरातील समानदेखील काहीसं हलताना दिसून आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. भूकंपाच्या 2.9 रिश्टर स्केलच्या सौम्य धक्क्याने नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता.
हादरे येण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि आणि काही सेकंदासाठी कंप झाल्याचं जाणवलं. मात्र हा धक्का सौम्य असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. अरबी समुद्रात भूकंपाचं केंद्र होतं. दुपारी वेधशाळेने माहिती दिल्यानंतर पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.
मुंबईच्या समुद्र किनारपट्टीतील भूगर्भात काही सेकंदांसाठी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता. काही सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले होते. काहींना हा नक्की भूकंप होता का अशी शंका आल्याने त्यांनी खिडक्याही उघडून पाहिल्या. दरम्यान प्रशासनालाही नेमकं काय झालं होतं याची माहिती मिळवण्यासाठी वेळ लागला. अखेर वेधशाळेने खात्रीशीर माहिती दिल्यानंतर पालिकेने अधिकृतपणे भूकंप आल्याचं जाहीर केलं.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी रत्नागिरी ते वैभववाडी रोड या विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ०८:३० ते ११:०० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक मुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
सावंतवाडी :सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यासाठी व नवीन रेल्वे गाड्यांना सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्यासाठी पुरेसे माध्यम असताना तसेच या स्थानकावरील अवलंबून प्रवासी वर्गाला, सावंतवाडीतील नागरिकांना, वेंगुर्ले व दोडामार्ग मधील नागरिकांना आणि कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विश्वासात न घेता कोकण रेल्वे प्रशासनाने वारंवार सावंतवाडी टर्मिनस (?) वर जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने सावंतवाडीवासियांनी एकदिलाने व एकजुटीने वेळीच एकत्र येऊन कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात लढ्यासाठी चर्चा आणि विचार विनिमय करून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, व सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बचाव समिती 2.0 स्थापन करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांची सभा रविवार दिनांक २६/११/२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री राम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आयोजित केली असल्याचे सावंतवाडी टर्मिनस प्रेमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले असून या सभेस सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे.
अलीकडेच कोकण रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने सावंतवाडीकरांना रेल्वेच तिकीट परवडत नाही म्हणून खिल्ली उडवली होती तोच प्रत्यय पुन्हा देखील घडला, ही अपमानास्पद वागणूक न कळतपणे सावंतवाडीकरांची आहे.या साठी सनदशीर तसेच कायदेशीर मार्गाने जाण्याची तयारी केली पाहिजे, या संदर्भात तरी या सभेला आपली उपस्थिती प्रार्थनीय असून या सभेस आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन ॲड, श्री संदीप निंबाळकर, श्री अभिमन्यू लोंढे, श्री मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
Rain Alert : भारतीय हवामान खात्याने येत्या ५ दिवसांचा राज्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून काही विभागांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना तसेच कोल्हापूर,सातारा ,पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक २५ नोव्हेंबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यासोबत राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यासोबत राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र नाशिक विभागातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी कोकणातील कोणत्याही जिल्ह्याला सावधानतेचा इशारा देण्यात आला नाही आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत मोठा बदल केला जाणार आहे. आता त्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होतील. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी आगामी २०२४-२५ किंवा २०२५-२६च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
दहावी, बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या करिअरचा पाया मानला जातो. विद्यार्थ्यांमध्ये त्या परीक्षांची नेहमीच चिंता असते आणि पालकांवरही ताण असतो. अनेकजण विशेषत: मुली अनुत्तीर्ण झाल्यावर अर्ध्यातूनच शिक्षण सोडतात.या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याची तयारी सुरू झाली असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा, अभ्यासक्रमासह इतर १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांची मते मागविली आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल काही करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी की बदलावी, असे तुम्हाला वाटते का? अशा प्रश्नांवर त्यांची मते मागवून घेतली आहेत. त्याचा विचार करून दोन वर्षांत नवीन पद्धत अवलंबली जाणार आहे.पाठांतराची सवय कमी करण्याचा प्रयत्ननवीन अभ्यासक्रमात पुस्तकांचा मजकूर कमी करून ते मनोरंजक आणि समर्पक बनविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुस्तकांच्या आशयाची सांगड घातली जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी, ती वैचारिक बनविण्याचाही अभ्यासक्रमातून प्रयत्न होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
नवीन बदल असा असणार… शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच अध्यापन करतील. पण, पदवी तथा पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांप्रमाणे दहावी- बारावीच्या परीक्षाही सत्र पद्धतीनेच होतील. पहिले सत्र दिवाळीपूर्वी घेले जाणार असून पुढील सत्र मार्च महिन्यात होईल. तत्पूर्वी, त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल. शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. तत्पूर्वी, पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहेत.सेमिस्टर पॅटर्नचा हेतू…विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांच्यावरील ताण कमी होईलएका सत्रात कमी गुण मिळाल्यास दुसऱ्या सत्रात त्यांना जास्त अभ्यास करण्याची संधीअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सहा महिन्यातच पुन्हा संधी मिळेल आणि त्यामुळे अर्ध्यातून शाळा सोडणे थांबेल
रत्नागिरी: राजापूर आडवली येथील आदिती पडयार ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली कोकणसुकन्या मेट्रो चालक ठरली आहे. नवी मुंबई येथे सुरू झालेल्या मेट्रोच्या शुभारंभाची ट्रेन चालवण्याचा मोठा बहुमान या कोकणकन्येला मिळाला आहे.
आदिती पडयार यांना मुंबई येथील मोनोरेलमध्ये ट्रेन कॅप्टन म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. मोनोरेलमधील दोन वर्षाच्या अनुभवानंतर आता आदिती पडियार मेट्रो चालक आहेत. नवी मुंबई येथे शुभारंभ दिवशी त्यांना २२ किलोमीटरची पॅसेंजर मेट्रो ट्रेन चालवली. महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवला तर त्या कोणत्या क्षेत्रात भरारी घेऊ शकतात अशा शब्दात अदिती पडियार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोकणातील सगळ्याच मुलींनी आता आत्मनिर्भर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
आपल्याला मेट्रो चालवण्याची संधी मिळाल्यानंतर मला कोकणातून गावावरून अभिनंदन व कौतुकाचे कॉल येत आहेत. त्यावेळेला वाटत असेल तर समाधान खूप मोठ आहे अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या. मला भविष्यात अशा आव्हानात्मक संधी मिळाल्या तर नक्कीच मी त्याचा उपयोग करेन, असाही आत्मविश्वास यांनी पत्रकारांशी व्यक्त केला. नवी मुंबईतील मेट्रो चालक पदावर काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आदिती पडियार यांचे सामाजिक शैक्षणिक, राजकीय आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आलं आहे.
बांदा: पत्रादेवी चेकनाक्यावरून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याच अनुषंगाने थेट पत्रादेवी-गोव्याच्या हद्दीत ज्या ठिकाणी मोपा हद्दीतला पत्रादेवी पोलिस चेकनाका आहे.
त्या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिस मोठ्या प्रमाणात गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करत असल्याचे चित्र शनिवारी (ता.१८) सायंकाळी दिसून आले.
याविषयी महाराष्ट्र पोलिस निरीक्षक पवार यांच्याशी संपर्क साधला असता गोवा आणि महाराष्ट्र पोलिसांचे चांगले संबंध राहावेत. त्यासाठी संयुकरतीत्या ही मोहीम राबवली जात आहे. वेळप्रसंगी गोव्यातील पोलिस महाराष्ट्र हद्दीमध्ये येऊन महाराष्ट्रातील वाहने गोव्यात जात असतील आणि एखाद्यावेळी संशय असेल तर तेसुद्धा तशा प्रकारची तपासणी करू शकतात, असे सांगितले.
मागच्या काही महिन्यांपासून गोव्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत होती. पत्रादेवी चेकनाक्यावर न सापडणारी वाहने थेट सिंधुदुर्गातील बांदा, इन्सुली, आरोस या भागात अडवली जात होती आणि लाखो रुपयांची दारू हस्तगत करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पोलिस करत होते.
मात्र, पेडणे अबकारी विभागाकडून तशा प्रकारची कारवाई का होत नव्हती, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी गोव्याच्या हद्दीमध्ये येऊन मागच्या तीन दिवसांपासून ही नाकाबंदी सुरू केलेली आहे. केवळ दुचाकी नव्हे तर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असल्याचे चित्र पत्रादेवी चेकनाक्यावर प्रत्यक्ष भेट दिली असता दिसून आले.
Konkan Railway News 20/11/2023 : ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. त्यांच्या सोयीसाठी रेल्वे तर्फे मुंबई आणि पुण्यावरून काही विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. आज या गाड्यांच्या आरक्षणाची तारीख पण जाहीर करण्यात आली आहे.
1)खालील विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 21 नोव्हेंबर पासून पिआरएस PRS काऊंटर वर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात येणार आहे.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या मंगळवारी करंजाडी ते कामथे विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२:४० ते १५:१० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक मुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 02197 Coimbatore – Jabalpur Special
दिनांक २० नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते संगमेश्वर रोड या स्थानकांदरम्यान ११० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
१) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक २१ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी ते संगमेश्वर रोड या स्थानकांदरम्यान ७० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.