Author Archives: Kokanai Digital

Mumbai Goa Highway | बांदा-पत्रादेवी येथे लवकरच टोल ‘वसुली’…….

Mumbai Goa Highway: गोव्यात जाणे आता महागणार आहे. गोवा राज्यात जाणाऱ्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पर्यटकांच्या वाहनांना आता टोल देणे बंधनकारक होणार आहे. गोवा राज्याच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर टोलनाके बसवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना. नितीन गडकरी यांनी पणजी (गोवा) येथे दिले. तीन राज्यांचे प्रमुख मंत्री आणि रस्ते वाहतूक संचालकांच्या बैठकीमध्ये हे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. त्यामुळे आता गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या वाहनांसाठी बांदा – पत्रादेवी बॉर्डरवर टोल नाका कार्यान्वित होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

पणजी गोवा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह तीन राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल लागणार असून हा टोलनाका गोव्याच्या एन्ट्री पॉईंटवर बसविण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव गोवा शासनाकडून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आला आहे. ना. नितीन गडकरी यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र – गोवा राज्याच्या सीमेवर बांदा येथे आरटीओ विभागाचा टोलनाका सुमारे ३२ एकर जागा संपादन करून याआधीच उभारण्यात आलेला आहे. मात्र कधीपासून टोल घेण्यास सुरुवात करणार, कोणाला या टोल मधून सवलत असेल, टोलचे दर काय असतिल याची अद्याप निश्चिती झालेली नाही.

Loading

नवीन वर्षात गोव्यात पर्यटनासाठी जात असाल तर ही बातमी वाचाच; गोव्यातील मंदिर समित्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Goa News:गोव्यात पर्यटनासाठी जगभरातून पर्यटक येतात. गोव्यातील समुद्रे किनारे जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढीच येथील मंदिरेही प्रसिद्ध आहेत. या मंदिरांना सुद्धा लाखो पर्यटक भेट देताना दिसतात. मात्र पर्यटकांच्या कपड्यांवरून मंदिर समित्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून येत्या 1 जानेवारीपासून गोव्यातील मंदिरांमध्ये कडेकोट ड्रेस कोड लागू होणार आहे. मात्र लहान मुलांना यातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिर हे फॅशन दाखवण्याचे ठिकाण नाही, असे व्यवस्थापनाचे मत आहे. अनेक पर्यटक येथे आधुनिक कपडे घालून येतात ज्यामुळे प्रतिष्ठा राखली जात नाही. त्यामुळे लहान कपड्यांमध्ये कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
गोव्यातील फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थानने म्हटले आहे की, मंदिराचे पावित्र्य आणि आदर राखण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व पर्यटकांसाठी कठोर ड्रेस कोड लागू केला जाईल. शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, मिडी, स्लीव्हलेस टॉप, लो-राईज जीन्स आणि शॉर्ट टी-शर्ट परिधान केलेल्या लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. गोव्यातील सुप्रसिद्ध श्री मंगेश देवस्थाननेही नवीन वर्षापासून अतिशय कडक ड्रेस कोड लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाविकांनी योग्य कपडे घालूनच मंदिरात यावे.
मंदिर समिती देणार कपडे
अयोग्य कपडे घालून मंदिरात येणाऱ्यांना मंदिर समितीतर्फे छाती, पोट, पाय झाकण्यासाठी लुंगी किंवा कापड दिले जाईल. त्यामुळे आत्तापर्यंत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
श्री रामनाथ देवस्थानचे अध्यक्ष फोंडा म्हणाले की, आम्ही 1 जानेवारीपासून ड्रेस कोड लागू करणार आहोत. यासाठी आम्ही एक सूचना जारी केली असून मंदिर परिसरात फलकही लावला आहे. पर्यटकांना जागरूक करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटक अनेकदा सभ्य कपडे घालून येतात. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी लहान कपडे घालून कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
मंदिरांनी म्हटले आहे की 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या ड्रेस कोडमधून सूट दिली जाईल, परंतु 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आणि प्रौढांना ड्रेस कोडचे पालन करावे लागेल. जर कोणी लहान कपडे घालून आले तर त्याला स्मोक आणि लुंगी दिली जाईल. हे परिधान करून तुम्ही मंदिराला भेट देऊ शकाल. यापूर्वीही या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात आले नव्हते. आता आम्ही ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करू.

Loading

कोंकण रेल्वे मार्गावर मंगळवारी मेगाब्लॉक; दोन गाड्या उशिराने धावणार

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या मंगळवारी (२६ डिसेंबर) कळंबणी बुद्रुक ते कामथे या विभागां दरम्यान  रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सुमारे अडीच तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. दुपारी १२:४० ते १५:१०  या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 02197 Coimbatore Jn. – Jabalpur Special
दिनांक २५ डिसेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कणकवली ते संगमेश्वर रोड या स्थानकांदरम्यान  १ तास ४५ मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
२) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक २६ डिसेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान १ तास १०  मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.

Loading

कोकण: पर्यटन क्षेत्रात महिला व्यावसायिकांना ‘आई’ चा मदतीचा हात …लाभ कसा घ्याल ?

रत्नागिरी : कोकणात पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग आता दिसायला लागला आहे. होम स्टे, हॉटेल रेस्टॉरंट आणि इतर व्यवसायात महिला महिला व्यावसायिक छाप पाडताना दिसत आहे.  अशा महिलांसाठी राज्यसरकारने यावर्षी  ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण आखले आहे. महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही या धोरणाची पंचसुत्री महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत तयार केली आहे.
या योजने अंतर्गत खालील फायदे मिळतील. 
प्रत्येक तालुक्यात पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवलेल्या १० पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याजाची रक्कम १२ टक्केच्या मर्यादेत, त्यांच्या आधार लिंक बँकखात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम ४ लाख ५० हजारांच्या मर्यादेपर्यंत या तीन पर्यायांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत दरमहा पुढील अटींच्या अधीन राहून जमा करण्यात येईल.
या अटी असतील 
पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे. पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवलेल्या असल्या पाहिजेत. महिलांच्या मालकीच्या हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात, कर्जाचे हप्ते वेळेत भरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, महिला बचतगटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादींच्या विक्रीसाठी स्टॉल, जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
रिसॉर्टसमध्ये महिला पर्यटकांसाठी विशेष सुविधा, महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस, महिला केंद्रित पर्यटन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष स्थापन करण्यात येईल. महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तयार करण्यात आलेल्या आई या महिला केंद्रित पर्यटन धोरणासाठी वार्षिक कृती आराखडा निश्चित केला आहे.
अर्ज आणि इतर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून PDF  डाउनलोड करावा. हि माहिती शक्य होईल तितकी समाज माध्यमांवर फॉरवर्ड करा जेणेकरून आपल्या कोकणातील भगिनी याचा लाभ घेऊन स्वावलंबी होतील

Loading

मुलुंड स्थानकावर ‘वुलू महिला पावडर रूम’ चे उद्घाटन; फक्त १ रुपयात ‘या’ सुविधा मिळणार

Mumbai : मध्य रेल्वेने महिला प्रवाशांसाठी सुविधेकरिता शुक्रवारी मुलुंड स्थानकावर वुलू WOLOO  महिला पावडर रूमचे उद्घाटन केले. मुलुंड येथील पावडर रूम हे केवळ स्वच्छतागृह नसून सुविधा आणि लक्झरी यांचे एक चांगले उदाहरण आहे असल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे.
पावडर रूममध्ये कोणत्या सुविधा आहेत ?
वाय-फाय, मध्यवर्ती वातानुकूलित अंतर्गत भाग आणि वर्धित सुरक्षिततेसाठी प्रवेश नियंत्रण सॉफ्टवेअरसह सुसज्ज,स्वच्छ स्वच्छतागृह तसेच आनंददायी वातावरण या पावडर रूम मध्ये असणार आहेत. तसेच येथे  महिला-केंद्रित उत्पादनांचा साठा असलेले किरकोळ स्टोअर देखील आहे.
या पावडर रूमच्या एकवेळ वापर करण्यासाठी 10 रुपये प्रति व्यक्ती आकारण्यात येणार असून याचे वार्षिक  सबस्क्रिप्शन सुद्धा उपलब्ध आहे. मात्र ३६५ रुपये भरून ही पावडर रूम वर्षभरासाठी वापरू शकता. वार्षिक सुसंबक्रिप्टिव घेतल्यास ही पावडर रूम वापरण्यासाठी प्रतिदिवस मात्र एक रुपया एवढे चार्जेस द्यावे लागणार आहे.
मुंबई विभागातील  सहा अतिरिक्त स्थानकांवर देखील अशा पावडर रूमची स्थापना करण्याचा मध्य रेल्वेचा हेतू आहे. एलटीटी, घाटकोपर, कांजूरमार्ग, ठाणे, मानखुर्द आणि चेंबूर या स्थानकांवर हे पावडर रूम लेकराचं बांधले जाणार आहेत.

Loading

Konkan Railway | वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवेचा मंगुळुरु पर्यंत विस्तार होणार

Konkan Railway News:  मडगाव – मंगळुरु सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी दक्षिण रेल्वे सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी देशातील इतर पाच गाड्यांबरोबर  या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती समोर आली आहे. या आधी मुंबई ते मडगाव वंदे भारत कोकण रेल्वे मार्गावर चालत आहे. मडगाव – मंगळुरु सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केल्यानंतर वंदे भारत या प्रीमियम गाडीची सेवा दक्षिणेच्या मंगळुरु स्थानकापर्यंत विस्तारित होणार आहे.
दक्षिण रेल्वेच्या पलक्कड विभागाने या बातमीची  पुष्टी केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरुण कुमार चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, विभागाने मंगळुरू सेंट्रल येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उदघाटनासाठी विस्तृत तयारी केली गेली आहे.
प्राथमिक माहितीनुसार,ज्याची विभागाकडून पुष्टी करण्यात आलेली नाही आहे, ही गाडी मंगळुरु सेंट्रल येथून सकाळी ८.३० वाजता निघून दुपारी १.०५ वाजता मडगावला पोहोचेल, परतीच्या प्रवासात वंदे भारत एक्सप्रेस मडगावहून संध्याकाळी 6.10 वाजता सुटून, मंगळुरु सेंट्रलला रात्री 10.45 वाजता पोहोचेल. या गाडीला दोन्ही स्थानकामध्ये फक्त उडपी आणि कारवार येथे थांबे असतील.
कनेक्टेड सेवेचा लाभ
मडगाव साठी ही गाडी मंगळुरु सेंट्रल येथून सकाळी ८.३० वाजता निघून दुपारी १.०५ वाजता मडगावला पोहोचणार आहे. सध्याच्या २२२३० मडगाव – मुंबई या गाडीची मडगाव वरून मुंबईसाठी निघण्याची वेळ दुपारी १४:४० अशी आहे. त्यामुळे मंगुळुरु येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक सोयीची कनेक्टेड सेवा उपलब्ध होणार आहे. वेळेमध्ये काहीसा बदल केल्यास मुंबई ते मंगुळुरु साठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा ही गाडी  एक कनेक्टेड सेवेचा पर्याय बनू शकते.

Loading

सावधान: कोकण रेल्वे मार्गावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले; संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये साडेपाच लाखांच्या मुद्देमालाची चोरी

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून, किमती वस्तू बरोबर घेऊन प्रवास करणे आता मोठे जिकिरीचे झाले आहे.. कोचिवली-चंदीगड संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने ५ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी सव्वासहाच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाईन कुन्नेल दिवाकरण (वय ४९, रा. सुरत, गुजरात) हे संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. ते झोपेत असल्याचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्याकडील ४ लाख ७७ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने, ३३ हजारचे डायमंड इअररिंग, २ हजार ६०० रुपयांचे चांदीचे दागिने, ३० हजारांची पाच घड्याळे, ४ हजार ५०० रुपये रोख व कागदपत्रे असा सुमारे ५ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल चोरला. या प्रकरणी दिवाकरण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस अमलदार करत आहेत.

Loading

जेएन व्हेरिएंट गोव्यातही पोहोचला; आतापर्यंत १९ रुग्णांची नोंद

Goa News: देशात नव्याने आढळलेला कोविडचा जेएन व्हेरिएंट गोव्यातही पोहोचला आहे. गोव्यात आतापर्यंत ह्या व्हायरसचे १९ बाधित आढळल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

गोव्यात कोविड चाचण्यांबरोबरच जीनोम सिक्वेन्सिंगही सुरू करण्यात आल्यामुळे कोविडची प्रकरणे वाढल्यानंतर पुन्हा एकदा जिनोमिंग सिक्वेस्सिंगसाठीही सेम्पल्स पाठविणे सुरू केले होते. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळातील जिनोमिंग विभागाने आरोग्य संचानलालयाला पाठविलेल्या अहवालानुसार जेएन १ चे १९ बाधित सापडले आहेत. यामुळे खळबळही माजली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात कोविडच्या केसेस वाढू लागल्याची वस्तुस्थिती मान्य करतानाच लोकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले. लोकांनी केवळ काळजी घ्यावी. आरोग्य यंत्रणे स्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना आवश्यक सूचना केल्या असून या बैठकीत गोव्याचे आरोग्यमंत्री विशवजित राणे सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.केंद्रीय मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्यानी बैठकीत केंद्रीय मंत्र्यांकडून करण्यात आलेल्या सूचनांची माहती दिली. तूर्त कोणतीही मार्गदर्शिका केंद्राने जारी केली नसल्याचे राणे यांनी सांगितले परंतु खबरदारी घेणे आणि आरोग्य यंत्रणे सज्ज ठेवणे याकडे लक्ष दिल्याचे सांगितले.

Loading

कोकण रेल्वेची ‘फुकट्या’ प्रवाशांवर कारवाई; एका महिन्यात तब्बल २ कोटींचा दंड वसूल

Konkan Railway News :कोकण रेल्वेमार्गावर गर्दीचा फायदा घेऊन फुकट प्रवास करणाऱ्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, एका नोव्हेंबर महिन्यात २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कोकणकन्या, मांडवी, दिवा-सावंतवाडी, तुतारी यासारख्या गाड्या दररोज हाऊसफुल्ल असतात. गर्दीचा फायदा घेऊन अनेकजणं फुकट प्रवास करतात. यामध्ये कोकण रेल्वेचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पथके निश्‍चित केली आहेत. काहीवेळा अर्धे तिकिट काढून पुढे प्रवास केला जातो. काहीजण जनरल तिकिट काढून आरक्षित डब्यामधून प्रवास करतात. काहीवेळा तर आरक्षित डब्यातील तिकीटच न काढता प्रवास केला जातो.

विनातिकीट प्रवास करताना कोणी प्रवास सापडला तर त्या त्या परिस्थिनुसार दंडाची रक्कम आकारली जाते. नोव्हेंबर महिन्यात गाड्यांची गर्दी लक्षात घेऊन केलेल्या तपासणीमध्ये ७ हजार १३ जणांनी विनातिकीट प्रवास केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये काही प्रवाशांना तिकिटाच्या तिप्पट रक्कमही भरणा करावी लागली आहे. भविष्यातही संपूर्ण मार्गावर या पद्धतीने तिकीट तपासणी मोहीम तिव्रतेने राबवण्यात येणार आहे.

Loading

मध्यरेल्वेतर्फे २२ विशेष गाड्यांच्या मुदतीत वाढ; कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ गाडीचा समावेश.

Konkan Railway News :प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची कालावधी फेब्रूवारी/मार्च पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण २२ विशेष गाड्यांचा यात समावेश असून एकूण ११०६ अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
यात कोकण रेल्वे मार्गावरील आठवड्यातून दोन दिवस धावणारी ०११३९/०११४० नागपूर-मडगाव- नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीची सेवा या वर्षाच्या डिसेंबर अखेरीस संपणार होती. मात्र तिची सेवा मार्च अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूने एकूण ५२ फेऱ्या या गाडीच्या होणार आहेत. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे, डब्यांच्या संरचनेनुसार धावणार असून तिच्या थांब्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे.
या गाडीचे आरक्षण दि. २२ डिसेंबर, २०२३ सकाळी ८ वाजल्यापासून आरक्षण केंद्रे व IRCTC वेबसाईटवर सुरू होईल.
थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी
   

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search