Author Archives: Kokanai Digital
Rain Alert :आज दिनांक 30 सप्टेंबर आणि उद्या दिनांक 01 ऑक्टोबर रोजी कोकणात जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात जोरदार वारे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.मॉन्सूनची परतीची सीमा कायम असून, दोन ते तीन दिवसांत वायव्य भारताच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. कर्नाटक किनारपट्टीच्या भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र कायम आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती टिकून आहे. बंगालचा उपसागरासह अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे.राज्यात जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
आज आणि उद्यासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर या भागात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट तर सातारा, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कणकवली : तालुक्यातील वागदे येथील हॉटेल वक्रतुंड नजीक आज पहाटे एका टेम्पो रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात टेम्पो रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.
सदरचा टेम्पो फळे घेऊन कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जात होता. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाताचे कारण समजले नसले तरी टेम्पो उलटून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये एका फळ व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. त्या फळ व्यावसायिकाच्या मृत्यूची माहिती कळताच कणकवली शहरातील बहुसंख्य फळ व्यावसायिकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.
वेंगुर्ले: गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील सर्वात मोठा सण. दिवाळी पेक्षाही मोठया उत्साहाने हा सण साजरा केला जातो. तसेच हा सण म्हणजे अनेक कलाकारांना आपली कला एक संधीच असते जणू. मूर्ती शिल्पकार, मखर कलाकार आणि भजनी गायक या संधीचा लाभ घेऊन आपल्या कला सादर करताना दिसतात. आरवली सोनसुरे येथील प्रसिद्ध कलाकार रविराज चिपकर यांनी या गणेशोत्सवात आपली कला सादर केली आहे. सागरतीर्थ समुद्र किनारी गणपतीला भावपुर्ण निरोप देताना रविराज चिपकर यांनी प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे साकारलेले वाळूशिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आज संध्याकाळी भाविकांनी अकरा दिवसांच्या गणेश मूर्तींचे जड अंतःकरणाने करत आहेत. याच धर्तीवर प्रसिध्द वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विसर्जनाला घेऊन जाणाऱ्या गणपतीचे वाळू शिल्प उभारले आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त विनवणीही केली आहे. हे शिल्प सर्वच भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Konkan Railway News :गणेशोत्सवासाठी कोकणात गावी गेलेल्या गणेश भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी उद्यापासून एकूण 6 विशेष मेमू सेवा चालविण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मडगाव ते पनवेल सेवा
1)गाडी क्रमांक 07104 मडगाव – पनवेल ही विशेष गाडी उद्या दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता मडगाव या स्थानकावरून निघणार असून संध्याकाळी 20:30 वाजता पनवेल स्थानकावर पोहोचणार आहे.
2)परतीच्या प्रवासात ही गाडी सोमवार दिनांक 02 ऑक्टोबर रोजी पनवेल या स्थानकावरून रात्री 21:10 वाजता निघून दुसर्या दिवशी सकाळी 09:30 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचणार आहे.
खेड ते पनवेल सेवा
3)गाडी क्रमांक 07106 खेड – पनवेल विशेष अनारक्षित मेमू ही विशेष गाडी दिनांक 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर या दिवशी दुपारी 15:15 वाजता खेड या स्थानकावरून निघणार असून संध्याकाळी 20:30 वाजता पनवेल स्थानकावर पोहोचणार आहे. (दोन सेवा)
4)गाडी क्रमांक 07105 पनवेल – खेड विशेष अनारक्षित मेमू ही विशेष गाडी दिनांक 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या दिवशी रात्री 21:10 वाजता पनवेल या स्थानकावरून निघणार असून रात्री 01:10 वाजता खेड या स्थानकावर पोहोचणार आहे. (दोन सेवा)
या गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून एकूण 8 कोचसहित चालविण्यात येणार आहेत.