सिंधुदुर्ग:ग्रामिण भागातील नागरीकांना आपल्या घराच्या जवळ चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या उददेशाने श्री.मंगेशजी सांवत यांच्या प्रेरणेतून मंगळवार, 21 डिसेंबर 2022 रोजी साईलिला हॉस्पिटल नाटळ, प्रथमेश हॉटेल्स प्रा.ली. मुंबई आणि माता वैष्णोदवी महाविद्यालय ओसरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर माता वैष्णोदेवी महाविद्यालय, ओसरगांव, मुंबई-गोवा हायवे, ओसरगांव तलाव शेजारी आयोजीत करण्यात आले आहे. शिबीराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 02 अशी आहे. तरी कणकवली, ओसरगांव,कसाल, आंब्रड, हेवाळे, पोखरण, कुंदे, बोर्डवे या पंचक्रोशीतील सर्व नागरीकांनी या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहीती व नावनोंदणी करीता साईलिला हॉस्पिटल नाटळ संपर्क क्रमांक 02367 246099 / 246100 / 8275137575 यावर संपर्क करावा.
मुंबई: कोकणातील काजूपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात काजू फळपीक विकास योजना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे .संपूर्ण कोकण व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा तालुक्यातील क्षेत्रात ही योजना असणार आहे. या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 1175 कोटींची तरतूद असणार आहे. कृषी, पणन व सहकार मिळून ही योजना राबवणार आहेत.
Follow us on
राज्यात रोपवाटिका सुविधा निर्माण करणे.काजू उत्पादकता वाढ, काजू बोन्डावरील प्रक्रिया उद्योगांना चालना, अर्थसहाय्य, प्रक्रिया, मार्केटिंग आणि रोजगारनिर्मितीसाठी हि योजना राबविण्यात येणार आहे.
मुंबई :श्री सिध्दीविनायक गणपती मंदिरातील श्रीच्या मूर्तीला येत्या बुधवारी १४ ते रविवार १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात भाविकांना श्रींच्या मुर्तींच्या दर्शन घेता येणार नसून याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
Follow us on
श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे भाविकांना आवाहन करत बुधवार दिनांक १४ डिसेंबरपासून ते रविवारी दिनांक १८ डिसेंबर २०२२च्या कालावधीमध्ये श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या कालावधीमध्ये भाविकांना प्रत्यक्ष श्रींच्या मूर्तींचे दर्शन बंद असेल, याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन घेता येईल असे श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.
या सिंदूर लेपनानंतर सोमवार १८ डिसेंबरला दुपारी एक वाजल्यापासून नेहमीप्रमाण गाभाऱ्यातून भाविकांना श्रींच्या मूर्तींचे दर्शन घेता येईल,असे न्यासाने कळवले आहे.
पुणे : आज सरकारकडून (Maharashtra Government) राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. या बदलीच्या यादीत विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) सदानंद दाते (Sadanand Date) यांचीहा समावेश आहे.
खालील अधिकाऱ्यांची बदली/पदोन्नती करण्यात आलेली आहे.
विश्वास नांगरे पाटील
विश्वास नांगरे पाटील यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील हे आतापर्यंत मुंबई सहपोलीस आयुक्त पदावर होते.
सदानंद दाते
मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त असलेले सदानंद दाते यांची बदली ही राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या (Anti-Terrorism Squad) अप्पर पोलीस महासंचालकपदी करण्यात आली आहे.
अमिताभ गुप्ता
अमिताभ गुप्तांची पुणे आयुक्तपदावरून बदली झालीय. ते आता अमिताभ गुप्ता कायदा सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक असणार आहेत.
तर खालील शहराच्या पोलीस आयुक्तपदी नवीन नावाची वर्णी लागली आहे.
Konkan Railway News 13/12/2022: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वेने एक एकेरी मार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01430 एकेरी विशेष गाडी मडगाव जंक्शन येथून रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०८.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री २३.०० वाजता पोहोचेल.
GRAMPANCHAYAT ELECTION 2022 :भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी धक्कादायक विधान केल्याचं समोर आलं आहे. जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाहीतर मी तुमच्या गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच गावकर्यांना दिली आहे.
भाजपा आमदार नितेश राणे हे कणकवलीमधील (Kankavali) नांदगाव या ठिकाणी बोलत होते. राणे म्हणाले. आता कोणत्या गावाला निधी द्यायचा, कोणत्या नाही हे माझ्या हातात आहे. त्यामुळे मतदान करतानाच विचार करा. जर माझ्या विचारांचा सरपंच तुमच्या गावात निवडून आला तरच निधी देईल, नाहीतर मी निधी देणार नाही असं वादग्रस्त विधान आमदार राणे यांनी केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, दोडामार्ग , कणकवली , कुडाळ, मालवण सावंतवाडी , वैभववाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमात बोलतानाचा राणे यांचा व्हिडिओ समोर आला होता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंकडून प्रलोभनाचा प्रयत्न केला गेला असल्याचे या व्हिडिओतून समोर आले होते.
मुंबई :येणार्या १ जानेवारीपासून राज्यातील सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात देण्याची शासकीय विभागांना सक्ती करण्यात आली आहे. सर्व विभागांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले आहेत. नागरिकांना पारदर्शक, वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे पाउल उचलले आहे. सर्व विभागांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले आहेत. यानुसार महसूल विभागानेही आपल्या सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. तर उर्वरित विभागांना या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. या निर्णयाने राज्यातील नागरिकांची सरकारी दप्तरदिरंगाईतून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन स्वरूपात प्रशासनाकडून सेवा दिली जाते.यानुसार महसूल विभागानेही आपल्या सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. तर उर्वरित विभागांना या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी या कायद्याखाली अधिसूचित केलेल्या सर्व सेवा १ जानेवारी २०२३ पासून शंभर टक्के ऑनलाइन स्वरूपात केल्या जाणार आहेत. कोणतेही कारण सांगून कोणतीही सेवा शासकीय कर्मचाऱ्यांना यापुढे ऑफलाइन देता येणार नाही. ज्या सेवा ऑनलाइन स्वरूपात देता येणार नाहीत त्याची स्पष्टीकरणासह उत्तरे ३१ डिसेंबपर्यंत द्यावी लागणार आहेत.
जन्म-मृत्यूचा दाखला, नळ, वीजजोडणी, जात प्रमाणपत्र, विविध प्रकारच्या परवानग्या, मंजुरी आदींसह विविध प्रकारच्या ५०६ सेवा कालबद्ध पद्धतीने नागरिकांना देणे प्रशासनास बंधनकारक आहे. विविध विभागांच्या अधिसूचित ५०६ सेवांपैकी ४०० सेवा ऑनलाइन स्वरूपात सध्या देण्यात येतात. उरलेल्या १०६ सेवा ऑफलाइन पद्धतीने देण्यात येतात. या सेवा ‘आपले सरकार पोर्टल’, सेवा अधिकारांसाठी तयार करण्यात आलेले मोबाइल अॅप याद्वारे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ‘आपले सरकार सेवा केंद्रा’च्या ३५ हजार केंद्रांतून या सेवा राज्यभर ऑनलाइन पद्धतीने दिल्या जातात.
Mumbai -Goa Highway News: एकीकडे समृद्धी महामार्ग अवघ्या ५/६ वर्षात पूर्ण करून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी हा महामार्ग पूर्ण करून दाखवल्याच्या आपल्या कर्तृत्वाचे गोडवे गाण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे “खड्ड्यात” गेलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी काही ठोस पावले तर सोडा तर ह्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलणे पण टाळत आहेत. त्यामुळे शांत असणारा कोकणी माणूस आता आपला राग विविध माध्यमातून व्यक्त करू लागला आहे. ह्यात आता मराठी कलाकार पण सामील झाल्याचे दिसत आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने इन्स्ट्राग्राम पोस्टच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.
एका युझर च्या पोस्ट ला त्याने रिप्लाय देताना नक्की काय म्हणाला अभिजीत?
मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची 12 वर्ष कोणत्या हिशोबाने मोजली ते कळेल का ? नाही म्हणजे तसा भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली , आपल्याला संताप व्यक्त करायला आपलं हक्काच स्थान मिळालय मग 12 वर्षच का ? आधीची 60-65 वर्ष काय कोकणात सोन्याचा धुर निघत होता का ? ह्यासाठी नुसत्या संतापी पोस्ट टाकून आणि वर्षातून एकदा सुट्टीला कोकणात जाऊन कस भागेल ? त्यासाठी स्थानिक प्रतिनिधी जबाबदार आहेत ना ? त्यांना निवडून द्यायला पुण्या मुंबईची किंवा उर्वरित महाराष्ट्रातील लोक येत नाहीत. आधी कोकणकरांनी सुधारावे मग कोकण सुधारेल ! समृद्धी म्हणजे काय बँकेत ठेवलेली ठेव नाही की काढली आणि दिली कुणालाही ! मोठ्या महामार्गांवर अपेक्षित असलेली जड वाहतूक किती प्रमाणात आहे हो कोकणात ? त्यामुळे उगाच तुमच्या वैयक्तिक संतापाला सामाजिक करून इतरांचे सामाजिक जीवन आनंदमय करू नका.
सिंधुदुर्ग : सध्या महाराष्ट्र कर्नाटक हा सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काही चुकांमुळे आज ह्या सीमा भागातील आपल्या मराठी बांधवाना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ह्या वादाला खूप वर्षाचा इतिहास आहे. एकीकडे हा वाद चालू असताना तळकोकणातील एका तालुक्यातील युवा वर्गाने चक्क दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी २०१९ पासून आंदोलन सुरु केले आहे. जरी हे आंदोलन सध्या लहान प्रमाणात असले तरी ते ह्यावर उपाय न शोधल्यास ते पुढे वाढून त्याचे परिणाम दिसतील हे नक्की.
गोव्याच्या सीमेवर असणारा तळकोकणातील दोडामार्ग तालुका. याच दोडामार्ग तालुक्यातील तरुणवर्ग येथील सातत्याच्या मूलभूत सुविधांच्या उपेक्षा आणि वंचिततेला कंटाळून ‘आम्हाला गोव्यात सामावून घ्या!’ असे म्हणत उभा राहिला आहे. सुरवातीला व्हॅट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ हळू हळू व्यापक होत असून दोडामार्गच्या रोजच्या जगण्यातील मूलभूत प्रश्न घेऊन उभी राहिली आहे. ह्यासंबंधी एक दोन बैठका पण घेण्यात आल्याचे समजते.
अशी मागणी का होत आहे ?
दोडामार्ग तालुका अजूनही रोजगार आणि आरोग्य इत्यादी मूलभूत गोष्टीसाठी गोवा ह्या राज्यावर अवलंबून आहे. कारण ह्या सुविधा देण्यास स्थानिक आणि राज्य सरकार अपयशी ठरत आहे. सारा रोजगार, उद्योग जर गोव्यात आहे, येथील लोकप्रतिनिधी वर्षानुवर्षं आमच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष देत नसतील, तर आपला तालुकाच गोव्यात समाविष्ट करावा अशी मागणी येथील तरुणांकडून होऊ लागली आहे.
मागे गोवा सरकारने आपल्या राज्यातील आरोग्य सेवेसाठी परराज्यातील नागरिकांवर बंधने आणली होती. त्यावेळी त्यावेळचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी गोवा राज्यसरकारला विनंती करून हि सेवा पुन्हा चालू करून घेतली होती. सीमेच्या बंधनामुळे ह्या तालुक्यातील नागरिकांना गोव्यातील काही सेवेचा लाभ घेताना अडथळा होतो. ह्या सर्व कारणामुळे आपल्याला मूलभूत सुविधा तरी द्या नाहीतर गोवा राज्यात समाविष्ट होऊ द्या अशी मागणी होत आहे.
गोवा राज्य अगदी शांत राज्य म्हणून ओळखले जाते. इथे मराठी टक्का पण जास्त आहे. गोवामुक्तीसाठी मराठी जनता पुढे सरली होती त्यामुळे अजूनही गोवा आणि मराठी माणूस यांचे नाते जवळचे आहे. ह्या राज्यात विलीन झाल्यास काही तोटा न होता उलट फायदाच होईल अशी येथील काही तरुणांची भावना आहे.
Follow us on
ह्या प्रश्नात आता अजून एक ट्विस्ट आले आहे. महाराष्ट्र आणि गोवा सीमेलगत गोवा राज्यात मोपा गावात आंतराष्ट्रीय स्तराचे विमानतळ बनत आहे. दोडामार्ग तालुक्यापासून ते फक्त १९ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. साहजिकच त्यामुळे दोडामार्ग तालुक्याचा विकास होईल. इथल्या जमीनीचे भाव वाढले आहेत. गोव्यात जागेची मर्यादा आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा इथे वळवला आहे. काही गुंतवणूदार इथे जमिनी खरेदी करून त्यावर रेसिडेन्टशल प्रोजेक्ट उभे करत आहेत. पुढच्या काही वर्षात येथील चित्र वेगळे असेल. विकासात सीमेचा अडथळा येत असल्याचे कारण दाखवून हि चळवळ अधिक तीव्र होईल आणि ह्या चळवळीस आर्थिक आणि राजकीय पाठबळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र शासनाने ह्या गोष्टीची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न गंभीर होण्याअगोदर त्याची दखल घेतली पाहिजे तरच हा तालुक्याचे गोवा राज्यात विलीनीकरण होण्यापासून रोखू शकतो.
Mopa Airport Newa: दक्षिण गोव्याच्या पेडणे येथील मोपा गावातील ‘मोपा’ या विमानतळाचे लोकार्पण उद्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्रत्यक्षात हा विमानतळ पाच जानेवारी 2023 पासून कार्यरत होणार आहेत. ह्या प्रकल्पामुळे गोव्याच्या विकासात खूप मोलाची भर पडेल. आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये मोपा विमानतळाचा देशात दुसरा क्रमांक लागणार आहे. जागतिक स्तरावरील पर्यटन केंद्र गोव्यात आहे. सुरवातीच्या काळात 40 ते 50 लाख ह्या प्रवासी ह्या विमानतळावरून प्रवास करणार असा अंदाज मांडला आहे. तर पुढील काही वर्षात ही संख्या 1 ते दीड कोटी होणार आहे असाही अंदाज आहे. साहजिकच पुढील 5 ते 10 वर्षात गोव्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.हे विमानतळ जिल्ह्यातून अगदी जवळ असलेल्या मोपा गावात होत असल्याने, हे विमानतळ गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा असे दोघांसाठीही महत्त्वपूर्ण असणार आहे. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि कुडाळ हे तालुके फक्त 15 ते 50 मिनिटाच्या अंतरावर आहेत.
प्रवासी वाहतुकीचा एक उत्तम पर्याय.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ हे डोमेस्टिक विमानतळ आहे त्यामळे तेथील उड्डाणाला मर्यादा आहेत. दिवसातून एक किंवा दोन उड्डाणे होत आहेत. मोपा विमानतळ हे आंतराष्ट्रीय विमानतळ असल्याने थेथे जगातील मुख्य देशासोबत आणि देशातील मुख्य शहरांसोबत वाहतूक होणार आहे. तसेच हे विमानतळ सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्याला चिपी ह्या विमानतळापेक्षा जवळ आहे. मुंबई गोवा या महामार्गामुळे गोवा राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही अवघ्या काही मिनिटांवर आले आहे. वाहतुकीचा एक उत्तम पर्याय म्हणून तळकोकणाला ह्या विमानतळाच्या माध्यमातून भेटेल.
ह्या विमानतळावर आलेले काही टक्के पर्यटक जरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वळविण्यात आपण यशस्वी झालो तरी त्यातून खूप चांगल्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. पण त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. याआधीच सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणुन घोषित केला आहे. पण दुर्दैवाने ह्या दर्जाच्या सुविधा अजून जिल्ह्यात उपलब्ध केलेल्या नाही आहेत. ही एक संधी आहे जिचा लाभ घेऊन जिल्ह्याचा विकास करता येईल.
गोव्याचा विकास झाला, तेथील पर्यटन वाढले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादित होणाऱ्या उत्पादनांसाठी खूप मोठी बाजारपेठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांना मिळेल. अंतर कमी असल्याने शेतमाल गोव्याला पाठवून त्यातून चांगले उत्पन्न मिळविता येईल. गोव्यात जागेची समस्या असल्याने तेथे शेती मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे शेती उपदनासाठी ते लगतच्या दोडामार्ग आणि बांदा ह्या ठिकाणावर अवलंबून राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे मोपा विमानतळातून मालाची निर्यात पण शक्य होणार आहे. त्याचा फायदा सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना खासकरून आंबा बागायतदारांना होऊ शकतो.
पण काही नकारात्मक बाजू पण आहेत. गोव्यात जागा कमी आहे, त्यामुळे तेथिल गुतंवणूकदार सिंधुदुर्गातील सीमेलगतच्या भागात वळेल आणि तेथील जमिनी खरेदी करेल. स्थानिक कोंकणवासियांनी आमिषाला बळी पडता आपले उद्योगे किंवा शेती द्वारे आपल्या जमिनीचा आपल्या प्रगतीचा उपयोग केला पाहिजे.
प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यक्यता
ह्या संधीचे सोने करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे. ह्या आधी सिंधुदुर्गचा विकासात राजकिय समीकरणे मध्ये येत होती. आता ती समीकरणे बदललेली आहेत. जिल्ह्यात २ कॅबिनेट मंत्री आहेत आणि एक केंद्रीय मंत्री आहे. विशेष म्हणजे हि मंत्रीपदे राज्यात एकत्र आलेल्या पक्षाची आहेत त्यामुळे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास करण्यास एक अनुकूल समीकरण तयार झाले आहे. सर्व गोष्टी जर पूर्वनियोजित पद्धीतीने केल्यात तर येणाऱ्या काही वर्षात त्याचा परिमाण दिसण्यास सुरवात होईल हे नक्की.