Author Archives: Kokanai Digital

आता दप्तरदिरंगाई नाही… शासनाच्या सर्व सेवा 1 जानेवारीपासून ऑनलाईन….

 

   Follow us on        

 

मुंबई : येणार्‍या १ जानेवारीपासून राज्यातील सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात देण्याची शासकीय विभागांना सक्ती करण्यात आली आहे. सर्व विभागांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले आहेत. नागरिकांना पारदर्शक, वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे पाउल उचलले आहे. सर्व विभागांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले आहेत. यानुसार महसूल विभागानेही आपल्या सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. तर उर्वरित विभागांना या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. या निर्णयाने राज्यातील नागरिकांची सरकारी दप्तरदिरंगाईतून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन स्वरूपात प्रशासनाकडून सेवा दिली जाते.यानुसार महसूल विभागानेही आपल्या सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. तर उर्वरित विभागांना या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे.

Also Read :ग्रामपंचायत निवडणूक -२०२२! उमेदवार आणि मतदार यांना माहिती असाव्यात अशा महत्वाच्या काही गोष्टी.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी या कायद्याखाली अधिसूचित केलेल्या सर्व सेवा १ जानेवारी २०२३ पासून शंभर टक्के ऑनलाइन स्वरूपात केल्या जाणार आहेत. कोणतेही कारण सांगून कोणतीही सेवा शासकीय कर्मचाऱ्यांना यापुढे ऑफलाइन देता येणार नाही. ज्या सेवा ऑनलाइन स्वरूपात देता येणार नाहीत त्याची स्पष्टीकरणासह उत्तरे ३१ डिसेंबपर्यंत द्यावी लागणार आहेत.

Als Read :….तर दोडामार्ग तालुका भविष्यात गोवा राज्याचा भाग असेल!!!!

ह्या सेवा उपलब्ध..

जन्म-मृत्यूचा दाखला, नळ, वीजजोडणी, जात प्रमाणपत्र, विविध प्रकारच्या परवानग्या, मंजुरी आदींसह विविध प्रकारच्या ५०६ सेवा कालबद्ध पद्धतीने नागरिकांना देणे प्रशासनास बंधनकारक आहे. विविध विभागांच्या अधिसूचित ५०६ सेवांपैकी ४०० सेवा ऑनलाइन स्वरूपात सध्या देण्यात येतात. उरलेल्या १०६ सेवा ऑफलाइन पद्धतीने देण्यात येतात. या सेवा ‘आपले सरकार पोर्टल’, सेवा अधिकारांसाठी तयार करण्यात आलेले मोबाइल अ‍ॅप याद्वारे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ‘आपले सरकार सेवा केंद्रा’च्या ३५ हजार केंद्रांतून या सेवा राज्यभर ऑनलाइन पद्धतीने दिल्या जातात.

Also Read :मराठी अभिनेता अभिजीत केळकरची मुंबई-गोवा महामार्गाविषयी संतप्त पोस्ट! तो म्हणाला आमचं कोकण….

Loading

मराठी अभिनेता अभिजीत केळकरची मुंबई-गोवा महामार्गाविषयी संतप्त पोस्ट! तो म्हणाला आमचं कोकण….

   Follow us on        
Mumbai -Goa Highway News: एकीकडे समृद्धी महामार्ग अवघ्या ५/६ वर्षात पूर्ण करून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी हा महामार्ग पूर्ण करून दाखवल्याच्या आपल्या कर्तृत्वाचे गोडवे गाण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे “खड्ड्यात” गेलेला  मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी काही ठोस पावले तर सोडा तर ह्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलणे पण टाळत आहेत. त्यामुळे शांत असणारा कोकणी माणूस आता आपला राग  विविध माध्यमातून व्यक्त करू लागला आहे. ह्यात आता मराठी कलाकार पण सामील झाल्याचे दिसत आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने इन्स्ट्राग्राम पोस्टच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.
एका युझर च्या पोस्ट ला त्याने रिप्लाय देताना नक्की काय म्हणाला अभिजीत?
 
 मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची 12 वर्ष कोणत्या हिशोबाने मोजली ते कळेल का ? नाही म्हणजे तसा भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली , आपल्याला संताप व्यक्त करायला आपलं हक्काच स्थान मिळालय मग 12 वर्षच का ? आधीची 60-65 वर्ष काय कोकणात सोन्याचा धुर निघत होता का ? ह्यासाठी नुसत्या संतापी पोस्ट टाकून आणि वर्षातून एकदा सुट्टीला कोकणात जाऊन कस भागेल ? त्यासाठी स्थानिक प्रतिनिधी जबाबदार आहेत ना ? त्यांना निवडून द्यायला पुण्या मुंबईची किंवा उर्वरित महाराष्ट्रातील लोक येत नाहीत. आधी कोकणकरांनी सुधारावे मग कोकण सुधारेल ! समृद्धी म्हणजे काय बँकेत ठेवलेली ठेव नाही की काढली आणि दिली कुणालाही ! मोठ्या महामार्गांवर अपेक्षित असलेली जड वाहतूक किती प्रमाणात आहे हो कोकणात ? त्यामुळे उगाच तुमच्या वैयक्तिक संतापाला सामाजिक करून इतरांचे सामाजिक जीवन आनंदमय करू नका.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkarofficial)

Loading

….तर दोडामार्ग तालुका भविष्यात गोवा राज्याचा भाग असेल!!!!

सिंधुदुर्ग : सध्या महाराष्ट्र कर्नाटक हा सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काही चुकांमुळे आज ह्या सीमा भागातील आपल्या मराठी बांधवाना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ह्या वादाला खूप वर्षाचा इतिहास आहे. एकीकडे हा वाद चालू असताना तळकोकणातील एका तालुक्यातील युवा वर्गाने चक्क दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी २०१९ पासून आंदोलन सुरु केले आहे. जरी हे आंदोलन सध्या लहान प्रमाणात असले तरी ते ह्यावर उपाय न शोधल्यास ते पुढे वाढून त्याचे परिणाम दिसतील हे नक्की.
गोव्याच्या सीमेवर असणारा तळकोकणातील दोडामार्ग तालुका. याच दोडामार्ग तालुक्यातील तरुणवर्ग येथील सातत्याच्या मूलभूत सुविधांच्या उपेक्षा आणि वंचिततेला कंटाळून ‘आम्हाला गोव्यात सामावून घ्या!’ असे म्हणत उभा राहिला आहे. सुरवातीला  व्हॅट्सअँप  ग्रुपच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ हळू हळू व्यापक होत असून दोडामार्गच्या रोजच्या जगण्यातील मूलभूत प्रश्न घेऊन उभी राहिली आहे. ह्यासंबंधी एक दोन बैठका पण घेण्यात आल्याचे समजते.
अशी मागणी का होत आहे ?
दोडामार्ग तालुका अजूनही रोजगार आणि आरोग्य इत्यादी मूलभूत गोष्टीसाठी गोवा ह्या राज्यावर अवलंबून आहे. कारण ह्या सुविधा देण्यास स्थानिक आणि राज्य सरकार अपयशी ठरत आहे. सारा रोजगार, उद्योग जर गोव्यात आहे, येथील लोकप्रतिनिधी वर्षानुवर्षं आमच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष देत नसतील, तर आपला तालुकाच गोव्यात समाविष्ट करावा अशी मागणी येथील तरुणांकडून होऊ लागली आहे.
मागे गोवा सरकारने आपल्या राज्यातील आरोग्य सेवेसाठी परराज्यातील नागरिकांवर बंधने आणली होती. त्यावेळी त्यावेळचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी गोवा राज्यसरकारला विनंती करून हि सेवा पुन्हा चालू करून घेतली होती. सीमेच्या बंधनामुळे ह्या तालुक्यातील नागरिकांना गोव्यातील काही सेवेचा लाभ घेताना अडथळा होतो. ह्या सर्व कारणामुळे आपल्याला मूलभूत सुविधा तरी द्या नाहीतर गोवा राज्यात समाविष्ट होऊ द्या अशी मागणी होत आहे.
गोवा राज्य अगदी शांत राज्य म्हणून ओळखले जाते. इथे मराठी टक्का पण जास्त आहे. गोवामुक्तीसाठी मराठी जनता पुढे सरली होती त्यामुळे अजूनही गोवा आणि मराठी माणूस यांचे नाते जवळचे आहे. ह्या राज्यात विलीन झाल्यास काही तोटा न होता उलट फायदाच होईल अशी येथील काही तरुणांची भावना आहे.
   Follow us on        
ह्या प्रश्नात आता अजून एक ट्विस्ट आले आहे. महाराष्ट्र आणि गोवा सीमेलगत गोवा राज्यात मोपा गावात आंतराष्ट्रीय स्तराचे विमानतळ बनत आहे. दोडामार्ग तालुक्यापासून ते फक्त १९ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. साहजिकच त्यामुळे दोडामार्ग तालुक्याचा विकास होईल. इथल्या जमीनीचे भाव वाढले आहेत. गोव्यात जागेची मर्यादा आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा इथे वळवला आहे.  काही गुंतवणूदार इथे जमिनी खरेदी करून त्यावर रेसिडेन्टशल प्रोजेक्ट उभे करत आहेत. पुढच्या काही वर्षात येथील चित्र वेगळे असेल. विकासात सीमेचा अडथळा येत असल्याचे कारण दाखवून हि चळवळ अधिक तीव्र होईल आणि ह्या चळवळीस आर्थिक आणि राजकीय पाठबळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र शासनाने ह्या गोष्टीची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न गंभीर होण्याअगोदर त्याची दखल घेतली पाहिजे तरच हा तालुक्याचे गोवा राज्यात विलीनीकरण होण्यापासून रोखू शकतो.

Loading

मोपा विमानतळ ! सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे ‘द्वार’

Mopa Airport Newa: दक्षिण गोव्याच्या पेडणे येथील मोपा गावातील ‘मोपा’ या विमानतळाचे लोकार्पण उद्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्रत्यक्षात हा विमानतळ पाच जानेवारी 2023 पासून कार्यरत होणार आहेत. ह्या प्रकल्पामुळे गोव्याच्या विकासात खूप मोलाची भर पडेल. आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये मोपा विमानतळाचा देशात दुसरा क्रमांक लागणार आहे. जागतिक स्तरावरील पर्यटन केंद्र गोव्यात आहे. सुरवातीच्या काळात 40 ते 50 लाख ह्या प्रवासी ह्या विमानतळावरून प्रवास करणार असा अंदाज मांडला आहे. तर पुढील काही वर्षात ही संख्या 1 ते दीड कोटी होणार आहे असाही अंदाज आहे. साहजिकच पुढील 5 ते 10 वर्षात गोव्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.हे विमानतळ जिल्ह्यातून अगदी जवळ असलेल्या मोपा गावात होत असल्याने, हे विमानतळ गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा असे दोघांसाठीही महत्त्वपूर्ण असणार आहे. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि कुडाळ हे तालुके फक्त 15 ते 50 मिनिटाच्या अंतरावर आहेत.
प्रवासी वाहतुकीचा एक उत्तम पर्याय.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ हे डोमेस्टिक विमानतळ आहे त्यामळे तेथील उड्डाणाला मर्यादा आहेत. दिवसातून एक किंवा दोन उड्डाणे होत आहेत. मोपा विमानतळ हे आंतराष्ट्रीय विमानतळ असल्याने थेथे जगातील मुख्य देशासोबत आणि देशातील मुख्य शहरांसोबत वाहतूक होणार आहे. तसेच हे विमानतळ सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्याला चिपी ह्या विमानतळापेक्षा जवळ आहे. मुंबई गोवा या महामार्गामुळे  गोवा राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही अवघ्या काही मिनिटांवर आले आहे. वाहतुकीचा एक उत्तम पर्याय म्हणून तळकोकणाला ह्या विमानतळाच्या माध्यमातून भेटेल.
   Follow us on        
पर्यटन आणि रोजगार
ह्या विमानतळावर आलेले काही टक्के पर्यटक जरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वळविण्यात आपण यशस्वी झालो तरी त्यातून खूप चांगल्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. पण त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. याआधीच सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणुन घोषित केला आहे. पण दुर्दैवाने ह्या दर्जाच्या सुविधा अजून जिल्ह्यात उपलब्ध केलेल्या नाही आहेत. ही एक संधी आहे जिचा लाभ घेऊन जिल्ह्याचा विकास करता येईल.
गोव्याचा विकास झाला, तेथील पर्यटन वाढले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादित होणाऱ्या उत्पादनांसाठी खूप मोठी बाजारपेठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांना मिळेल. अंतर कमी असल्याने शेतमाल गोव्याला पाठवून त्यातून चांगले उत्पन्न मिळविता येईल. गोव्यात जागेची समस्या असल्याने तेथे शेती मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे शेती उपदनासाठी ते लगतच्या दोडामार्ग आणि बांदा ह्या ठिकाणावर अवलंबून राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे मोपा विमानतळातून मालाची निर्यात पण शक्य होणार आहे. त्याचा फायदा सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना खासकरून आंबा बागायतदारांना होऊ शकतो.
पण काही नकारात्मक बाजू पण आहेत. गोव्यात जागा कमी आहे, त्यामुळे तेथिल गुतंवणूकदार सिंधुदुर्गातील सीमेलगतच्या भागात वळेल आणि तेथील जमिनी खरेदी करेल. स्थानिक कोंकणवासियांनी आमिषाला बळी पडता आपले उद्योगे किंवा शेती द्वारे आपल्या जमिनीचा आपल्या प्रगतीचा उपयोग केला पाहिजे.
प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यक्यता
ह्या संधीचे सोने करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे. ह्या आधी सिंधुदुर्गचा विकासात राजकिय समीकरणे मध्ये येत होती. आता ती समीकरणे बदललेली आहेत. जिल्ह्यात २ कॅबिनेट मंत्री आहेत आणि एक केंद्रीय मंत्री आहे. विशेष म्हणजे हि मंत्रीपदे राज्यात एकत्र आलेल्या पक्षाची आहेत त्यामुळे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास करण्यास एक अनुकूल समीकरण तयार झाले आहे. सर्व गोष्टी जर पूर्वनियोजित पद्धीतीने केल्यात तर येणाऱ्या काही वर्षात त्याचा परिमाण दिसण्यास सुरवात होईल हे नक्की.

Loading

ग्रामपंचायत निवडणूक -२०२२! उमेदवार आणि मतदार यांना माहिती असाव्यात अशा महत्वाच्या काही गोष्टी.

GRAMPANCHAYAT ELECTION 2022राज्यात ग्रामपंचायत निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ग्रामपंचायतींवर आप आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक जवळ आली कि मतदार राजा होतो. सर्व राजकीय नेते विविध आश्वासने देऊन मतदारांची मते जिंकून घेण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त होतात. पण मतदारांनी चुकीचे मतदान करून चुकीचा उमेदवार निवडून दिल्यास त्याचे परिणाम गावाच्या विकासावर होतात. असे होऊ नये ह्याकरिता मतदाराने साक्षर आणि दक्ष असणे जरुरीचे आहे.
त्यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य याने एक ग्रामपंचायत निवडूक संदर्भातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी एक सखोल माहिती असलेली पुस्तिका प्रकाशित केली आहे. ह्या पुस्तिकेत ग्रामपंचायत निवडणुकीचे नियम, प्रभाग रचना, सदस्य संख्या निश्चिती, आरक्षण, मतदार यादी आणि केंद्र, सदस्य आणि सरपंच पदाची पात्रता, चिन्हे वाटप, आचारसंहिता, मतमोजणी, निवडणुकीदरम्यान होणारे गुन्हे आणि शिक्षेची तरतूद इत्यादी सर्व माहिती ह्या पुस्तिकेतून तुम्हाला भेटेल. वाचा आणि  ही पोस्ट शेअर करा.
खालील पुस्तकावर क्लिक करा आणि डाउनलोड करा.

 

   Follow us on        

>Click Here to Download… 

Loading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम’ च्या व्यवस्थेसाठी शासनाकडून दरपत्रकाची मागणी.

Sindhudurg News :जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय द्वारा ‘आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सुमारे २०० प्रशिक्षणार्थीना ह्या कार्यक्रमात प्रशिक्षण दिले जाईल. १२ दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. ह्या दरम्यान ह्या कार्यक्रमासाठी चहा नाश्ता, दोन वेळचे जेवण, प्रशिक्षणार्थी साठी स्टेशनरी, ह्या कार्यक्रमाचे विडिओ शूटिंग व फोटोग्राफी, स्वयंसेवकांसाठी गादी, उशी,बेडशीट, चादर असा सेट पुरवणे.100 प्रशिक्षणार्थ्यांच्या सहलीची व्यवस्था करणे ज्यामध्ये गाडीची व्यवस्था ह्या सर्वांसाठी दरपत्रक मागविण्यात आलेली आहेत.
   Follow us on        
सदर दरपत्रके जिल्हा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा येथे दिनांक ०८.१२.२०२२ ते १४.१२.२०२२ पर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ह्या विषयाचे परिपत्रक खालील लिंक द्वारे उघडून वाचावे.

Loading

रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर तात्पुरत्या कालावधीसाठी रद्द.

दुपारी दादर येथून सुटणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर हीच गाडी पुढे  रत्नागिरी येथे तासभराच्या थांब्यांने रत्नागिरी मडगाव म्हणुन चालविण्यात येत होती,त्यामुळे तळकोकणात जाणार्‍या प्रवाशांना ह्या दोन्ही गाड्या सोयीच्या होत्या. आता ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात रद्द झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. 
KONKAN RAILWAY NEWS:रत्नागिरी ते मडगाव ह्या दरम्यान चालविण्यात येणाऱ्या 10101 रत्नागिरी-मडगाव आणि 10102 मडगाव-रत्नागिरी ह्या दोन गाड्या तात्पुरत्या काळापुरती रद्द केल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
ह्या आधी एका दिनांक 22/10/2022 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे ह्या गाड्या दिनांक 31/12/2022 पर्यन्त रद्द असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ती मुदत दिनांक 31/03/2023 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. रत्नागिरी ते मडगाव या स्थानकांदरम्यान रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने अभियांत्रिकी कारणासाठी हि गाडी रद्द ठेवण्यात येणार आहे असे कोंकण रेल्वेने जाहीर केले आहे.
दुपारी येथून सुटणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर हीच गाडी पुढे  रत्नागिरी येथे तासभराच्या थांब्यांने रत्नागिरी मडगाव म्हणुन चालविण्यात येत होती,त्यामुळे तळकोकणात जाणार्‍या प्रवाशांना ह्या दोन्ही गाड्या सोयीच्या होत्या. आता ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात रद्द झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

Loading

मुंबई- गोवा महामार्गाचे काम वेग पकडणार… सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे विशेष निर्देश….

   Follow us on        

Mumbai Goa Highway News :मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात आज मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा घेतला.

मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करून जनतेला तातडीने दिलासा द्यावा अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या.

Also Read > कोकणवासियांचा राग दिसून येत नाही–मनसे अध्यक्ष राज ठाकरे

यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा १, पनवेल ते कासू (वडखळजवळ) टप्पा २, आदी रस्त्याची सद्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झाराप या रस्त्याचे बळकटीकरण व चौपदीकरणचे कामच्या सदयस्थितीच्या कामाबद्दल आढावा घेतला.

सर्व कामे तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीने जलदगतीने पूर्ण करण्यात येतील याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. या महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाट रस्त्याच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करुन अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या.

Also Read > जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसूल केल्यास… माजी खासदार निलेश राणे यांचा इशारा.

या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्यादृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यासाठी २ कोटी निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे, तो तात्काळ संबंधितांना वितरीत करण्यात यावा असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले.

Loading

कोकणात आज आणि उद्या पावसाचा अंदाज

Konkan News:बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या “मंदोस” चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम जाणवू शकतो. हवामान विभागानं (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागानं तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये आज (8 डिसेंबर) शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होणार आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Loading

कोकण रेल्वेचे विस्कटलेले वेळापत्रक पूर्वपदावर

Konkan Railway News : कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सकाळी आठच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेस (Konkan Kanya Express) मुंबईहून गोव्याकडे जात असताना कोकिसरे रेल्वे फाटकापासून काही अंतरावर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन बंद पडली होती. त्यानंतर राजापूर स्टेशनवरुन नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले असून इंजिन बदलण्यात आले होते.

आताच्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक पूर्वपदावर आली आहे. काही गाड्या वगळता सर्व गाड्या काही मिनिटांच्या फरकाने धावत आहेत.

Source – Where is my train. Time – 03.07 PM

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search