Author Archives: Kokanai Digital
दिल्ली: काल भाजपने आपल्या संसदीय बोर्डची यादी घोषणा करत त्यातील सदस्याची नावे जाहीर केली आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे ह्या समितीमध्ये एकाही महाराष्ट्र राज्यातील नेत्याच्या समावेश केला गेला नाही आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डावलले गेले आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पण ह्या समितीमध्ये स्थान देण्यात असलेले नाही आहे. त्यामुळे ह्या समितीमध्ये आता एकही मुख्यमंत्री नाही आहे.
ह्या समितीमध्ये जे. पी. नड्डा यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
नितीन गडकरी यांचे खच्चीकरण?
भाजपच्या केंद्रीय संसदीय बोर्ड आणि केंदीय निवडणूक समितीमध्ये भाजपचे कार्यशील आणि वजनदार नेते नितीन नमस्कार यांना स्थान दिले नसल्याने विविध चर्चा होत आहेत.
पक्षाने असे का केले या विषयी काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. ह्या समितीवर निवडीसाठी वयाची अट पाहता ती पक्षाने 75 ठेवली आहे. नितीन गडकरी यांचे वय 65 आहे. त्यांच्या जागी निवड करण्यात आलेल्या बी. एस. येडियुरप्पा यांचे वय 77 आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांना का डावलले याचे नेमके कारण आजून समजले नाही.
नितीन गडकरी यांना भावी पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात आहे. नितीन गडकरी यांचे केंद्रात आणि पक्षात वाढणारे प्राबल्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी त्यांचे जाणूनबुजून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे बोलले जात आहे. दुसरीकडे नितीन गडकरी यांना त्यांचा स्पष्टवक्तेपणा नडत असल्याचे आणि त्यांच्या मागील काही विधानांमुळे त्यांना दूर करण्यात येत आहे अशी चर्चा आहे. मागेच नितीन गडकरी यांनी आता सत्ताकारणाचा कंटाळा आला आहे असे जाहीरपणे बोलून पण दाखवले होते. कारण काहीही असो पण त्यांना डावलून एकप्रकारे भाजप महाराष्ट्र राज्याचा अपमान करत आहे असे दिसून येत आहे.
मुंबई:अधिवेशनाचा पहिल्या दिवशी विरोधक नवीन सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यावर धारेवर धरतील अशी चर्चा होत होती. पण पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस विशेष चर्चित राहिला तो विरोधकांनी सभागृहाबाहेर केलेल्या विविध घोषणांनी.
घोषणाबाजी मध्ये सर्वात आघाडीवर होते ते शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे.
विरोधकांची पाहिली घोषणा होती. शिंदे गटासाठी
50 खोके… एकदम ओके..
दुसरी घोषणा होती ती पण शिंदे गटासाठी
आलेरे आले…. गद्दार आलेत.
विरोधकांची तिसरी घोषणा भाजपासाठी, नुकतेच कॅबिनेट मंत्री बनलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्यावरुन होती आणि उपरोधिक होती.
सुधीर भाऊंना चांगले खाते न देणार्या या सरकारचा धिक्कार असो…..
चौथीही घोषणा भाजपसाठी, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात करण्यात आलेल्या आशीष शेलार यांच्यावरुन होती. अर्थात ही घोषणा पण उपरोधिक होती.
आशिष शेलार यांना मंत्रिपद न देणार्या या सरकारचा विजय असो…
यासारख्या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दाणादाण करून सोडला होता.
नवी दिल्ली :भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली आहे. यामध्ये भाजपच्या देशातील १५ बड्या नेत्यांचा समावेश केला गेला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांचा समावेश करण्यात आला आहे. तर समितीच्या सदस्यपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह सह देशातील इतर नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश ह्या समितीत केला गेला आहे. ह्यापूर्वी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले होते. दुसरीकडे नितीन गडकरी यांना ह्या समितीत स्थान देण्यात आले नाही त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.
केंद्रीय निवडणूक समिती
| Sr. No. | नाव | पद | पत्ता |
|---|---|---|---|
| 1 | श्री जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष) | भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष | दिल्ली |
| 2 | श्री नरेन्द्र मोदी | प्रधानमंत्री, भारत | दिल्ली |
| 3 | श्री राजनाथ सिंह | कैबिनेट मंत्री,भारत सरकार | दिल्ली |
| 4 | श्री अमित शाह | कैबिनेट मंत्री,भारत सरकार | दिल्ली |
| 5 | श्री बी. एस. येदियुरप्पा | पूर्व सीएम, कर्नाटक | कर्नाटक |
| 6 | श्री सर्बानंद सोनोवाल | युनियन मिनिस्टर | आसाम |
| 7 | डॉ. के. लक्ष्मण | राष्ट्रीय अध्यक्ष - अन्य पिछड़ा वर्ग मोर्चा | तेलंगाना |
| 8 | डॉ. इकबाल सिंह लालपुरा | संसदीय बोर्ड सदस्य | पंजाब |
| 9 | डॉ सुधा यादव | संसदीय बोर्ड सदस्य | हरियाणा |
| 10 | डॉ सत्यनारायण जटिया | संसदीय बोर्ड सदस्य | दिल्ली |
| 11 | श्री भूपेंद्र यादव | युनियन मिनिस्टर | दिल्ली |
| 12 | श्री देवेंद्र फडणवीस | उप मुख्यमंत्री | महाराष्ट्र |
| 13 | श्री ओम प्रकाश माथुर | खासदार | दिल्ली |
| 14 | श्री बी एल संतोष | राष्ट्रीय महासचिव (संगठन) | कर्नाटक |
| 15 | श्रीमती वनथी श्रीनिवासनी | राष्ट्रीय अध्यक्ष - महिला मोर्चा | नई दिल्ली |
भाजप नेते मोहित कंबोज यांनी कालपासून केलेल्या काही ट्विटस चर्चेचा विषय बनल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या यादीत जोडला जाणार आहे असे त्यांनी काल एका ट्विट मध्ये म्हंटले आहे.
आजच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. नवीन सरकारला 3 विरोधी पक्षाचे आव्हान आहे. त्यात काल राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर खूप परखड भाषेत नवीन सरकारातील काही नेत्यांवर टीका केली होती. ह्या सर्व धर्तीवर मोहित कंबोज यांनी केलेल्या ह्या ट्विट मुळे अनेक चर्चाना उधाण आले आहे. अधिवेशनामध्ये विरोध पक्षाचा विरोध दाबण्यासाठी हे सर्व केले जात आहे असे बोलले जात आहे.
आज सकाळी पुन्हा मोहित कंबोज यांनी पुन्हा ह्या विषयावर अजून एक ट्विट केले आहे.
1:- Anil Deshmukh
2:- Nawab Malik
3:- Sanjay Panday
4:- Sanjay Raut
5:- __अपना 100% Strike Rate Hai !
असे हे ट्विट आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक होण्याचा काही दिवस आधी पण तशा आशयाचे ट्विट मोहित कंबोज यांनी केले होते आणि संजय राऊत यांना काही दिवसांत अटक झाली. आता ह्या ट्विट द्वारे त्यांचा रडार वर कोणता नेता आहे ते लवकरच समजेल.

मुंबई: मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील एकूण 10 गाड्या वातानुकूलित (AC locals) मध्ये परावृत्त करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने आज एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
AC locals ना वाढता प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला काहीसे महाग असलेले तिकीट कमी केल्याने ह्या गाड्यांच्या प्रतिसादात वाढ झाली आहे, त्यामुळे ह्या वातानुकूलित गाड्यांचा फेर्यांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.
दिनांक 19 ऑगस्ट 2022 पासून खालील गाड्या AC locals म्हणुन चालविण्यात येतील.
ह्या वाढलेल्या 10 लोकल्स पकडून आता मध्य उपनगरीय मार्गावर चालणार्या AC लोकल्सची संख्या एकूण 66 एवढी झाली आहे. पूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून pdf फाइल डाऊनलोड करा.
Mumbai-AC-Main-Line-Suburban-Time-Table-19.08.2022
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. त्याच्या ड्रायवरची चौकशी केली असता तो प्रत्येक वेळी वेगळी स्टेटमेंट देत होता. त्यामुळे एका बाजूला संशय घातपाताचा संशय वाढत होता. पण दुसऱ्या बाजूने पाहता तो “रोड हिप्नोसिस” ह्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला बळी पडला हे अधिका अधिक स्पष्ट होत होते.
काय आहे हे “रोड हिप्नोसिस” किंवा रोड संमोहन? निष्णात ड्रायव्हिंग असतानाहि अपघात का होतात? ह्यावर काय उपाय आहेत हे सांगण्याचा आमचा एक हा प्रयत्न. हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून ह्या कारणाने होणारे अपघात टाळून जीव वाचतील.
“रोड हिप्नोसिस” म्हणजे काय?
रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे ज्याची बहुतेक चालकांना माहिती नसते.
रस्त्यावर वाहन चालवतांना साधारणपणे २.५ तासांनी रोड हिप्नोसिस सुरू होते.
संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात,पण मेंदू क्रियाशील राहत नाही आणि डोळा काय पाहतो त्याचे विश्लेषण करत नाही,परिणाम ” रोड हिप्नोसिस ” !
हेच तुमच्यासमोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस धडकून अपघात होण्याचे पहिले कारण आहे…
‘ रोड हिप्नोसिस ‘ असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या १५ मिनिटांत काहीही आठवत नाही.तो कोणत्या वेगाने जात आहे,किंवा समोरून येणाऱ्या गाडीच्या वेगाचे विश्लेषण करू शकत नाही,किंवा सविस्तर स्पष्टीकरण देवु शकत नाही. सहसा टक्कर १४० किमी पेक्षा जास्त वेगाने असते.
“रोड हिप्नोसिस” कसा टाळता येईल.
रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दर २.५ तासांनी चालकाने थांबावे, चहा किंवा कॉफी घ्यावी,
थोडी विश्रांती घ्यावी, ५/६ मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे.
तसेच वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.जर तुम्हाला वाहन चालवितांना शेवटच्या १५ मिनिटांतील काहीही आठवत नसेल,
तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि सहप्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात.
‘ रोड संमोहन ‘ हे सहसा रात्रीच्या वेळी घडते आणि अशावेळी प्रवासी झोपलेले असतांना परिस्थिती खूप गंभीर होते.
डोळे लागले तर अपघात अटळ आहे,पण डोळे उघडे असतांना मेंदू क्रियाशील असणे अत्यंत महत्त्वाचे आहे…
खूप वेळा पुरेशी झोप झालेली नसेल…आपण खूप थकलेले असु…ड्रायव्हिंग सतत करणं…अश्या वेळी या स्टेजची अनुभूती खूप वेळा मलाही आलेली आहे…
अश्या वेळी थोडावेळ थांबणे…गाडीतच थोडीशी हालचाल करणे…चहा किंवा पाणी पीणे..काहीच नाही तर स्वतःला करकचून चिमटा काढणे….असं केल्याने आपण सावध होऊ शकतो.गाणं ऐकणे किंवा सोबतच्या व्यक्ती सोबत गप्पा मारल्या तरी अशे प्रसंग टाळता येतात.
कधीतरी दिवस भर किंवा रात्रभर आराम न करता एकटाच गाडी चालवताना आपली गाडी चालू असते पुढे जात असते पण रोजचा रस्ता आपण विसरलेलो असतो…
नेमकी वळण, खड्डे , स्पीड ब्रेकर दिसतात पण लक्षात येत नाहीत,अश्या वेळी समजावं कि हि आपल्यासाठी यावेळी धोक्याची सुचना आहे.वरील उपाय करून आपण स्वतःला व आपल्या गाडीला वाचवू शकतो.
परवा अचानक एका emergency कामासाठी दिवसभर विश्रांती न घेता रात्री बारा वाजता झोपून दोन वाजता उठलो व पहाटे तीनला गाडी घराबाहेर काढली व सकाळी अकरा पर्यंत विनाथांबा सतत आठ तास ड्रायव्हिंग केलं.
त्या वेळी जवळपास तिन चार वेळा हा अनुभव आला..
पैकी दोन वेळा दिवसा अनुभव आला.
स्वतःला सावरलं ,रस्त्यावर खुपच तुरळक गाड्या होत्या.
पण अनुभव आला हे नाकारुन चालणार नाही.
आपणही जरा डोक्याला ताण द्या…लक्षात येईल प्रत्येक गाडी चालवणारा या स्टेजमधुन नक्कीच एकदा तरी गेलेला असतो.
फक्त हि स्टेज म्हणजे ” यमाची वेळ ” असते हे आपल्याला माहित नसतं किंवा माहिती असुनही आपण गांभीर्याने घेत नसतो व गाडी पळवतराहतो,मेंदूच्या निष्क्रिय अवस्थेत…आपल्याच बेधुंद अवस्थेत!
परिणामी भयंकर परिस्थितीला सामोर जाण्याची शक्यता कधीही येऊ शकते !
म्हणजे सावध तो सुखी
डॉ. संजीव लिंगवत, सिंधुदुर्ग.
अपेक्षित खाती न मिळाल्याने शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याची चर्चा आता चालू झाली आहे. दीपक केसरकर, दादा भुसे आणि संदीपान भुमरे त्यांना मिळालेल्या खात्यांबाबत नाराज असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
पुन्हा जुनेच खाते मिळाल्याने संदीपान भुमरे नाराज असल्याचे समजते. दीपक केसरकर यांना पर्यटन व पर्यावरण खाते मिळण्याची अपेक्षा होती, तसे त्यांनी बोलून पण दाखवले होते. पण त्यांना शालेय शिक्षण खात्याची धुरा दिल्याने ते पण नाराज असल्याचे समजते. कोकणसाठी पर्यटन खाते महत्वाचे होते, त्याद्वारे कोकणातील पर्यटनाचा विकास मला करता आला असता असे ते म्हणाले.
प्रकृतीच्या कारणावरून आपण आताच्या मुख्यमंत्र्यांना आणि आधीच्या सरकारातील मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेकरवी ज्या खात्याची मागणी केली होती ती त्यांची मागणी मान्य न करता त्यांना बंदरे व खनिकर्म हे खाते देण्यात आले असल्याने ते नाराज असल्याचे समजते.
ह्याआधी मंत्रीपदे न मिळाल्याने शिंदे गटात काही नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. आता जे मंत्री झाले आहेत त्यांना अपेक्षित खाती न भेटल्याने त्या मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांची नाराजी एकनाथ शिंदे कशी हाताळतात हे आता पुढील काळच सांगेल.
आज दिनांक १५/०८/२०२२ स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात येणारे १) पोलीस शौर्य पथक २) मा. राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय सेवेचे पोलीस पथक आणि ३) गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक महाराष्ट पोलीस दलाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रातील तीन पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. याबरोबरच 42 पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी 39 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली आहेत. देशभरातील अधिकाऱ्यांना 1082 पोलीस पदक जाहीर झाली असून 87 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 347 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि 648 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला 84 पदक मिळाली आहेत.
उल्लेखनीय सेवेचे पोलीस पदक
| अ. क्र. | नाव | पद आणि ठिकाण |
|---|---|---|
| 1 | श्री. सुनील वसंत कोल्हे | सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई |
| 2 | श्री. प्रदीप परशुराम कन्नलू | सहाय्य्क पोलीस आयुक्त, बिनतारी संदेश विभाग, ठाणे |
| 3 | श्री मनोहर दगडू धनवडे | वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई शहर |
पोलीस शौर्य पदक
| अ. क्र. | नाव आणि पद | |
|---|---|---|
| 1 | मनीष कलवानिया, भापोसे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक | औरंगाबाद |
| 2 | समीर शेख, अतिरीक्त पोलीस अधीक्षक | गडचिरोली |
| 3 | भाऊसाहेब ढोले , उप पोलीस अधीक्षक | गडचिरोली |
| 4 | महारुद्र परजाणे , सहायक पोलीस निरीक्षक | बीड |
| 5 | राजरत्न खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक | नवी मुंबई |
| 6 | राजू कांडो , पोलीस नाईक | गडचिरोली |
| 7 | अविनाश कुमरे, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 8 | गोगलु टिम्मा , पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 9 | संदीप भांड, सहायक पोलीस निरीक्षक | गडचिरोली |
| 10 | मोतीराम मडावी , सहायक पोलीस उपनिरीक्षक (द्वितीय बार) | गडचिरोली |
| 11 | दामोधर चिंतुरी , नाईक पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 12 | राजकुमार भडावी ,नाईक् पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 13 | सागर मुल्लेवार, नाईक पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 14 | शंकर मडावी , नाईक पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 15 | रमेश असाम , नाईक पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 16 | महेश सयाम , पोलीस कॉन्स्टेबल | गोंदिया |
| 17 | साईकृपा मिरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 18 | रत्नय्या गोरगुंडा, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 19 | संदीप मंडलिक, सहायक पोलीस निरीक्षक | गडचिरोली |
| 20 | मोतीराम मडावी, पोलीस उपनिरीक्षक | गडचिरोली |
| 21 | दयानंद महाडेश्वर, पोलीस उपनिरीक्षक | नवी मुंबई |
| 22 | जीवन उसेंडी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 23 | राजेंद्र मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 24 | विलास पाडा, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 25 | मनोज इस्कापे, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 26 | मनोज गज्जमवार, पोलीस नाईक | गडचिरोली |
| 27 | अशोक माज्जी, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 28 | देवेंद्र पाखमोडे, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 29 | हर्षल जाधव, पोलीस उपनिरीक्षक | पालघर |
| 30 | जगदेव मडावी (मरणोत्तर),हेड कॉन्स्टेबल (मरणोत्तर) | गडचिरोली |
| 31 | सेवकराम मडावी , हेड कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 32 | सुभाष गोंगाळे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 33 | रोहीत गोंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 34 | योगीराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक | गडचिरोली |
| 35 | धनाजी होणमाने , पोलीस उपनिरीक्षक (मरणोत्तर) | गडचिरोली |
| 36 | दसारु कुरसामी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 37 | दीपक विडपी, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 38 | सुरज गंजीवार, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 39 | किशोर अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोत्तर) | गडचिरोली |
| 40 | गजानन अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 41 | योगेश्वर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
| 42 | अंकुश खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल | गडचिरोली |
गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक
| अ. क्र. | नाव आणि पद |
|---|---|
| 1 | सुभाष निकम, उप पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेघण विभाग, औरंगाबाद |
| 2 | आप्पासाहेब शेवाळे , उप पोलीस अधीक्षक , पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा |
| 3 | संतोष जोशी , पोलीस निरीक्षक ,वायरलेस, पोलीस आयुक्त कार्यालय,औरंगाबाद |
| 4 | भानुदास खटावकर, पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण विभाग, नवी मुंबई |
| 5 | अशोक भगत , पोलीस निरीक्षक, गुन्हे विभाग, ठाणे |
| 6 | नितीन पोतदार, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, क्रॉफॉर्ड मार्केट,मुंबई |
| 7 | व्यंकट केंद्रे, पोलीस निरीक्षक, जिन्सी पोलीस स्थानक, औरंगाबाद शहर |
| 8 | दीलीप तवरे, सहायक कमांडंट,आय.आर.बी.आय.,जी.आर.-१४,औरंगाबाद |
| 9 | श्रीकांत अदाते, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मारोळ, मुंबई |
| 10 | राजेंद्र कोळी, सहायक पोलीस निरीक्षक, फोर्स१, एसआरपीएफ कँप, गोरेगांव मुंबई |
| 11 | सुनिल कुवेसकर, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नियंत्रण कक्ष, भायखडा, मुंबई |
| 12 | शंकर गांवकर, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई सागरी १ पोलीस स्थानक, माहीम,मुंबई |
| 13 | देवीदास बंड, आर्मड पोलीस सब इनस्पेक्टर,आयआरबी२,बीआयआरएसआय कँप.गोंदिया |
| 14 | क्रिष्णा हिसवणकर, पोलीस उपनिरीक्षक,उप विभागीय पोलीस कार्यालय,उस्मानाबाद |
| 15 | प्रदीप चांदेलकर, पोलीस उपनिरीक्षक, जिल्हापेठ पोलीस स्थानक, जळगाव |
| 16 | वाल्मीक मंढारे, पोलीस उपनिरीक्षक, कापुरबावडी पोलीस स्थानक, ठाणे शहर |
| 17 | सुनिल अंबराते, पोलीस उपनिरीक्षक, कन्हाण पोलीस स्थानक , नागपूर ग्रामीण |
| 18 | माणीक गाईकर, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा,नाईक शहर |
| 19 | जमीलुदृीन जागीरदार,पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय,सेलु, परभणी |
| 20 | विलास जामनेकर,पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, विभागीय पोलीस आयुक्त (डीसीपी) |
| 21 | अविनाश अक्कावार, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर |
| 22 | जितेंद्र मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर |
| 23 | माणीक सपकाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव, तालुक्का पोलीस स्थानक, जळगाव |
| 24 | विजय गेडाम, सहायक पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग सुरक्षा पोलीस , चंद्रपूर |
| 25 | प्रमोद ढोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली |
| 26 | प्रवीण बेझालवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अधीक्षक ,गडचिरोली |
| 27 | गुलाम मेहबुब गुलाम हैदर गलेकाटू, सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी सेल, लातूर |
| 28 | धनराज टाळेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, बोरीवली पोलीस स्थानक, मुंबई शहर |
| 29 | अशोक राणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ,गेन्हे शाखा, ठाणे शहर |
| 30 | संतोष वाजुरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड |
| 31 | भास्कर वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा,बुलडाणा |
| 32 | प्रदीप चिरमाडे, चालक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मोटर ट्रान्सपोर्ट विभाग,जळगाव |
| 33 | सुरेश कदम , सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी पथक, विक्रोळी युनीट,मुंबई |
| 34 | विजय पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव तालुका पोलीस स्थानक,जळगाव |
| 35 | सुनिल गीत, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक |
| 36 | राजेंद्र शिर्के, हेड कॉन्स्टेबल , रायटर/२४२१३,गुन्हे शाखा,युनाईट ९,वांद्रे, मुंबई |
| 37 | सुरेश पाटील, हेड कॉन्स्टेबल/१६६, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव |
| 38 | अशोक भोंडवे, गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई |
| 39 | सुर्यकांत अनांडे, पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय, उस्मानाबाद |











