Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway: कार-ऑन-ट्रेन सेवा सध्या नकोच

   Follow us on        

Konkan Railway: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोलाड (महाराष्ट्र) – वर्ना (गोवा) दरम्यान जाहीर करण्यात आलेली Ro-Ro (Roll-on/Roll-off) कार-फेरी रेल्वे सेवा ही संकल्पना नाविन्यपूर्ण असली तरीही, सध्या ही सेवा सुरू करणे अत्यंत गैरसोयीचे आहे. म्हणून, ही सेवा तत्काळ रद्द करण्यात याव, त्याऐवजी, हीच वेळ, ट्रॅक स्लॉट, मनुष्यबळ आणि संसाधने वापरून अधिक प्रवासी विशेष गाड्या चालवाव्यात अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे करण्यात आली आहे.

Ro-Ro सेवेसंदर्भातील मुख्य आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत:

१. वेळ आणि खर्चात फारसा फरक नाही:

रस्त्याने कोलाड ते वेर्णा प्रवासास सध्या १० ते १२ तास लागतात, तर Ro-Ro सेवेमुळे रेल्वेने १२ तासांचा प्रवास आहे. मात्र, ३ तासांपूर्वी पोहोचणे आणि गाडी लोडिंगची आवश्यकता असल्याने, एकूण वेळ वाचत नाही. त्यासोबतच ₹७,८७५ प्रति वाहन आणि प्रवाशांचे स्वतंत्र भाडे हा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नाही.

२. एका वाहनामागे फक्त ३ प्रवाशांची अट अव्यवहार्य:

गणपतीसारख्या सणामध्ये कुटुंबात ५ ते ७ सदस्य एकत्र प्रवास करतात. फक्त ३ प्रवाशांना परवानगी असल्याने उर्वरित सदस्यांसाठी स्वतंत्र प्रवासाची गरज भासते, आणि एकत्र प्रवासाचा हेतूचसाध्य होत नाही.

३. मर्यादित साधनसंपत्तीचा अपव्यय:

Ro-Ro गाडी चालवण्यासाठी लोको पायलट, सहायक, ट्रेन मॅनेजर आदींचा स्वतंत्र ताफा लागतो. हेच मनुष्यबळ आणि मार्ग वापरून एखादी पूर्ण प्रवासी गाडी चालवता आली असती, जी अधिक उपयोगी ठरली असती.

४. आधीच व्यापलेल्या मार्गावर आणखी भार:

कोकण रेल्वे मार्ग गणपती काळात अत्यंत गजबजलेला आणि तणावाखाली असतो. अशावेळी मालवाहतुकीसाठी वेगळी गाडी चालवणे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम करू शकते.

५. मधल्या स्थानकांवर चढ-उतार सुविधा नाही:

रो-रो सेवेसाठी कोलाड ते वेर्णा हा मार्ग थेट आहे. मार्गामध्ये कोणत्याही जिल्ह्यातील स्थानकांवर गाड्या लोड किंवा अनलोड करता येणार नाहीत, ज्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील प्रवाशांना याचा लाभच होणार नाही.

वरील गोष्टी लक्षात घेता, आपणास विनम्र विनंती आहे की:कोलाड–वेर्णा Ro-Ro सेवा रद्द करण्यात यावी, आणित्याऐवजी तिथे लागणारे स्लॉट, कर्मचारी आणि साधने वापरून अधिक प्रवासी विशेष गाड्या चालवाव्यात, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा थेट लाभ होईल.

आपण यावर गांभीर्याने विचार करून जनहितासाठी योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

२३ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 26:31:11 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 17:55:25 पर्यंत
  • करण-विष्टि – 15:34:14 पर्यंत, शकुन – 26:31:11 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-व्याघात – 12:34:03 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:15
  • सूर्यास्त- 19:16
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 29:25:00
  • चंद्रास्त- 18:17:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • जागतिक स्जोग्रेन्स दिन
  • राष्ट्रीय व्हॅनिला आइस्क्रीम दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1840 : कॅनडाचे प्रांत एकीकरणाच्या कायद्याद्वारे तयार केले गेले.
  • 1903 : फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकली.
  • 1904 : चार्ल्स I. मेन्सियस यांनी आइस्क्रीम कोनचा शोध लावला.
  • 1927 : बॉम्बेमध्ये रेडिओ क्लबने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले, जे नंतर आकाशवाणीमध्ये विकसित झाले.
  • 1929 : इटलीतील फॅसिस्ट सरकारने विदेशी शब्द वापरण्यास बंदी घातली.
  • 1942 : ज्यू एकाग्रता – ट्रेब्लिंका एकाग्रता शिबिर उघडले.
  • 1982 : आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशनने 1985-86 पासून व्यावसायिक व्हेलिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
  • 1983 : एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या 13 सैनिकांची हत्या केली.
  • 1986 : हिपॅटायटीस बी लसीची सुरुवात.
  • 1995 : हेल-बॉप धूमकेतूचा शोध.
  • 1999 : केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1856 : ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ – यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे जन्म. (मृत्यू: 1 ऑगस्ट 1920)
  • 1885 : ‘युलिसीस एस. ग्रॅन्ट’ – अमेरिकेचे 18 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 27 एप्रिल 1822)
  • 1886 : ‘वॉल्टर शॉटकी’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 4 मार्च 1976)
  • 1899 : ‘गुस्ताफ हाइनिमान’ – पश्चिम जर्मनीचे 3रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1906 : ‘चंद्रशेखर आझाद’ – थोर क्रांतिकारक यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला. (मृत्यू: 27 फेब्रुवारी 1931)
  • 1917 : ‘लक्ष्मीबाई यशवंत भिडे’ – नाट्य-चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1925 : ‘ताजुद्दीन अहमद’ – बांगलादेश चे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 3 नोव्हेंबर 1975)
  • 1936 : ‘शिव कुमार बटालवी’ – पंजाबी भाषेतील भारतीय कवी, लेखक आणि नाटककार यांचा जन्म.
  • 1927 : ‘धोंडुताई कुलकर्णी’ – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका यांचा जन्म.
  • 1947 : ‘डॉ. मोहन आगाशे’ – अभिनेते मानसोपचारतज्ज्ञ यांचा जन्म.
  • 1953 : ‘ग्रॅहम गूच’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1961: ‘विक्रम चंद्र’ – भारतीय-अमेरिकन लेखक यांचा जन्म.
  • 1961 : ‘मिलिंद गुणाजी’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म.
  • 1973 : ‘हिमेश रेशमिया’ – भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1975 : ‘सूर्य शिवकुमार’ – तमिळ अभिनेता यांचा जन्म.
  • 1976 : ‘ज्यूडीथ पोल्गार’ – हंगेरीची बुद्धीबळपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1885 : ‘युलिसिस ग्रांट’ – अमेरिकेचे 18वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1822)
  • 1997 : ‘वसुंधरा पंडित’ – शास्त्रीय गायिका यांचे निधन.
  • 1999 : ‘दादासाहेब रूपवते’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1925)
  • 2004 : ‘महेमूद’ – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म: 29 सप्टेंबर 1932)
  • 2012 : ‘लक्ष्मी सहगल’ – आझाद हिंद सेनेतील कॅप्टन यांचे निधन. (जन्म: 24 ऑक्टोबर 1914)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: गणेशोत्सव विशेष गाड्यांच्या नियोजनात अनेक त्रुटी; रेल्वे प्रवासी समितीने वेधले लक्ष

   Follow us on        

Konkan Railway: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर सोडलेल्या गणपती विशेष गाड्यांची यादी प्रसिद्ध झाली. ही प्रवाशांना दिलासा देणारी बाब असली तरी या नियोजनात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तरी, आपण याकडे लक्ष देऊन आणखी गणपती विशेष गाड्या सोडताना काही गोष्टींचा विचार करावा अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीतर्फे एका निवेदनातून करण्यात आली आहे. 

या निवेदनात समिती लिहिते….  

१. पुण्यातून सावंतवाडीसाठी एकही गाडी नाही. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला कोंकणाचे वावडे?

यंदा मध्य रेल्वे तर्फे २५० गणपती विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या मध्ये पुणे विभागातून केवळ १२ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ह्या १२ फेऱ्याही केवळ रत्नागिरीपर्यंतच असल्याने रत्नागिरी पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अद्यापही पुण्याहून आपल्या गावी जायला थेट रेल्वेगाडीची सोय नाही.

मात्र ह्याच पुणे विभागाने एप्रिल,मे,जून ह्या दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या म्हणून दानापूर, गोरखपूर, बनारस,गाझीपूर,जयपूर येथे तब्बल १९२ फेऱ्या चालवल्या होत्या. ह्यात अधोरेखित करणारी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या फेऱ्या ह्या महाराष्ट्रात नसून इतर राज्यात जाणाऱ्या आहेत. जर ह्या फेऱ्या ३ महिन्यांपूर्वी चालवल्या जात होत्या तर मग आताच पुणे विभागाकडे विशेष गाड्या चालवण्याची क्षमता नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.

२. ⁠चिपळूणसाठी फक्त ८ डब्यांची मेमू. संपूर्ण अनारक्षित गाडीचा फायदा केवळ गाडी सुटण्याच्या स्थानकातील प्रवाशांनाच होतो; त्यापुढील स्थानकांत गाडीत चढताच येत नाही.

येत्या गणेशोत्सवात सोडलेली ०११५५/०११५६ दिवा चिपळूण दिवा मेमू म्हणजे कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स किंवा दादर येथूनच चिपळूणकरिता विशेष गाडी सोडण्याची आवश्यकत

चिपळूण गाडी दादर आणि ठाण्याला थांबलीच पाहिजे. अन्यथा एवढ्या कमी अंतराच्या प्रवासासाठी गिरगाव, लालबाग, परळ, दादर, माहिम, वरळी, अंधेरी, सांताक्रुज, बोरिवली, कांदिवली, भाईंदर, विरार, वसई, घाटकोपर, भांडुप, ठाणे परिसरातील प्रवासी दिवा किंवा पनवेलला गाडी बदलण्यास उत्सुक नसतात. अति गर्दीचे दिवस वगळता लोक या दिवा किंवा पनवेल गाडीने जाणे टाळतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादरहून सुटल्यास चिपळूण गाडी वर्षभर गर्दीने भरून धावेल.

 संपूर्ण अनारक्षित गाडीत असल्यामुळे वेळेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना रेल्वेने आगाऊ आरक्षण करण्याचा पर्यायच दिलेला नाही. संपूर्ण अनारक्षित गाडी सुरुवातीच्या स्थानकातच पूर्णपणे भरत असल्यामुळे त्यापुढील स्थानकांतील प्रवाशांना या गाडीत जागा मिळत नाही. इतर स्थानकांवर केवळ गाड्यांची संख्या वाढलेली दिसते. त्याचा प्रवाशांना प्रत्यक्ष फायदा होत नाही. याउलट किमान काही आरक्षित डबे उपलब्ध असल्यास प्रवाशांना आपल्या जागेबाबत हमी मिळू शकते.

तसेच, ही दिलेली गाडीही केवळ आठ डब्यांची मेमू आहे. मुंबई ते कल्याण या ५५ किमीच्या मार्गावरही १२ डब्यांच्या गाड्या कमी पडत असून १५ किंवा १८ डब्यांची मागणी होत असताना दिवा चिपळूण या २३३ किमीसाठी भर गणेशोत्सवाच्या गर्दीच्या दिवसांत ८ डब्यांची गाडी देण्याची कल्पनाच चुकीची आहे. तसेच, खालील सीटच्या वरील भागात बसण्याची सोय नसणे तसेच, प्रत्येकी चार डब्यांमध्ये एक मोटार कोच असल्यामुळे मेमूची प्रवासी वहन क्षमता सामान्य गाडीपेक्षा ५०% कमी असते.

तरी, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादर येथूनच चिपळूणकरिता सामान्य द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअर कार तसेच सामान्य अनारक्षित डबे असलेली विशेष गाडी सोडावी. तसेच, ८ किंवा १२ डब्यांच्या मेमू न चालवता २२ डब्यांच्या गाड्याच चालवाव्यात.

३. ⁠गुजरातहून सावंतवाडीकरिता एकही गाडी नाही.

पश्चिम रेल्वेने गुजरातहून सोडलेल्या गाड्यांपैकी एकही गाडी सावंतवाडीपर्यंत जात नसल्यामुळे सध्या गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वापी, तर पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोईसर, पालघर विभागात राहणाऱ्या कोकणवासीयांना रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी एकही गणपती विशेष गाडी उपलब्ध नाही. तरी, पश्चिम रेल्वेने अहमदाबाद येथून सावंतवाडी किंवा पेडणेपर्यंत एखादी विशेष गाडी सोडण्याची आवश्यकता आहे.

४. मध्य रेल्वेतर्फे द्वितीय श्रेणी आरक्षित आणि एसी चेअर कार प्रकारातील एकही गाडी नाही

सर्व विशेष गाड्या विशेष दरांवर चालवल्या जात असल्यामुळे स्लीपर प्रकारातील डब्यांसाठी किमान ५०० किलोमीटरचे भाडे द्यावे लागते. त्यामुळे पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड अशा मुंबईपासून तुलनेने कमी अंतरावरील ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना दुपटीहून अधिक भाडे द्यावे लागते. उदा. ठाणे ते खेड प्रवासासाठी स्लीपर डब्याला सामान्य गाडीला प्रति प्रवासी १८५ रुपये आणि एसी थ्री टायरसाठी ५१५ रुपये भाडे असते तर विशेष गाडीला हेच भाडे स्लीपरला ३९० तर एसी थ्री टायरला १०६० रुपये द्यावे लागतात. हे नियमित गाडीपेक्षा दुपटीपेक्षा अधिक आहे.

म्हणूनच, दिवसा धावणाऱ्या सर्व गाडयांना सीटिंग आणि एसी चेअर कार डबे असावेत किंवा स्लीपर डबे सीटिंग म्हणून आणि एसी थ्री टायर डबे एसी चेअर कार म्हणून वापरावेत.

५. मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड विशेष गाडीच्या वारंवारतेत मागील वर्षीपेक्षा कपात 

मागील वर्षी पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल सावंतवाडी विशेष गाडी आठवड्यातून सहा दिवस सोडली होती. यावर्षी त्यात कपात करून ही गाडी आठवड्यातून केवळ चार दिवस सोडलेली आहे. परराज्यात भरभरून गाड्या सोडणाऱ्या पश्चिम रेल्वेला महाराष्ट्रात गाड्या सोडण्यासाठी साधनसंपत्ती (डबे, इंजिन, पिटलाईन,ई.) उपलब्ध नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. तरी, पश्चिम रेल्वे मुंबई विभागाने आणखी काही गाड्यांची व्यवस्था करावी. 

६. मागील वर्षी खेड येथून सोडलेल्या गाड्या केवळ पनवेल पर्यंतच होत्या. त्या ऐवजी या गाड्या मध्य रेल्वेवर दादर किंवा पश्चिम रेल्वेवर वसई रोड पर्यंत चालवाव्यात.

वरील निवेदन समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी संबधित रेल्वे कार्यालये आणि अधिकार्‍यांना पाठवले आहे. 

Mumbai: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वनराणी’ पुन्हा धावणार

   Follow us on        

मुंबई: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान-मोठ्यांना आकर्षित करणारी ‘वनराणी’ धावणार आहे. मे 2021 मध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर बंद पडलेली मिनी ट्रॉय ट्रेन आता पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ऑगस्टपासून ही ट्रॉय ट्रेन पर्यटकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा, नौकाविहार, वाघ-सिंह सफारी, निसर्ग माहिती केंद्र आदींबरोबरच ‘वनराणी’ ही देखील पर्यटकांचे आकर्षण होती. मुलांबरोबरच त्याचे पालकही ‘वनराणी’ या मिनी टॉय ट्रेन’ मधून उद्यानाची सफर करत मजा लुटत होते. मात्र, 2021 मध्ये आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळात राष्ट्रीय उद्यानात शेकडो वृक्षांची पडझड झाली. तसेच अनेक रस्ते देखील उखडले गेले. तेव्हा ‘वनराणी’च्या एका वळणावर झाडे पडल्याने रुळांसह स्लीपर्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ही ट्रॉय ट्रेन बंद झाली होती.

Loading

२२ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 07:07:52 पर्यंत, त्रयोदशी – 28:42:01 पर्यंत
  • नक्षत्र-मृगशिरा – 19:25:46 पर्यंत
  • करण-तैतुल – 07:07:52 पर्यंत, गर – 17:53:33 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-घ्रुव – 15:32:00 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:14
  • सूर्यास्त- 19:16
  • चन्द्र-राशि-वृषभ – 08:15:50 पर्यंत
  • चंद्रोदय- 28:19:59
  • चंद्रास्त- 17:15:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • पाई(pi) दिवस 22/7
  • जागतिक मेंदू दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1908: देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना 6 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
  • 1894: फ्रान्समध्ये पॅरिस आणि रौएन या शहरांमध्ये पहिली मोटर शर्यत झाली.
  • 1931: वासुदेव बळवंत गोगटे यांनी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉन हॉटसन यांच्यावर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात गोळ्या झाडल्या, हॉटसन वाचला.
  • 1933: पायलट विली पोस्टने 7 दिवस, 18 तास आणि 49 मिनिटांच्या विक्रमी वेळेत पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली.
  • 1942: वॉर्सा येथून ज्यूंच्या हद्दपारीला सुरुवात झाली.
  • 1944: पोलंडमध्ये कम्युनिस्ट राजवट सुरू झाली.
  • 1946: इरगुन्या दहशतवादी संघटनेने जेरुसलेममधील ब्रिटीश मुख्यालयावर बॉम्बस्फोट केला. त्यापैकी 90 जण ठार झाले.
  • 1947: राष्ट्रध्वजाचा स्वीकार.
  • 1977: चीनचे नेते डेंग झियाओपिंग पुन्हा सत्तेवर आले.
  • 1993: कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया यांचा अमेरिकेतील अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये समावेश करण्यात आला.
  • 2001: ऑस्ट्रेलियन जलतरणपटू इयान थॉर्पने जागतिक जलतरण स्पर्धेत 400 मीटर फ्रीस्टाइलमध्ये 3 मि. 40.17 सेकंदात जिंकला.
  • 2019: चांद्रयान-2, चांद्रयान-1 नंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विकसित केलेली दुसरी चंद्र शोध मोहीम सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV मार्क III M1 मध्ये प्रक्षेपित करण्यात आली. यात चंद्राच्या परिभ्रमण यंत्राचा समावेश आहे आणि त्यात
  • विक्रम लँडर आणि प्रज्ञान चंद्र रोव्हरचाही समावेश आहे

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1887: ‘गुस्तावलुडविग हर्ट्झ’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1898: ‘पं. विनायकराव पटवर्धन’ – शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 23 ऑगस्ट 1975)
  • 1915: ‘शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला’ – भारतीय-पाकिस्तानी राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 11 डिसेंबर 2000)
  • 1923: ‘मुकेश चंदमाथूर’ – हिंदी चित्रपट पार्श्वगायक यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑगस्ट 1976)
  • 1925: ‘गोविंद तळवलकर’ – पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक यांचा जन्म.
  • 1937: ‘वसंत रांजणे’ – मध्यमगती गोलंदाज यांचा जन्म. (मृत्यू: 22 डिसेंबर 2011)
  • 1970: ‘देवेंद्र फडणवीस’ – महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1992: ‘सेलेना गोमेझ’ – अमेरिकन गायक व अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1995: ‘अरमान मलिक’ – भारतीय पार्श्वगायक, संगीतकार आणि गीतकार यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1540: ‘जॉन झापोल्या’ – हंगेरीचा राजा यांचे निधन.
  • 1826: ‘ज्युसेप्पे पियाझी’ – इटालियन खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1918: ‘इंदरलाल रॉय’ – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट यांचे निधन. (जन्म: 2 डिसेंबर 1898)
  • 1984: ‘गजानन लक्ष्मण ठोकळ’ – साहित्यिक आणि प्रकाशक यांचे निधन.
  • 1995: ‘हेरॉल्ड लारवूड’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1904)
  • 2003: सद्दाम हुसेनचे मुले उदय हुसेन, कुसय हुसेन यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

आरे-वारे दुर्घटना: तीन सख्ख्या बहिणींचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

रत्नागिरी:आरे-वारे समुद्रात चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. मृतांमध्ये ३ सख्ख्या बहिणींचा समावेश आहे आणि एकीच्या नवऱ्याचा समावेश आहे. या मुलींचे वडील शमसुद्दीन शेख हे दुबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असून मुली व जावयाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तातडीने ते रत्नागिरी येथे येण्यासाठी निघाले असून त्यानंतर तिनही मुलींवर अंत्यसंस्कार केले जातील, असे सांगण्यात आले.

उज्मा शमसुद्दीन शेख (१८), हुसेरा शमसुद्दीन शेख (२०), जेनब जुनेद काझी (२८) अशी या तीन सख्ख्या बहिणींची नावे आहेत. तर जैनब यांचे पती जुनेद यांचाही आरे-वारे येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. १९ जुलै रोजी शमसुद्दीन यांच्या ३ मुली व जावई हे दुचाकीवरुन आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेले होते. समुद्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या शमसुद्दीन यांच्या मुली सुट्टी असल्याने रत्नागिरीत आल्या होत्या. तर त्यांचे वडील हे दुबई येथे वास्तव्यासाठी होते. घटनेची तातडीने खबर शमसुद्दीन यांना कळविण्यात आली. यानंतर दुबई येथून ते भारतात येण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चारही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ठेवण्यात आले आहेत. मुलींचे वडील आल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

२१ जुलै पंचांग आणि दिनविशेष


  1. आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 09:41:14 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 21:07:52 पर्यंत
  • कर-णबालव – 09:41:14 पर्यंत, कौलव – 20:24:04 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-वृद्वि – 18:38:30 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:14
  • सूर्यास्त- 19:16
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 27:15:59
  • चंद्रास्त- 16:11:00
  • ऋतु- वर्षा

महत्त्वाच्या घटना :

  • 356 : 356 इ.स. पूर्व : जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.
  • 1831 : बेल्जियमचा राजा लिओपोल्ड पहिला याने शपथ घेतली.
  • 1944 : 20 जुलै 1944 रोजी ॲडॉल्फ हिटलरच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या क्लॉस वॉन स्टॉफेनबर्गला फाशी देण्यात आली.
  • 1960 : सिरिमाओ बंदरनायके श्रीलंकेचे 6 वे पंतप्रधान बनले. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
  • 1961 : मर्क्युरी-रेडस्टोन 4 मोहिमेवर गुस ग्रिसम हे अंतराळातील दुसरे अमेरिकन बनले.
  • 1976 : आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या झाली.
  • 1983 : पृथ्वीवरील सर्वात कमी तापमानाची नोंद वोस्तोक, अंटार्क्टिका येथे उणे 89.2 सेल्सिअस होती.
  • 2002 : जगभरात दूरसंचार सेवा पुरवणारी अमेरिकन कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळखोरी जाहीर केली.
  • 2008 : राम बरन यादव यांना नेपाळचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
  • 2022 : द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून निवड.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1853 : ‘शंकर बाळकृष्ण दीक्षित’ – ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक यांचा जन्म. (मृत्यू: 27 एप्रिल 1898)
  • 1899 : ‘अर्नेस्ट हेमिंग्वे’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 2 जुलै 1961)
  • 1910 : ‘वि. स. पागे’ – स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 1990)
  • 1911 : ‘उमाशंकर जोशी’ – भारतीय लेखक, कवी आणि विद्वान यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1988)
  • 1930 : ‘आनंद बक्षी’ – भारतीय कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 30 मार्च 2002)
  • 1930 : ‘डॉ. रा. चिं. ढेरे’ – भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक यांचा जन्म.
  • 1934 : ‘चंदू बोर्डे’ – क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1942 : ‘मल्लिकार्जुन खरगे’ – भारतीय राजकारणी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 98 वे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1945 : ‘बॅरी रिचर्ड्स’ – दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1947 : ‘चेतन चौहान’ – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य यांचा जन्म.
  • 1960 : ‘अमरसिंग चमकीला’ – पंजाबी गायक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मार्च 1988)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1972 : ‘जिग्मेदोरजी वांगचूक’ – भूतानचे राजे यांचे निधन. (जन्म: 2 मे 1929)
  • 1994 : ‘डॉ. र. वि. हेरवाडकर’ – मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक यांचे निधन.
  • 1995 : ‘सज्जाद हुसेन’ – संगीतकार मेंडोलिन वादक यांचे निधन.
  • 1997 : ‘राजा राजवाडे’ – साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1936)
  • 1998 : ‘ऍलन शेपर्ड’ – अमेरिकन अंतराळवीर यांचे निधन.
  • 2001 : ‘शिवाजी गणेशन’ – दाक्षिणात्य अभिनेते यांचे निधन. (जन्म: 1 ऑक्टोबर 1928)
  • 2002 : ‘गोपाळराव बळवंतराव कांबळे’ – मराठी चित्रकार यांचे निधन.
  • 2009 : ‘गंगूबाई हनगळ’ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचे निधन. (जन्म: 5 मार्च 1913)
  • 2013 : ‘लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी’ – भारतीय मार्शल आर्टिस्ट यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1981)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ’कार ऑन ट्रेन’ सेवेची सुरवात; उद्यापासून बुकिंग चालू, संपूर्ण माहिती इथे वाचा

   Follow us on         रत्नागिरी: कोकण रेल्वेने सुरु केलेल्या ’रो-रो’ सेवेच्या यशस्वी प्रयोगानंतर, आता प्रथमच प्रवाशांसाठी ’कार ऑन ट्रेन’ ही अभिनव सेवा सुरू केली जात आहे. यामुळे आता तुम्ही स्वतः प्रवास करताना तुमची लाडकी कार थेट रेल्वेने कोकणात किंवा गोव्यात घेऊन जाऊ शकणार आहात.

ही सेवा येत्या २३ ऑगस्टपासून सुरू होणार असून, यासाठीचे आरक्षण २१ जुलै २०२५ पासून खुले होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी खर्‍या अर्थाने ’चिंतामुक्त’ प्रवासाचा अनुभव देणारा ठरेल.

प्रवास भाडे
सुरवातीला  कोलाड (महाराष्ट्र) ते वेर्णा (गोवा) दोन्ही बाजूने फक्त अंतिम स्थानकांकरिता ही सेवा सुरु केली जाणार आहे. या सेवेसाठी प्रत्येक कारसाठी शुल्क ७ हजार ८७५ रुपये असणार असून बुकिंग करताना ४००० रुपये ( नोंदणी शुल्क) घेतले जाणार आहेत. उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी जमा करावी लागणार आहे. कारसोबत त्याच गाडीमध्ये तिघांना प्रवास करता येणार आहे. दोन प्रवाशांना ३ टायर एसी कोच मध्ये प्रति प्रवासी ९३५ रुपये तिकीट रक्कम आकारण्यात येणार आहे. तिसरा प्रवासी असल्यास त्यास स्लीपर कोच मध्ये सेकंड सीटिंगच्या प्रवास भाड्यात म्हणजे १९० रुपये आकारून प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. जर काही अतिरिक्त प्रवासी असतील त्यांना कोचमध्ये रिकाम्या जागा असतील तरच परवानगी दिली जाईल. त्यासाठी रेल्वे प्रशासन बांधील असणार नाही. प्रवासाच्या दिवशी, ग्राहकाने प्रस्थान वेळेच्या आधी दुपारी २:०० वाजेपर्यंत उपस्थित राहावे आणि मालवाहतुकीची उर्वरित रक्कम स्टेशनवर भरावी. जर प्रवासी आले नाहीत तर नोंदणी शुल्क जप्त केले जाईल

प्रवासाची वेळ
ही सेवा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान उपलब्ध असेल. या सेवेची सुरुवात कोलाड (महाराष्ट्र) येथून २३ ऑगस्ट २०२५ पासून तर वेर्णा (गोवा) येथून २४ ऑगस्ट २०२५ पासून होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता ही गाडी गोव्याच्या दिशेनं रवाना होणार असून ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता वेर्णा येथे पोहचेल. परतीच्या प्रवासातही ती वेर्णा येथून संध्याकाळी ५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता कोलाड येथे पोहोचेल. प्रवाशांना मात्र तीन तास अगोदर म्हणजे दुपारी २ वाजता आरंभ स्थानकांवर पोहचणे गरजेचे आहे.

सेवा कधीपासून सुरू?
– कोलाड (महाराष्ट्र) येथून: 23 ऑगस्ट 2025 पासून.
– वेर्णा (गोवा) येथून: 24 ऑगस्ट 2025 पासून.
– ही सेवा 11 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहील.

ही सेवा खालील दिवशी उपलब्ध असणार आहे.

आरक्षण कधी आणि कसे?

-बुकिंग सुरू: 21 जुलै 2025.
-बुकिंगची अंतिम तारीख: 13 ऑगस्ट 2025.

कोलाड-वेर्णा सेवेसाठी संपर्क
मुख्य वाणिज्य व्यवस्थापक यांचे कार्यालय
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
४था मजला, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर,
नवी मुंबई ४०० ६१४.
संपर्क क्रमांक ९००४४७०९७३

वेर्णा-कोलाड सेवेसाठी संपर्क
वेर्णा रेल्वे स्टेशन
वेर्णा, गोवा
संपर्क क्रमांक ९६८६६५६१६०

…तर प्रवास रद्द होईल
प्रत्येक ट्रिपची कमाल क्षमता ४० कारची असेल. रेकमध्ये २० वॅगन असतील आणि प्रत्येक वॅगनमध्ये दोन कार असतील. जर प्रत्येक ट्रिपमध्ये १६ कारपेक्षा कमी बुकिंग झाली तर त्यादिवसाची सेवा रद्द केली जाईल. अशा परिस्थितीत, ग्राहकाने भरलेले नोंदणी शुल्क कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून परत केले जाईल.

एकदा सेवा बुक केल्यानंतर रद्द करण्याची परवानगी नाही. जर केआरसीएल द्वारे सेवा चालवल्या जात नसतील, तर ग्राहकाने भरलेले नोंदणी शुल्क बुकिंगच्या वेळी ग्राहकाने दिलेल्या बँक खात्यात परत केले जाईल.

आवश्यक कागदपत्रे
(i) आधार कार्डची प्रत
(ii) पॅन कार्डची प्रत
(iii) गाडीच्या आरसी बुक/कार्डची प्रत
(iv) गाडीच्या वैध विम्याची प्रत

काय आहेत फायदे?
-मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांपासून सुटका.
– प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत.
– लांबच्या प्रवासात गाडी चालवण्याचा शारीरिक आणि मानसिक त्रास वाचणार.
– कोकणात किंवा गोव्यात फिरण्यासाठी स्वतःची गाडी उपलब्ध.

या सेवेच्या अधिक माहितीसाठी, www.konkanrailway.com ला भेट द्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मुंबई गोवा महामार्गावर गुंडाराज! सात ते आठ जणांच्या टोळक्याने सिंधुदुर्गातील तिघांना मारहाण करून पैसे उकळल्याचा प्रकार समोर

   Follow us on        

सिंधुदुर्ग: मुंबई – गोवा महामार्गावर आता गुंडाराज सुरु झालंय का? असा सवाल उपस्थित होणारी घटना राजापूर येथे घडली आहे. सात ते आठ जणांच्या टोळक्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिघांना जबरदस्तीने मारहाण करत पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महामार्गावरील डोंगर फाटा येथे गुरुवारी (१७ जुलै) रोजी ही घटना घडली.

याबाबत शशिकांत शंकर परब (६०, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) यांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे. यावरुन सात ते आठ अनोळखी लोकाविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शशिकांत यांचा मुलगा व मुलाचा मित्र यांच्यासोबत मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने प्रवास करत होते. डोंगर फाटा येथे आल्यानंतर एका कारने त्यांच्या कारला जोराची धडक दिली.

कारने धडक दिल्यानंतर त्या कारमधून (एमएच १८ एजे ७०५६) सात ते आठजण खाली उतरले आणि त्यांनी फिर्यादी व त्यांच्यामुलासह मित्राला धमकावून मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयितांनी अश्लील शिवीगाळ देखील केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर संशयितांनी फिर्यादी यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने चार हजार रुपये जबरदस्तीने घेतले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पावसाळ्यात महामार्गवरील खड्यांचा होणारा त्रास आणि इतर समस्यांचा कोकणी माणूस त्रास सहन करत असताना आता गुंडगिरीचे संकट महामार्गावर पाहायला मिळत आहे.

२० जुलै पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 12:15:18 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 22:54:12 पर्यंत
  • करण-विष्टि – 12:15:18 पर्यंत, भाव – 22:58:34 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-गण्ड – 21:47:50 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:14
  • सूर्यास्त- 19:16
  • चन्द्र-राशि-मेष – 06:12:45 पर्यंत
  • चंद्रोदय- 26:18:00
  • चंद्रास्त- 15:05:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस
  • जागतिक बुद्धिबळ दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1296 : अलाउद्दीन खिलजीने स्वतःला दिल्लीचा सुलतान घोषित केले
  • 1402 : तैमूर लँगने तुर्कीमधील अंकारा शहर जिंकले.
  • 1807 : निसेफोरस निपसला जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट देण्यात आले.
  • 1828 : मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
  • 1871 : ब्रिटिश कोलंबिया प्रांत कॅनडामध्ये विलीन झाला.
  • 1903 : फोर्ड मोटर कंपनीकडून पहिली ऑटोमोबाईल आणली गेली.
  • 1908 : बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तृतीय) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली.
  • 1921 : न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यान हवाई मेल सेवा सुरू झाली.
  • 1926 : मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – क्लॉस फॉन स्टॉफेनबर्गने केलेल्या हत्येच्या प्रयत्नात ॲडॉल्फ हिटलर वाचला.
  • 1949 : इस्रायल आणि सीरियाने शांतता करारावर स्वाक्षरी करून 19 महिन्यांचे युद्ध संपवले.
  • 1952 : फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे 15 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1960 : सिरिमावो बंदरनायके श्रीलंकेचे पंतप्रधान झाले.
  • 1969 : नील आर्मस्ट्राँग चंद्रावर चालणारा पहिला माणूस बनला.
  • 1973 : केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस केनो यांनी घोषणा केली की देशातील आशियाई व्यवसाय वर्षाच्या अखेरीस बंद करण्यास भाग पाडले जातील.
  • 1976 : पहिले मानवरहित अंतराळयान वायकिंग-1 मंगळावर उतरले
  • 1989 : म्यानमार सरकारने आँग सान स्यू की यांना नजरकैदेत ठेवले.
  • 2000 : अभिनेते दिलीप कुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर.
  • 2015 : अमेरिका आणि क्युबा यांनी पाच दशकांनंतर राजनैतिक संबंध पुन्हा सुरू केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 356 : 356ई.पूर्व : ‘अलेक्झांडर द ग्रेट’ – मॅसेडोनियाचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 11 जून ख्रिस्त पूर्व 323)
  • 1822 : ‘ग्रेगोर मेंडेल’ – जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 6 जानेवारी 1884)
  • 1836 : ‘सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट’ – ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर यांचा जन्म. (मृत्यू : 22 फेब्रुवारी 1925 – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)
  • 1889 : ‘जॉन रीथ’ – बीबीसी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1971)
  • 1911 : ‘बाका जिलानी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1919 : ‘सर एडमंड हिलरी’ – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक यांचा जन्म. (मृत्यू : 11 जानेवारी 2008)
  • 1921 : ‘पंडित सामताप्रसाद’ – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक यांचा जन्म. (मृत्यू : 31 मे 1994)
  • 1929 : ‘राजेंद्रकुमार’ – हिन्दी चित्रपट अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू : 12 जुलै 1999)
  • 1976 : ‘देबाशिष मोहंती’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1922 : ‘आंद्रे मार्कोव्ह’ – रशियन गणितज्ञ यांचे निधन.
  • 1937 : ‘गुग्लिएल्मो मार्कोनी’ – रेडिओचे संशोधक यांचे निधन. (जन्म : 25 एप्रिल 1874)
  • 1943 : ‘वामन मल्हार जोशी’ – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1882)
  • 1951 : ‘अब्दुल्ला (पहिला)’ – जॉर्डनचा राजा यांचे निधन.
  • 1965 : ‘बटुकेश्वर दत्त’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 18 नोव्हेंबर 1910)
  • 1972 : ‘गीता दत्त’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 23 नोव्हेंबर 1930)
  • 1973 : ‘ब्रूस ली’ – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1940)
  • 1995 : ‘शंकरराव बोडस’ – शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म : 4 डिसेंबर 1935)
  • 2013 : ‘खुर्शिद आलम खान’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1919)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search