Author Archives: Kokanai Digital
Konkan Railway News: दिवाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मध्यरेल्वेच्या सहकार्याने दिवाळी हंगामात आठवड्यातुन तीन दिवस धावणारी एक दिवाळी स्पेशल गाडी चालविणार आहे.
Train No. 01129 / 01130 Lokmanya Tilak (T) – Thivim – Lokmanya Tilak (T) Special (Tri-Weekly) :
ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीम या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train No. 01129 Lokmanya Tilak (T) – Thivim – Special (Tri-Weekly) :
दिनांक 01/11/2023 ते 29/11/2023 शनिवार, सोमवार आणि बुधवार या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री 22:15 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 10:00 वाजता थीवी या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01130 Thivim- Lokmanya Tilak (T) – Special (Tri-Weekly) :
दिनांक 02/11/2023 ते 30/11/2023 रविवार , मंगळवार आणि गुरुवार या दिवशी ही गाडी थीवी या स्थानकावरुन संध्याकाळी 15:00 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी पहाटे 04:05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे , राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड , कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.
डब्यांची संरचना
फर्स्ट एसी – 01, टू टायर एसी + फर्स्ट एसी (एकत्रित) – 01 +थ्री टायर एसी – 04 + सेकंड स्लीपर – 09 + जनरल – 04+ एसएलआर व अन्य – 02 असे मिळून एकूण 21 डबे
आरक्षण
Trains no. 01130 Thivim – Lokmanya Tilak या गाडीचे आरक्षण परवा दिनांक २७ ऑक्टोबर 2023 पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहेत.
Iffi Goa 2023: गोवा चित्रपट महोत्सवात या वर्षी भारतीय पॅनोरमामध्ये दाखवल्या जाणाऱ्या 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्सची यादी सोमवारी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) प्रसिद्ध केली.
इंडियन पॅनोरमा श्रेणी अंतर्गत निवडलेले हे 45 चित्रपट 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोवा चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. या चित्रपटांची निवड 12 तज्ज्ञांच्या ज्युरीने केली होती. ज्युरींना फीचर फिल्म श्रेणीसाठी एकूण 408 चित्रपटांकडून अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 25 चित्रपट निवडले गेले आहेत. मात्र मुख्य विभागात एकही मराठी चित्रपटांचा समावेश करण्यात आलेला नाही.
निवडले गेलेल्या चित्रपटांची नावे आणि दिग्दर्शक खालीलप्रमाणे:
- आरारीरारू – कन्नड – संदीप कुमार वी
- आट्टम – मल्याळम – आनंद एकर्षि
- अर्धांगिनी – बंगाली – कौशिक गांगुली
- डीप फ्रिज – बंगाली – अर्जुन दत्ता
- ढाई आखर – हिंदी – प्रवीण अरोड़ा
- इरट्टा – मल्याळम- रोहित एम जी कृष्णन
- कादल एनबातु पोतु उदमाई – तमिळ- जयप्रकाश राधाकृष्णन
- काथल – मल्याळम- जेओ बेबी
- कांतारा – कन्नड – ऋषभ शेट्टी
- मलिकाप्पुरम – मल्याळम- विष्णु शशि शंकर
- मंडली – हिंदी – राकेश चतुर्वेदी ओम
- नीला नीरा सूरियां – तमिळ- संयुक्ता विजयन
- न्ना थान केस कोडू – मल्याळम- गणेश राज
- रबींद्र काब्य रहस्य – बंगाली – सयांतन घोषाल
- सना – हिंदी – सुधांशु सरियाद
- वैक्सीन वार – हिंदी – विवेक अग्निहोत्री
- वध – हिंदी – जसपाल सिंह संधू
- विदुथलाई पार्ट 1- तमिळ- वेट्री मारन
- 2018 एवरीवन इज ए हीरो – मल्याळम – जे ए जोसफ
- गुलमोहर – हिंदी – राहुल वी चिट्टेला
- पोन्नियिन सेल्वन पार्ट – तमिळ- मणिरत्नम
- सिर्फ एक बंदा काफी है – हिंदी – अपूर्व सिंह कर्की
- द केरल स्टोरी – हिंदी – सुदीप्तो सेन
सिंधुदुर्ग : मागील दोन दिवसांत महावितरणमध्ये कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा सावंतवाडी व वेंगुर्ला येथे अपघात घडलेला असून त्यात एक कर्मचारी जीवास मुकला आहे. सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे झालेल्या अपघात प्रकरणात पुन्हा एकदा मृत कर्मचाऱ्यांकडे काम करताना संरक्षक साहित्य नसल्याचे दिसून आले आहे.मागील वर्षभरात ११ अपघात होऊन त्यात ५ कर्मचाऱ्यांचा बळी जाऊन देखील महावितरणचे निर्ढावलेले अधिकारी व ठेकेदार सुशेगात असल्याचा आरोप मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा स्वाभिमान कामगार संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला आहे.कंत्राटदार किंवा महावितरणकडून कामगारांना बूट ,हॅंड ग्लोज ,सेफ्टी बेल्ट, हॅल्मेट आदी संरक्षक साहित्य पुरवले जात नसल्याने कर्मचारी अपघाताचे बळी ठरत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य तांत्रिक प्रशिक्षण देऊनच विद्युत वाहिन्यांवरील काम देणे नियमाधीन असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणचे अधिकारी व ठेकेदाराची मुजोरी चाललेली आहे.
महावितरणचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी एसी केबिनच्या बाहेर पडून कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करत आहेत हे पहावे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजतील. आणि मर्जीतला ठेकेदार नेमण्यापेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांना संरक्षक साहित्य देणारा ठेकेदार नेमावा असा टोला देखील गावडेंनी लगावला आहे. जिल्हयाचे विद्युत निरीक्षक झोपले आहेत का ? असा सवाल उपस्थित करत ओरोस येथील विद्युत निरीक्षक कार्यालयाला लॉक लावण्याचा इशारा मनसेच्या वतीने गावडे यांनी दिला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुणीही वाली राहिला नसून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे म्हणजे मृतांच्या वारसांनी जणू चेष्टाचं केल्यासारखे आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी मागील वर्षभरातील अपघाती मृत्यू प्रकरणी दोषी असलेला ठेकेदार व महावितरणचे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश द्यावेत व मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई देऊन अपघाती कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना न्याय द्यावा अशी मागणी गावडेंनी केलेली आहे.