“सावंतवाडी टर्मिनस” व्हावे यासाठी कोकणी माणूसच आग्रही नाही?

सागर तळवडेकर |सावंतवाडी :या वर्षीचा गणेशोत्सवात चाकरमानी आतापर्यंतचा सर्वात जास्त प्रमाणात रेल्वे प्रवास करत आपल्या गावी पोहोचलो खरे,परंतु चाकरमान्यांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, रेल्वे प्रशासनाला एकेरी मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.अनेकांना ४-५ तास स्टेशन वर ताटकळत उभे राहावे लागले, गाडीतील अस्वच्छता, पाण्याची असुविधा, सदोष बोगी संरचना आदी, अनेक छोट्या मोठ्या अडचणी ह्या सर्व चाकरमान्यांना येताना आणि मुंबईला परतताना सहन कराव्या लागल्या, आणि पुन्हा एकदा कोकणात स्वतंत्र असे टर्मिनस व्हावे ही जुनी मागणी डोळ्या समोर आपसूकच आली.
पण दुदैर्व.. “सावंतवाडी टर्मिनस” व्हावे असे कोकणी माणसाला वाटतच नाही असेच दिसते. चाकरमाण्यांपासून मालवणी माणूस देखील याला अनुकूल नाहीच असे दिसते. सावंतवाडीत टर्मिनस व्हावे यासाठी पहिल्यांदा कै. वालावलकर,आणि स्वतः कोकण रेल्वेचे जनक कै. मधु दंडवते यांनी नियोजन केले, त्यांनतर २००६ पासून समाजवादी आमदार कै. जयानंद मठकर, त्यांनतर कै. डी के सावंत यांनी अथक प्रयत्न केले, पत्रव्यवहार केले आणि त्याची पायाभरणी बॅरिस्टर नाथ पै यांचा वारसा पुढे नेणारे माजी खासदार श्री सुरेश प्रभू यांनी २०१५ ला केली. परंतु हे टर्मिनस आता निधी अभावी रखडणार आहे हे माझ्यासारख्या टर्मिनस प्रेमीला कितपत पचनी पडेल हे सांगता येत नाही. टर्मिनस साठी निधी नाही हे सांगत खासदार महोदयांनी आपले हात वर केलेत असेच काही दिसते आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असे बोलणे कितपत योग्य आहे हे येणारी निवडणुकीच ठरवेल.
काही जणांना टर्मिनस म्हणजे काय हे देखील माहित नसेल, त्यांसाठी मी थोडी त्याबद्दल माहिती देतो,रेल्वेचे टर्मिनस ज्या ठिकाणी प्रस्तावीत होते म्हणजेच त्या ठिकाणाहून रेल्वे सुरू करण्याचे / सोडण्याचे नियोजन करण्यात येते, रेल्वे सोडताना तेथे रेल्वे उभी करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका, रेल्वे बोगी धुण्याची सोय, पाणी भरण्याची सोय, आदी कामे केली जातात. जेणेकरून भविष्यात या टर्मिनस वरून काही गाड्या ह्या चालवण्यात येतील, त्या गाडीची देखभाल केली जाईल. ही सर्व कामे सध्या गोव्यातील मडगाव येथे केली जातात,परंतु सध्याचा घडीला मडगाव स्टेशन हे गणेशोत्सवातील किंवा इतर मोठ्या सण किंवा उत्सवाला अतिरिक्त भार घेण्यास सक्षम   नाही. त्यामुळे कोकणातील या गर्दीचा भार उचलण्याचे काम सावंतवाडी टर्मिनस ने नक्की केले असते, जेणेकरून स्पेशल गाड्यांचे / दुप्पट दरात तिकिटे काढून प्रवास करणाऱ्यांना अशा प्रसंगाचा सामना करावा लागला नसता. म्हणून मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की टर्मिनस, ते देखील रेल्वेचे टर्मिनस होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. नाहीतर प्रवासादरम्यान असे वाईट अनुभव हे येतच राहतील.
माझ्या मते हा विषय केवळ सावंतवाडी पुरती मर्यादित नसून हा मुंबई आणि कोकण या दोन्ही भागांचा आहे कारण कोकणातील अर्धी मंडळी ही मुंबईला पोटापाण्यासाठी आहे आणि ही मंडळी आपला प्रत्येक सण आपल्या घरी म्हणजेच कोकणात येऊन साजरे करतात त्यामुळे ह्या जिव्हाळ्याचा विषयाला आज आलेल्या खासदारांचा विधानाने कुठेतरी कोकणी माणूस दुखावला असेल असेच दिसते. मी पुन्हा एकदा सांगतो की सावंतवाडी टर्मिनस होणे ही आजची खरी गरज आहे. आपण सर्वांनी यावर विचार करावा ही विनंती

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर नागेरकोइल – पनवेल विशेष गाडी उद्या धावणार

Konkan Railway News: सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल ते पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुढील विशेष गाडी या मार्गावर चालविण्यात येणार आहे
Train No. 06071 / 06072 Nagercoil – Panvel – Nagercoil Special (Weekly):
Train No. 06071  Nagercoil – Panvel  Special (Weekly):
ही गाडी उद्या मंगळवार दिनांक 03 ऑक्टोबर रोजी नागरकोइल येथून सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी  रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी ती पनवेलला पोहोचेल.
Train No. 06072  Panvel – Nagercoil Special (Weekly):
ही गाडी बुधवार दिनांक 04 ऑक्टोबर रोजी पनवेल येथून सकाळी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता नागरकोईल येथे पोहोचेल.
पनवेल मडगाव दरम्यान ही विशेष गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी तसेच थिवीला थांबणार आहे.
डब्यांची स्थिती
 2 Tier AC – 01 Coaches, 3 Tier AC – 05 Coaches,  Sleeper – 11 Coaches, General – 02 Coaches, SLR – 02,  असे मिळून एकूण 21 डबे

Loading

Facebook Comments Box

कणकवली: राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत ३ म्हशी ठार

कणकवली : येथून गोव्या च्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस ची धडक बसून रेल्वे घेत जवळ स्टेशन च्या दिशेने जाणाऱ्या तीन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९:४५ वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन ते हळवल – वागदे रेल्वे ब्रिज दरम्यान घडली. यातील तीन जनावरांमध्ये एका दुभत्या म्हैशीचा समावेश आहे. तर साधारपणे एक तास राजधानी एक्सप्रेस वागदे रेल्वे बोगद्यात उभी होती.या घटनेमुळे आधीच विस्कटलेले रेल्वेचे रेल्वेच्या वेळापत्रकात एक ते दीड तासाने बदल झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच संदेश जाधव, भाई परब, संदीप जाधव, अंगुली कांबळे, रितेश कांबळे, विकास कासले यांनी धाव घेत रेल्वे ट्रॅकवरील ते म्हशींचे मृतदेह बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

Loading

Facebook Comments Box

रायगडात सापडला दुर्मिळ प्रजातीचा मांजऱ्या साप

रायगड : सुधागड तालुक्यातील खुरावले येथील मुकुंद जाधव यांच्या घरामध्ये आज रविवारी दुर्मिळ प्रजातीचा साधारणपणे साडेचार फूट लांब फोर्स्टेन मांजऱ्या साप (Forstein cat snake) आला होता. या सापाला येथील सर्पमित्र संदीप जाधव यांनी मोठ्या शिताफीने पकडला आणि सर्पमित्र अमित निंबाळकर व वनविभागाच्या मदतीने सुखरूप अधिवासात सोडून दिले.
हा साप पूर्ण वाढ झालेला सदृढ होता. शिवाय त्याने उंदीर खाल्ला होता. उंदराच्या शोधत तो घरात शिरला असू शकतो. अशी माहिती सर्पमित्र अमित निंबाळकर दिली आहे.
कसा असतो मांजऱ्या साप? 
मांजऱ्या सापाला Common Cat Snake असे देखील म्हटलं जातं. फिकट राखाडी तसेच काहीसे पिवळे रंग असणाऱ्या या मांजऱ्याच्या शरीरावर गडद तपकिरी किंवा काळी नागमोडी नक्षी असते. डोक्यावर तपकीरी किंवा काळे लहान लहान ठिपके, डोळ्याच्या मागून जबड्यापर्यंत काळी तिरकस रेष, पोट पांढरे त्यावर छोटे छोटे काळे ठिपके, मानेपेक्षा डोके मोठे, मोठे डोळे, लांबट शेपूट असते.
मांजऱ्याचा अधिवास शक्यतो बांबूचे बेट, घनदाट जंगले आणि दाट झाडी असणाऱ्या ठिकाणी असतो. अत्यंत दुर्मिळ, निशाचर, दिवसा बांबुचे बेट, झाडाच्या ढोलीत किंवा दगडाखाली बहुतांश वेळा रात्रीच आढळतो. या सापाला डिवचलं तर शरीराचे वेटोळे करुन हल्ला करतो. त्याचबरोबर शेपटीचे टोक उंच उभे करुन जोरजोरात हलवतो. या सापाचे विषारी दात जबड्यातील मागे असतात. हा साप निमविषारी आहे. 

Loading

Facebook Comments Box

चाकरमन्यांच्या मदतीसाठी एसटी पुढे सरसावली; सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली येथून मुंबईसाठी विशेष गाड्या

सिंधुदुर्ग: कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकडे जणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ पुढे सरसारवले आहे. सिंधुदुर्गातून सावंतवाडी, कुडाळ, कणकवली 6 बसेस या रेल्वे स्थानकातून थेट मुंबईला सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये सावंतवाडी मधून 2, कणकवलीतुन 3, कुडाळमधून 1 अशा सहा गाड्या या 4:30 ला रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणार आहेत.
अनेक भाविक गणेशविसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मात्र काल पनवेल नजीक मालगाडीचे डबे घसरून अपघातामुळे कोकणरेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक पूर्ण बिघडले आहे. जे रेल्वे प्रवासी तिकीट कॅन्सल करतील त्यांना रेल्वे स्थानकामध्ये बस उपलब्ध व्हावी यासाठी ही एसटीने सेवा दिली असल्याचे समजत आहे.

Loading

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: कशेडी बोगदा वाहतुकीसाठी बंद?

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या कामाला गती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आगामी चार ते पाच दिवसांमध्ये बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आली होती. या बोगद्यातून एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे कोकणवासियांना मोठा फायदा झाला होता. 
गणेशोत्सवाच्या काळात कशेडी घाटातून एकेरी मार्गिकेवरून वाहतूक सुरू असल्याने कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला होता. आता या बोगद्यातून वाहतूक चार ते पाच दिवसात बंद करण्यात येणार आहे. या बोगद्याच्या उर्वरित कामाला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जानेवारी 2024 पर्यंत कशेडी बोगदा आणि त्यापर्यंत पोहोचण्याच्या दोन्ही मार्गिका पूर्ण करून तेथून वाहतूक सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग प्रयत्न करत असल्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले.
नव्या बोगद्यामुळे कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येत होते.  हे अंतर पार करण्यासाठी घाटातील अवघड वळणांमुळे जवळपास अर्ध्या तासाचा  कालावधी लागत होता. आता कशेडी बोगद्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी येत्या काही दिवसात बोगदा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. 

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक अजूनही विस्कळीत; जनशताब्दी एक्सप्रेस पुणे मिरज मार्गे जाणार तर काही गाड्या रद्द

Konkan Railway News :काल पनवेल स्थानकाजवळ झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे या मार्गावरून जाणार्‍या एक्सप्रेस गाड्यांची वाहतुक विस्कळीत झाली आहे. अजून पर्यंत या मार्गावरील वाहतुक विस्कळित असून ती पूर्वपदावर आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अजूनही तीन डबे या मार्गावरून बाजूला करण्याचे काम चालू आहे. 

या अपघातामुळे काही गाड्या रद्द केल्या आहेत तसेच काही गाड्या अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत. 

मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणारी मांडवी, एलटीटी मंगळूर स्पेशल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या या कल्याण, मिरज मार्गे वळण्यात करण्यात आल्या आहेत. अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी- मंगळूर तसेच मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.

शनिवारी रात्री सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस आज पहाटे सुटणार होती. मात्र तिला आणखी विलंब होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

1) दिनांक 01/10/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 10103 CSMT-madgaon mandvi exp

2) दिनांक 30/09/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 01165 LTT mangluru exp, JCO 30/9/23

3) आज दिनांक 01/10/2023 रोजी प्रवास सुरू करणारी 01171 CSMT Sawantwadi exp-

 

पुणे मिरज मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या

1) दिनांक 30/09/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 12133 CSMT Mangluru exp-

2)दिनांक 01/10/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 12051 CSMT Madgoan Janashatabdi Exp. 

आरंभ स्थानकावरून सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आलेल्या गाड्या. 

काल दिनांक 30/09/2023 रोजी प्रवास सुरू करणारी 20111 CSMT Madgaon exp आज सकाळी 11:05 वाजता आपला प्रवास सुरू करेल.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या 

1)दिनांक 01/10/2023 रोजी सुटणारी 01151 CSMT Madgaon exp- पनवेल या स्थानकावरून सुटेल. 

2)दिनांक 30/09/2023 रोजी प्रवास सुरू केलेली 01172 Sawantwadi CSMT exp ही गाडी आपला पनवेल स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. 

 

Loading

Facebook Comments Box

मुंबईवरून आज सुटणाऱ्या कोकणकन्या आणि एलटीटी मडगाव एक्सप्रेस उशिरा सुटणार; मेमू विशेष गाड्या रद्द

Konkan Railway News: पनवेल जवळ कळंबोली येथे मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे मागावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही दुर्घटना दुपारी ३ वाजता घडली होती. या दुर्घटनेमुळे अनेक एक्सप्रेस गाड्या रखडल्या आहेत. सध्या या मार्गावरील हे घसरलेले डबे हटवण्याचे काम सुरु आहे. सिंगल रुळावरून धिम्यागतीने गाड्या सोडल्या जात असून वेळापत्रक पूर्वपदावर येण्यास अजून काही वेळ लागेल. जवळपास 250 कर्मचारी घटनास्थळी काम करत आहेत. याचा परिणाम कोकणकन्या आणि एलटीटी मडगाव या गाड्यावर सुद्धा झाला असून या गाड्या मुंबईवरून सुमारे ३ ते ४ उशिराने सुटणार आहेत. 
1) २०१११  सीएसएमटी मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस- १/१०/२३ रोजी पहाटे ४.०० वाजता सीएसएमटी वरून पुनर्नियोजित वेळेत सुटेल
2) ११०९९ एलटीटी मडगाव एक्स्प्रेस- एलटीटी वरून १/१०/२३ रोजी पहाटे ४.०० वाजता पुनर्नियोजित वेळेवर निघेल.
याबरोबरच चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात आलेल्या मेमू गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे 
१) ०७१०४ मडगाव-पनवेल मेमू- रत्नागिरी-पनवेल दरम्यानची अर्धवट रद्द करण्यात आली आहे, ती फक्त मडगाव-रत्नागिरी विभागात चालेल.
२) ०७१०५  पनवेल-खेड मेमू पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

Loading

Facebook Comments Box

आज आणि उद्या कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

Rain Alert :आज दिनांक 30 सप्टेंबर आणि उद्या दिनांक 01 ऑक्टोबर रोजी कोकणात जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात जोरदार वारे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.मॉन्सूनची परतीची सीमा कायम असून, दोन ते तीन दिवसांत वायव्य भारताच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. कर्नाटक किनारपट्टीच्या भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र कायम आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती टिकून आहे. बंगालचा उपसागरासह अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे.राज्यात जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

आज आणि उद्यासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर या भागात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट तर सातारा, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Loading

Facebook Comments Box

पनवेल जवळ मालगाडी रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत

Kokan Railway News:पनवेलहून वसईकडे जाणारी मालगाडी आज दुपारी पनवेल – कळंबोली विभागात  रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. 
आज दुपारी पनवेल-कळंबोली विभागात 15.05 वाजता मालवाहू मालगाडी रुळावरून घसरली आहे.  या गाडीचे 4 वॅगन आणि ब्रेकव्हॅन रुळावरून घसरल्याने या मार्गावरील खालील गाडयांना रोखून ठेवण्यात आले आहे. 
अ) डाउन गाड्या-
१) १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस- कळंबोली येथे
2) १२६१९ एलटीटी – मंगळुरु एक्स्प्रेस- ठाणे येथे
3) ०९००९  मुंबई सेंट्रल- सावंतवाडी एक्स्प्रेस- तळोजा पंचानंद येथे
ब) अप गाड्या-
1) २०९३१  कोचुवेली- इंदूर एक्स्प्रेस- सोमाठाणे येथे
2) १२६१७  एर्नाकुलम- निजामुद्दीन एक्स्प्रेस- सोमाठाणे येथे

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search