समुद्र किनार्‍यावरील बैलगाडीची शर्यत दोन जणांसाठी ठरली जीवघेणी; आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल..

अलिबाग:बैलगाडीच्या शर्यतीला शासनाकडून मान्यता तर मिळाली आहे पण प्रेक्षकांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ते नियम बनवले नसल्याने या शर्यतींदरम्यान अनेक जीवघेणे अपघात घडताना दिसत आहे. अशाच एका अपघातात बैल उधळून प्रेक्षकांमध्ये घुसल्याने अलिबाग येथे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

धुळवडीच्या सणाचे औचित्य साधून अलिबाग समुद्रकिनार्‍यावर बैलगाडी स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. मात्र यादरम्यान बैलगाडीचे बैल उधणून प्रेक्षकांमध्ये घुसल्याने  विनायक जोशी (७०) राजाराम गुरव (७५) हे जखमी झाले. त्यांना अलिबाग येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले. यापैकी विनायक जोशी यांचा मुंबईत नेताना वाटेतच मृत्यू झाला. तर राजाराम गुरव यांचे बुधवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अलिबाग पोलीस ठाण्यात स्पर्धेच्या आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शैलेश सणस करत आहेत. बैलगाडी स्पर्धेच्यावेळी घडलेली ही चौथी दुर्घटना असल्याने प्रेक्षकांची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे.

   

Loading

Facebook Comments Box

दिवा – रत्नागिरी पॅसेंजर गाडीच्या वेळापत्रकात बदल; १५ तारखेपासून नवीन वेळापत्रक

रत्नागिरी | कोंकण रेल्वे मार्गावर दिवा ते रत्नागिरी दरम्यान चालविण्यात येणाऱ्या ५०१०३ – दिवा रत्नागिरी पॅसेंजर या गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हे बदल दिनांक १५/०३/२०२३ रोजी अंमलात आणण्यात येणार आहेत. 
 

वेळापत्रकामध्ये पुढील बदल करण्यात आलेले आहेत.

Station सध्याची वेळ  सुधारित वेळ (०९/०६/२०२३ पर्यंत) सुधारित वेळ (१०/०६/२०२३ पासून- पावसाळी वेळापत्रक)
Diva Jn. 15:20 17:50 17:50
Panvel 15:50 18:30/18:33 18:30/18:33
Apta 16:12 18:55/18:56 18:55/18:56
Jite 16:24 19:08/19:09 19:08/19:09
Pen 16:37 19:19/19:20 19:19/19:20
Kasu 16:50 19:30/19:31 19:30/19:31
Nagothane 17:03 19:43/19:44 19:43/19:44
Roha 17:25 20:07/20:12 20:07/20:12
Kolad 17:47 20:24/20:25 20:24/20:25
Indapur 17:59 20:35/20:36 20:35/20:36
Mangaon 18:12 20:45/20:46 20:45/20:46
Goregaon Road 18:24 20:56/20:57 20:56/20:57
Veer 18:36 21:05/21:06 21:05/21:06
Sape Wamne 18:46 21:15/21:16 21:18/21:19
Karanjadi 18:56 21:25/21:26 21:30/21:31
Vinhere 19:11 21:34/21:35 21:44/21:45
Diwankhavati 19:29 21:42/21:43 21:58/21:59
Kalambani Budruk 19:39 21:53/21:54 22:12/22:13
Khed 19:59 22:03/22:04 22:23/22:24
Anjani 20:15 22:15/22:16 22:41/22:42
Chiplun 20:40 22:30/22:35 23:00/23:05
Kamathe 21:00 22:49/22:50 23:21/23:22
Sawarda 21:12 22:58/22:59 23:34/23:35
Aravali Road 21:25 23:09/23:10 23:49/23:50
Kadavai 21:35 23:19/23:20 23:55/23:56
Sangameshwar Road 21:45 23:33/23:34 00:20/00:21
Ukshi 22:10 23:45/23:46 00:50/00:51
Bhoke 22:40 00:08/00:09 01:20/01:21
Ratnagiri 00:35 00:35 02:00
   

Loading

Facebook Comments Box

महिलांसाठी खास सवलत; एसटीचा प्रवास आता अर्ध्या तिकिटात…

Assembly Budget Session: राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. याअर्थसंकल्पादरम्यान अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या तिकीट दरामध्ये महिलांना आता 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्क्यांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचा महिलांना प्रवास करताना फायदा होणार आहे.

 

Loading

Facebook Comments Box

ऐन गर्दीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी सोडलेल्या दोन अतिरिक्त गाड्या रद्द.

रत्नागिरी| होळीसाठी रेल्वेने गावी जाणार्‍या चाकरमान्यांचा त्रास वाढवणारी एक बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने होळीसाठी या मार्गावर सोडण्यात आलेल्या 2 गाड्या रद्द केल्या आहेत. 

पुढील दोन गाड्या दिनांक 09/03/2023 ते 12/03/2023  दरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत. 

01597 मेमू ट्रेन रोहा येथून चिपळूण साठी सुटणारी रोहा – चिपळूण अनारक्षित मेमू 

01598 मेमू चिपळूण येथून रोहा या स्थानकासाठी सुटणारी चिपळूण – रोहा अनारक्षित मेमू

दिवा स्थानकावरून रोहा स्थानकापर्यंत चालविण्यात येणार्‍या गाडीचा विस्तार करून या गाड्या चालविल्या जात होत्या. या गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील ईतर गाड्यांमध्ये होणारी गर्दी विभागली जात असताना रेल्वे प्रशासनाने अचानक या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. 

संबंधित बातमी >खुशखबर| होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर मेमू ट्रेनसह अजून ६ विशेष गाड्या…

 

Loading

Facebook Comments Box

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गा विषयी चर्चा करण्यासाठी दादर येथे कोकणवासीयांच्या मेळाव्याचे आयोजन

मुंबई |शनिवार दिनांक 11 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता जनता दल सेक्युलर पक्ष आणि कोकण जन विकास समिती यांच्या वतीने दादरमध्ये कोकणवासीयांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, रिफायनरीसारखे प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न तसेच ‘कोकणच्या विकासाची दिशा’ या विषयी चर्चा करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दादर पूर्व-नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्राध्यापक सुरेंद्र गावसकर सभागृहात हा मेळावा होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या तसेच तांत्रिकदृष्टय़ा त्रुटी असलेल्या कामामुळे या रस्त्याने आतापर्यंत हजारो लोकांचा बळी घेतला आहे. दुसरीकडे सगळी वाहतूक पुणे-कोल्हापूरमार्गे होत असल्यामुळे कोकणवासीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मुळात बांधकामात त्रुटी असल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही अपघातांची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे रस्त्याचे ऑडिट करावे तसेच काम पूर्ण झाल्यानंतरही टोल लावण्यात येऊ नये, अशी मागणी मेळाव्यात करण्यात येणार आहे. कोकणवासीयांनी मोठय़ा संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जनता दलाचे प्रभाकर नारकर आणि कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम यांनी केले आहे.

   

 

Loading

Facebook Comments Box

आंबोली पोलिस तपासणी नाक्यावर गोवा बनावटीची दारू जप्त

सिंधुदुर्ग |शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या अवैध दारूची महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे.मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाख ८ हजारांच्या दारुसह ४ लाखाची गाडी मिळून तब्बल ५ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (३६, रा.अदालट्टी, ता. अथणी, बेळगांव ) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक शिंदे, हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई व होमगार्ड जंगले यांनी आंबोली तपासणी नाक्यावर केली. यात गोवा बनावटीच्या इम्पेरियल ब्ल्यू ब्रँडच्या बाटल्यांचे नऊ बॉक्स जप्त करण्यात आले. तर या प्रकरणी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची शेवरलेट एन्जॉय ( के ए – २३ एन ३६३५) ही कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

 

Loading

Facebook Comments Box

१०५ वर्षाचे आजोबा आणि १०३ वर्षाच्या आजी..कोकणातील निसर्ग समृद्ध जीवनशैलीचा परिणाम. 

रत्नागिरी : प्रगतीमुळे विज्ञानामुळे माणसाचं आयुष्य वाढला. असं म्हणतात. पण यामुळे नद्या प्रदूषित झाल्या जंगला उध्वस्त झाले, कारखान्यांनी हवा प्रदूषित केली.

कोकणात असे गाव आहे जेथे स्वातंत्र्यानंतरही गेली 73 वर्ष रस्ता नव्हता. या गावात रुग्णाला डोलीतून खाली सात आठ किलोमीटर डोंगर उतरून दवाखान्यात आणावे लागत होते. अगदी दोन वर्षांपूर्वी या गावात पहिल्यांदा रस्ता आला.

अतिशय साधी मातीची घरे, तथाकथित कोणताही विकास नाही, निसर्ग पूरक जीवनशैली, हायब्रीड आणि केमिकल यांचा रोजच्या जगण्याशी काही संबंध नाही, कोणतेही प्रदूषण नाही, म्हटले तर अविकसीत पण जीवनशैलीच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आणि प्रगत असे हे  रत्नागिरीतील लांजा या तालुक्यातील गाव म्हणजे माचाळ.

या गावात 105 वर्षाचे आजोबा आणि शंभर वर्षाच्या आजी हे दांपत्य राहते. या गावात अनेक वृद्ध माणसे 80/ 90 /95 वर्षाची आपल्याला भेटतील.

समृद्ध जीवनशैली प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी दोन दिवस आपण माचाळला येऊन राहिले पाहिजे. हे कोकणातील पहिले हिल स्टेशन येथील कार्यकर्त्यांनी इको हिल स्टेशन निसर्ग समृद्ध पर्यटन केंद्र म्हणून विकसित करायचं ठरवलं.

निसर्गावर प्रेम करणाऱ्या पर्यटकांनी येथे येऊन राहावं आणि या गावातील निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा यातून ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित व्हावी अशा स्वरूपाचा हा उपक्रम आहे. याच साठी माचाळ महोत्सव 2023 आयोजित करत आहोत. अकरा व बारा मार्च हा विशेष महोत्सव आयोजित होत आहे

 येथील निसर्ग समृद्ध जीवनशैली लोककला उत्सव यांचा अनुभव निसर्गप्रेमी पर्यटकांनी सहपरिवार घ्यावा अशा स्वरूपाची संकल्पना आहे अर्थात मर्यादित पर्यटकांना या पर्यटन केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. राजापूर लांजा तालुका नागरीक संघ, आणि स्थानिक कार्यकर्त्यांची टीम संपूर्ण नियोजन करत आहे.

संजय यादवराव 

कोकण क्लब /कोकण बिझनेस फोरम

Loading

Facebook Comments Box

नादच खुळा; रत्नागिरीत प्रस्तावित हायवेच्या मध्ये येणारे पूर्ण घरच सरकवले जातेय..

रत्नागिरी | मुंबई गोवा हायवे व रत्नागिरी नागपूर हायवे साठी अनेकांच्या जागा चौपदरी करण्यासाठी गेल्या त्यामुळे अनेकांना आपले मूळ घरे पाडावी लागली होती काहींनी हीं जुनी घर पाडून सुरक्षित अंतरावर आपली नवीन घरे उभी केली मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील करंजारी येथील ठाकूर यांनी आपला बंगला नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने आहे त्या अवस्थेत मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
करंजारी येथील ठाकूर यांचा बंगला चौपदरीकरणात जात होता तो बंगला आता शंभर फूट मागे सरकविला जाणार आहे त्यासाठी चेन्नई येथील कंपनीला हे कंत्राट देण्यात आला असून या कंपनीने आपले काम सुरू केले आहे कंपनीने बंगल्याच्या खाली खाली खोदाई करून त्याखाली जॅक व लोखंडी अँगल लावून हा मूळ बंगला हळूहळू सरकवण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे कुठलीही मोडतोड न करता आहे त्या अवस्थेत बंगला मागे नेला जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच बंगला मागे नेण्याची घटना आहे त्यामुळे हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करीत आहेत.
अशा शिफ्टिंग करिता अंदाजे किती खर्च येतो?
इमारत शिफ्टिंग करणाऱ्या कंपन्या इमारत लिफ्टिंग आणि इमारत शिफ्टिंग तसेच इमारतीची दिशा बदलणे या मुख्य सेवा देतात. इमारत लिफ्टिंग म्हणजे घर काही फूट वर उचलणे. या मध्ये घर जास्तीत जास्त १० फुटांपर्यंत वर उचलेले जाते. साहजिकच घराचे बांधकाम कोणत्या पद्धतीचे आणि किती जुने आहे या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. आमच्या प्रतिनिधेने दिल्लीतील एका कंपनीशी संपर्क साधला असता ३ फुटापर्यतच्या लिफ्टिंग करण्यासाठी साधारणपणे ४०० ते ५०० रुपये प्रति चौरस फूट खर्च येईल असे सांगण्यात आले. इमारत शिफ्टिंग बद्दल विचारले असता जर १००० चौरस फुटाचे घर १५ ते २० फूट सरकावायचे असेल तर साधारणपणे १० ते १५ लाख खर्च येतो. साहजिकच घराच्या बांधकामाच्या स्वरूपानुसार खर्च कमी जास्त येतो.

Loading

Facebook Comments Box

रत्नागिरी आणि सावंतवाडीसाठी धावणार होळी विशेष गाड्या….

Holi Special Trains News | 03 Mar 2023 | प्रवाशांचा वाढता  प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने अजून काही विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
1) Train no. 01151/ 01152 Mumbai CSMT – Ratnagiri – Mumbai CSMT Special  :
Train no. 01151 Mumbai CSMT – Ratnagiri  Special  
दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार व ०७/०३/२०२३ मंगळवार या दिवशी ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई  या स्थानकावरुन रात्री ००:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी सकाळी ०९:०० वाजता रत्नागिरी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01152  Ratnagiri – Mumbai CSMT Special  
दिनांक ०६/०३/२०२३ सोमवार या दिवशी ही गाडी  रत्नागिरी  या स्थानकावरुन सकाळी ०६:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
दादर, ठाणे, पनवेल, रोहा (RN), माणगाव,वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर रोड, 
डब्यांची संरचना
स्लीपर – 18 + एसलआर – 02 असे एकूण 20  डबे
2) Train no. 01154 / 01153 Ratnagiri – Panvel – Ratnagiri Special: 
Train no. 01154 Ratnagiri – Panvel 
दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार व ०७/०३/२०२३ मंगळवार या दिवशी ही गाडी रत्नागिरी या स्थानकावरुन सकाळी १०:०० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १६:२०वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01153  Panvel – Ratnagiri
दिनांक ०५/०३/२०२३ रविवार व ०८/०३/२०२३ बुधवार या दिवशी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन संध्याकाळी १८:२० वाजता सुटेल व ती रात्री  ०० :२० वाजता रत्नागिरी या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
रोहा (RN), माणगाव,वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर रोड, 
डब्यांची संरचना
स्लीपर – 18 + एसलआर – 02 असे एकूण 20  डबे
3) Train no. 01155 / 01156 Panvel – Sawantwadi Road – Panvel Special: 
Train no. 01155 Panvel – Sawantwadi Road Special: 
दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार व ०७/०३/२०२३ मंगळवार या दिवशी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन संध्याकाळी १८:२० वाजता सुटेल व ती दुसया दिवशी सकाळी ०४:१० वाजता सावंतवाडी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01155 Panvel – Sawantwadi Road Special: 
दिनांक ०५/०३/२०२३ रविवार व ०८/०३/२०२३ बुधवार या दिवशी ही गाडी सावंतवाडी या स्थानकावरुन सकाळी  ०७:४५  वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा,आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
डब्यांची संरचना
स्लीपर – 18 + एसलआर – 02 असे एकूण 20  डबे
4) Train no. 01158 Ratnagiri – Lokmanya Tilak (T) Special : 
दिनांक ०९/०३/२०२३ गुरुवार या दिवशी ही गाडी  रत्नागिरी  या स्थानकावरुन सकाळी ०६:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस,मुंबई  या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे
डब्यांची संरचना
स्लीपर – 18 + एसलआर – 02 असे एकूण 20  डबे
प्रवाशांनी या अतिरिक्त फेर्‍यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.

Loading

Facebook Comments Box

मुंबई – गोवा दरम्यान ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करणार – रावसाहेब दानवे

 

मुंबई :  देशामध्ये महत्त्वाच्या काही शहरां दरम्यान सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस आता कोकण रेल्वे मार्गावर मुंबई गोवा या दोन शहरांदरम्यान  लवकरच सुरू होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई- गोवा या मार्गावरील विद्युतीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे दिल्याची माहिती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली. या आमदारांमध्ये सर्वश्री प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, प्रसाद लाड आदींचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी कोकणातील प्रवाशांसाठीचे विविध मुद्दे मांडले.

कोकणातील प्रवाशांचा प्रवास वेगाने होण्यासाठी शिर्डी व सोलापूरप्रमाणेच गोव्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी आमदारांनी केली. त्यावेळी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले.

रेल्वे राज्यमंत्रि रावसाहेब दानवे यांच्याकडे केलेल्या इतर काही मागण्या.

  • `वन प्रॉडक्ट, वन स्टॉल’ प्रकल्पानुसार कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्त व्यक्ती वा त्यांच्या वारसांना स्टॉल द्यावेत
  • शेतकऱ्यांसाठी प्रत्येक स्थानकात फिरता स्टॉल असाव
  • कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांतील प्लॅटफॉर्म व गाडीमधील उंची समान ठेवावी.
  • रेल्वे पुलामुळे महाड येथे पूरस्थिती निर्माण होत असल्याबद्दल उपाययोजना करावी.
  • सावंतवाडी-दिवा ट्रेन दादरपर्यंत न्यावी.
  • रेल्वेमार्गालगत रेल्वेच्या जागेवर वसलेल्या घरांमधील रहिवाशांचे एसआरए प्रकल्पात पुनर्वसन करण्यात यावे.
  • कोकणातील लोटे परशुरामसह विविध एमआयडीसी ते रेल्वेस्थानकापर्यंत लाईनसाठी प्रस्ताव तयार करावा
  • वीर ते रानवाडी स्थानकापर्यंत दुहेरीकरण करावे
  • जनशताब्दी, तेजस आणि गरीब रथ गाड्यांना खेड रेल्वे स्थानकाचा थांबा द्यावा,
  • आदी मागण्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आल्या. त्यावर त्यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search