दोन लोकनेते, एकाला भारतरत्न तर दुसर्‍याच्या पदरी सरकारकडून उपेक्षाच..

कोकण    Follow us on        
वाचकांचे व्यासपीठ: खरेतर देशाला आपले सर्वस्व समर्पित केलेल्या महान नेत्यांची तुलना करणे चुकीचे आहे. मात्र जेव्हा एखाद्या नेत्याच्या कर्तृत्वाचा सन्मान होत नाही, त्याची अवहेलना केली जाते तेव्हा नाईलाजाने त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचे महत्व पटवून देण्यासाठी ही तुलना होतेच.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर या दोन्ही कालखंडात प्रा. मधु दंडवते यांचे देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. १९४२ च्या चळवळीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते यांनी आंदोलनात भाग घेऊन स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आणि करावासही भोगला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा सत्याग्रहामध्येसुद्धा त्यांनी भाग घेतला होता त्यादरम्यान त्यांना पोर्तुगीज पोलिसांकडून एवढी मारहाण झाली की त्यांच्या शरीरातली हाडे मोडली होती व त्या जागी स्टीलच्या पट्या घातल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये दोघा पती पत्नीने आपले योगदान देऊन कारावास भोगला होता. देशात जेव्हा आणीबाणी जाहीर झाली होती तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना अटक झाली होती. त्यात अटकेत प्रा. मधु दंडवते
आणि त्यांच्या पत्नींचाही समावेश होता.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या त्यागासाठी आणि देशसेवेसाठी भारतरत्न देऊन गौरवण्यात आले. त्यांनी केलेली देशसेवेबद्दल तिळमात्र शंका नाही. मात्र त्यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तच देशसेवा केलेल्या मधू  महानेत्याच्या त्यागाचा, कार्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी फक्त आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगला परंतु प्रा. मधु दंडवते यांनी स्वातंत्र्य चळवळीसह गोवा सत्याग्रह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन यामध्ये तुरुंगवास भोगला मग प्रा. मधु दंडवते यांना भारतरत्न का दिला जाऊ नये?
केंदीय रेल्वे मंत्री असताना त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये अमुलाग्र बदल केलेत. ६ डब्याच्या ऐवजी २२ डब्याच्या मेल एक्सप्रेस सुरू करून तिकिटांचा होणारा काळाबाजार त्यांनी रोखला. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक गाडीला वेगळे नाव देण्याची सुरवात त्यांनीच केली. त्याची सुरुवात पहिली कलकत्त्या वरून मुंबईला येणाऱ्या ” गीतांजली” एक्सप्रेस या नावाने सुरुवात झाली. विशेष म्हणजे, त्यांनी दुय्यम दर्जाच्या स्लीपर कोचच्या प्रवाशांसाठी, अधिक आरामदायी प्रवासासाठी विद्यमान लाकडी बर्थ बदलून, उशी असलेले बर्थ सुरू केले. सुरुवातीला प्रमुख ट्रंक लाईन्समध्ये लागू केले जात असताना, 1980 च्या दशकाच्या अखेरीस सर्व गाड्यांमध्ये त्यांच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यांमध्ये हे पॅड बर्थ होते. कोकण रेल्वे प्रत्यक्षात येण्यासाठी प्रा. मधु दंडवतेंनी रेल्वेमंत्री म्हणून सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पातच तरतूद केली. कोकण रेल्वे प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांचे योगदानही सर्वश्रुत आहे.
एवढं मोठे भारताला योगदान देणाऱ्या या तपस्वी देशभक्ताला त्याच्या मृत्युपश्चात जर भारतरत्न देता येत नसेल तर किमान सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे टर्मिनस म्हणून तात्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेल्या या टर्मिनस चे काम पूर्ण करून त्याला मधु दंडवते टर्मिनस असे नाव देण्यात यावे अशी मागणी मागील ३ वर्षांपासून मोठ्याप्रमाणात होत आहे. मात्र या मागणीला वेळोवेळी केराची टोपली दाखवली जात आहे. भारतरत्न पदासाठी योग्य असलेल्या एका महानेत्याची मरणोत्तर अशी अवहेलना होत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?
स्वातंत्र्य चळवळीसह गोवा सत्याग्रह आणीबाणी मध्ये सहभाग घेणाऱ्या प्रमिला दंडवते यांनी महिला आयोगाची स्थापना करून संपूर्ण भारतातील महिलावर खूप मोठे उपकार केले आहे त्यांच्याही यथोचित सन्मान व्हावा असे मी जाहीर पत्रकाद्वारे मागणी करीत आहे विलंबित सावंतवाडी टर्मिनस चे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्या टर्मिनसला मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे. हे वर्ष प्रा. मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे तरी येत्या २१ जानेवारी २०२५  रोजी मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आहे तरी लवकरात लवकर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करून २१ जानेवारी २०२५ पुर्वी मधु दंडवते टर्मिनस असे नामांतर करून या थोर विभूतीला आदरांजली अर्पण करावी
श्री. सुरेंद्र हरिश्चन्द्र नेमळेकर
संस्थापक सदस्य – कोकण रेल्वे,
सल्लागार- सखांड कोकण रेल्वे सेवा समिती
Facebook Comments Box

महत्वाचे: मध्य रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यातील गणपती स्पेशल गाड्यांच्या तिकीट आरक्षणाची तारीख जाहीर

   Follow us on        
Konkan Railway Updates: कोकणकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने दुसऱ्या टप्प्यात सोडलेल्या गणपती स्पेशल गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार गाडी क्रमांक ०१०३२, ०१४४८ , ०१४४४ , ०१४४६  आणि ०१४४२ साठी बुधवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC संकेतस्थळावर चालू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या गाड्यांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील बातमी वाचावी
Facebook Comments Box

Ganesh Chaturthi 2024: गणपती विशेष गाड्यांना पेण आणि झाराप येथे थांबा मंजूर

   Follow us on        

Changes in Ganpati special trains: गणपती उत्सवासाठी सोडण्यात आलेल्या काही विशेष गाड्यांना पेण आणि झाराप येथे अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी विशेष गाड्यांना या स्थानकांवर थांबे न दिल्याने प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती व या स्थानकांवर थांबे देण्यात यावे अशी मागणी केली गेली होती. सुबक गणेशमूर्ती साठी प्रसिद्ध असलेल्या पेण स्थानकावर गणपती विशेष गाड्यांना थांबा न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावे लागेल. दुसरीकडे फक्त एका नियमित गाडीला थांबा असलेल्या झाराप स्थानकावर किमान विशेष गाड्यांना तरी थांबे मिळावेत अशी मागणी झाली आहे. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने खालील गाड्यांना येथे थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे

गाडी क्रमांक ०११५३/०११५४ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण येथे

गाडी क्रमांक ०११६७/०११६८ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे

गाडी क्रमांक ०११८५/०११८६ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे

गाडी क्रमांक ०११६५/०११६६ लोकमान्य टिळक (टी)- कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे

गाडी क्रमांक ०११७१/०११७२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे

गाडी क्रमांक ०९००९/ ०९०१० मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल या विशेष गाडीला झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे खालील दोन विशेष गाड्यांच्या सेवेच्या कालावधीत काही बदल करण्यात आले आहेत.

गाडी क्र. ०११५४ रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी आणि गाडी क्र. ०११६८ कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या दोन्ही गाड्यांचा कालावधी ०२/०९/२०२४ ते १९/०९/२०२४ असा सुधारित करण्यात आला आहे. याआधी तो ०१/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ असा होता.

प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

गणेशोत्सवासाठी रेल्वेबरोबर एसटीही सज्ज; कोकणकरांसाठी ४३०० जादा बसेस धावणार

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ७ सप्टेंबरला श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यक्तिगत आरक्षणासोबतच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ३५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये ८०० बसेसची वाढ करण्यात आली आहे.
गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे ४३०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे,उपलब्ध होणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.
Facebook Comments Box

खुशखबर! मध्यरेल्वेतर्फे अजून पाच गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा

Additional Trains for Ganesha Festival: गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने एक खुशखबर दिली आहे. मध्य रेल्वे तर्फे या आधी घोषणा केलेल्या गाड्या व्यतिरिक्त अजुन पाच गाड्यांची घोषणा केली आहे. पुणे /पनवेल /मुंबई एलटीटी ते रत्नागिरी दरम्यान या गाड्या धावणार असून त्याचा फायदा गणेशोत्सवा दरम्यान होणारी गर्दी कमी होण्यासाठी होणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने या गाड्यांना हिरवा कंदील दिल्यानंतर या गाडय़ाचे आरक्षण आणि ईतर माहिती जाहीर करण्यात येईल. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्या विशेष गाड्या म्हणुन चालविण्यात येणार आहेत.

१) ०१४४५/०१४४६ पुणे – रत्नागिरी – पुणे विशेष (एकूण २ फेर्‍या)
गाडी क्रमांक ०१४४५ विशेष पुणे येथून मंगळवार दिनांक १० सप्टेंबर रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४६ विशेष रत्नागिरी येथून बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी १७:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:०० वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५ , जनरेटर व्हॅन – ०१, आणि एसएलआर- ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे

२) ०१४४१/०१४४२ पनवेल -रत्नागिरी – पनवेल विशेष
गाडी क्रमांक ०१४४१ विशेष पनवेल येथून बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४२ विशेष रत्नागिरी येथून मंगळवार दिनांक १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी १७:५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०१:३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: पेण, रोहा,माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५ , जनरेटर व्हॅन – ०१, आणि एसएलआर- ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे

३) ०१४४७/०१४४८ पुणे – रत्नागिरी – पुणे विशेष (एकूण ४ फेर्‍या)
गाडी क्रमांक ०१४४७ विशेष पुणे येथून शनिवार दिनांक ०७ आणि १४ सप्टेंबर आणि रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४८ विशेष रत्नागिरी येथून रविवार दिनांक ०८ आणि १६ सप्टेंबर रोजी १७:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:०० वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०४ , सेकंड स्लीपर – ११ जनरल – ०४, आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २२ डबे

४) ०१४४३/०१४४४ पनवेल -रत्नागिरी – पनवेल विशेष (एकूण ४ फेर्‍या) 
गाडी क्रमांक ०१४४३ विशेष पनवेल येथून रविवार दिनांक ८ आणि १५ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४४ विशेष रत्नागिरी येथून शनिवार दिनांक ७ आणि १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी १७:५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०१:३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: पेण, रोहा,माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०४ , सेकंड स्लीपर – ११ जनरल – ०४, आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २२ डबे

५) ०१०३१/०१०३२ एलटीटी – रत्नागिरी – एलटीटी विशेष (एकूण ८ फेर्‍या)
गाडी क्रमांक ०१०३१ विशेष एलटीटी येथून दिनांक ६,७,१३,१४ सप्टेंबर रोजी रात्री २०:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०३२ विशेष रत्नागिरी येथून दिनांक ७,८,१४,१५ सप्टेंबर रोजी सकाळी ०८:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १७:१५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा,माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०२, थ्री टायर एसी – ०६ , सेकंड स्लीपर – ०८ जनरल – ०३, आणि एसएलआर- ०१, जनरेटर व्हॅन – ०१ असे मिळून एकूण २१ LBH डबे

Facebook Comments Box

ऑनलाइन विडिओगेमचे एक टास्क पूर्ण करण्याच्या नादात १६ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

   Follow us on        

पुणे: ऑनलाइन विडिओ गेम मुळे एका १६ वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. पिंपरी चिंचवड येथील किवळे या भागात ही घटना घडली आहे. या गेममध्ये बाल्कनीतून उडी मारायचा एक टास्क होता. तो फॉलो करायच्या नादात या मुलाचा जीव गेला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

दिनांक 25 जुलै रोजी सुट्टी असल्या कारणाने सदर मुलगा बेडरूम मध्ये लॅपटॉपवर ऑनलाईन गेम खेळत होता. दुपारी एकच्या सुमारास सोसायटीच्या ग्रुपवर एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्याचा मेसेज आला. मुलाच्या आईला शंका आली म्हणून ती मुलाच्या खोलीत गेली असता तो मुलगा तिथे आढळला नाही. त्यानंतर खाली पाहिले तर तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेला दिसला. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता

घरात गेममध्ये असलेल्या कोडची काही कागदपत्रं सापडली आहेत. त्यात उडी मारणं असा टास्क होता. प्राथमिक तपासानुसार हा मुलगा मोठ्या प्रमाणात गेम्स खेळत होता असं निष्पन्न झालं आहे.आत्महत्येआधी मिळालेल्या चिठ्ठीनुसार XD नावाचा एक गेम आहे असं दिसतंय. यासंबंधी आमचे अधिकारी पुढील तपास करत आहे. असं पोलीस म्हणाले.तसेच त्याच्या खोलीतून काही स्केचेस सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याने इमारतीवरुन उडी मारण्यापूर्वी स्वत:च्या मृत्यूचा प्लान आखला होता. त्याने पेन्सिलिने याचे स्केच तयार केले होते.  तेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

दरम्यान, मोबाइल वापरताना पॅरेंटल कंट्रोल आणि डिजिटल वेलबिंग नावाच्या अ‍ॅपचा वापर करून आपल्या मुलांचा स्क्रीनटाइमचा वापर मर्यादित करा, आणि आपली मुलं काय पाहतात यावर लक्ष ठेवायला हवं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

या मुलाच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, “गेल्या सहा महिन्यापासून त्याचं वागणं बदललं होतं. त्याच्या हातून लॅपटॉप घेतला की तो एकदम आक्रमक व्हायचा. तो अगदी लहानसहान गोष्टींना घाबरायचा. तो अचानक मला चाकू मागायला लागला. आगीला तो घाबरेनासा झाला. तो हे पाऊल उचलेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. सरकारने याबद्दल काळजी घ्यायला हवी. कारण मुलांना काहीच कळत नाही त्यामुळे मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचू नयेत याची काळजी सरकारने घेणं आवश्यक आहे. VPN वर सगळं दिसू शकतं. माझ्या मुलाबरोबर जे झालं ते इतरांबरोबर होऊ देऊ नका, सगळ्यांना सुरक्षित नेटवर्क पोहोचवा. माझी सरकारलाही कळकळीची विनंती आहे.”

मुलाच्या वडिलांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, “मुलांना आजकाल सगळं समजतं. पॅरेंटल कंट्रोल असला तरी मुलं तो कोड सहज क्रॅक करतात. बरेचदा मुलं ऑनलाइन अभ्यास करण्याच्या नादात लॅपटॉपवर बसतात. त्यामुळे ते नक्की तिथे काय पाहतात हे समजत नाही कारण हिस्ट्रीसुद्धा डिलिट करतात. पालकांना मुलांवर 24 तास लक्ष ठेवणं शक्य नाही.

मुलगा कोणता गेम खेळत होता हे अद्याप आई वडिलांना आणि पोलिसांनाही नीटसं कळलेलं नाही.

त्याबद्दल अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Facebook Comments Box

IMD Rain Alert: विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा परतणार;राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा 

   Follow us on        
Rain Alert from IMD: सध्या केरळमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. वायनाड येथे भुरस्सलन झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. राज्यातील इतर भागातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. यातच आता भारतीय हवामान खात्याने गुरुवारपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा दक्षतेचा ईशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने IMD पावसाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज वर्तविला आहे. त्यामध्ये आज मंगळवार आणि बुधवार या दिवशी काही जिल्ह्यांना सावधानतेचा येलो ईशारा देण्यात आला आहे. गुरुवारपासून मात्र काही जिल्ह्यांसाठी खस्कसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवार दिनांक ०१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना दक्षतेचाऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी  सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पाचव्या दिवशी म्हणजे दिनांक ०३ ऑगस्ट रोजी मुंबई वगळता संपूर्ण कोकण भाग, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

Facebook Comments Box

केरळमध्ये भूस्खलन, २३ जणांचा मृत्यू; शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

   Follow us on        

Wayanad Landslide: केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलानाची ही घटना घडली आहे. तसेच शेकडो लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून भूस्खलनात घडलेल्या ठिकाणी सुरु असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

 

 

Facebook Comments Box

Breaking: हावडा-मुंबई एक्स्प्रेसला अपघात

   Follow us on        

Railway Accident Chakradharpur: आज पहाटे हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले. या अपघातात तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहचले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो दरम्यान झाला. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) हीचे १८ डब्बे रुळावरुन घसरले. भल्या पहाटे ३:४५ मिनिटांनी हा अपघात झाला. दक्षिण-पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अनेक डब्बे रुळावरुन उतले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. तर काहींना चक्रधरपूर येथे हलविण्यात आले आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत ३ जणांच्या मृत्यूची माहिती मिळत आहे. तर १५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. या अपघाताची जाणीव होताच चालकाने रेल्वेचा वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर आज मृतांचा आकडा मोठा असता. चक्रधरपूर रेल्वे मंडळात याविषयीचा अलर्ट मिळाल्याने एकच गोंधळ उडाला.

 

Facebook Comments Box

Konkan Railway | सावंतवाडी टर्मिनससंबधी दीपक केसरकर यांनी केल्यात महत्त्वाच्या घोषणा

सिंधुदुर्ग, दि. २९ जुलै: कोकणात समस्त कोकणकरांचे हक्काचे रेल्वे टर्मिनस असावे असे स्वप्न असणार्‍या कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सावंतवाडी टर्मिनस संबधी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सावंतवाडी टर्मिनससाठी लागणाऱ्या पाण्यासाठी रत्नसिंधू योजनेतून ४ कोटी तर जल जीवन मिशन अंतर्गत १.५ कोटी मंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबरोबरच त्यांच्याकडून टर्मिनस बिल्डिंग आणि पर्यटन हॉटेल साठी निधीची तरतूद केली गेली आहे.
सावंतवाडी टर्मिनसच्या लढ्याला यश मिळण्यास सुरवात 
सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण व्हावे यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले होते. दीपक केसरकर यांच्या या घोषणेवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अलीकडेच संघटनेतर्फे राबवलेल्या सावंतवाडीच्या ईमेल मोहिमेला आणि ईतर स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश मिळण्यास सुरवात झाली असल्याचे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलेत.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search