Mumbai | अमरावती एक्सप्रेसला आग; प्रवाशी सुरक्षित

   Follow us on        

Amaravati Express Fire: मुबंईत दोन वेळा लोकल रुळावरून घसरल्याची घटना ताजी असताना दादर स्टेशनवर आज अजून एक दुघटना घडली आहे. अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी दादर स्टेशनला ही घटना घडली. सकाळी एक्स्प्रेस विदर्भातून दादरच्या स्टेशनला आहे. एक्स्प्रेसच्या ब्रेकमधून धूर निघू लागल्याने ही बाब समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावीत एक्स्प्रेसच्या बी ९ च्या कोचमधून धूर दिसल्यानंतर ही घटना समोर आली. आग किरकोळ असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु आगीच्या घटनेमुळे स्टेशनवर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीची माहिती मिळताच, रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेतून उतरून आग विझवली

 

Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Facebook Comments Box

अबब..! सिंधुदुर्गातील या बागेत सापडत आहेत अर्धाकिलो पेक्षा जास्त वजन असलेले हापूस

   Follow us on        

सिंधुदुर्ग: साधारणपणे आंबा फळाचे वजन ३०० ग्रॅम ते ३५० ग्रॅम असते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे (ता. देवगड) येथे तब्बल अर्धा किलो पेक्षा जास्त वजन असलेले आंबे एका बागेत सापडत आहेत. येथील बागायतदार बाबूराव वामन राणे यांच्या बागेत ६०५ ग्रॅम वजनाचा हापूस आंबा आढळून आला आहे. या भागात आढळून आलेले हे या हापूसचे सर्वाधिक वजनाचे फळ आहे.

आंबा काढणी करीत असताना श्री. राणे यांना काही झाडांवरील फळे नियमित आंब्यांपेक्षा आकाराने मोठी दिसून आली. त्यामुळे त्यांनी या फळांचे वजन केले असता एका फळांचे वजन ६०५ ग्रॅम आढळून आले. ४५० ग्रॅम ते ६०० ग्रॅमपर्यंत सरासरी फळे दिसून येत आहेत.

साधारणपणे आंबा फळाचे वजन ३०० ग्रॅम ते ३५० ग्रॅम असते. या बागेचे व्यवस्थापन श्री. राणे हे नैसर्गिकरीत्या व सेंद्रिय पद्धतीने करतात. या फळांची माहिती मिळाल्यानंतर तालुका कृषी विभागाचे अमोल सदावर्ते, कृषी सहायक एस. व्ही. उलपे, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप खाडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. वजनाची देखील खात्री केली.

Facebook Comments Box

यंदा गणेशचतुर्थीला रेल्वेने गावी जाण्याचा बेत आहे का? मग ही बातमी वाचाच…

   Follow us on        
मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी मुंबईतील हजारो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जातात. त्यामुळे या काळात कोकण रेल्वेचे बुकिंग फुल्ल असते. यंदाचे वर्ष सुरु झाल्यापासून मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग कधी सुरु होणार, याकडे अनेक चाकरमानी डोळे लावून बसले होते. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून गणेशोत्सवाच्या काळातील गाड्यांचे बुकिंग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा गणरायाचे आगमन ७ सप्टेंबरला होणार आहे. मात्र त्याआधीच चाकरमानी गावी जायला सुरवात करतात.
गणपतीसाठीच्या रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये तिकीटं संपतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या काळात सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांचा बुकिंगला असाच प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी चार महिने आधी रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होते. त्याप्रमाणेच यंदा ४ मे पासून तिकीट बुकिंगला सुरुवात होईल.

रेल्वे बुकिंग कॅलेंडर

आरक्षण दिनांक प्रवास सुरू दिनांक उत्सव
शनिवार, दि.04 मे 2024 रविवार, दि. 01 सप्टेंबर 2024
रविवार, दि.05 मे 2024 सोमवार, दि. 02 सप्टेंबर 2024
सोमवार, दि. 06 मे 2024 मंगळवार, दि. 03 सप्टेंबर 2024
मंगळवार, दि. 07 मे 2024 बुधवार, दि. 04 सप्टेंबर 2024
बुधवार, दि. 08 मे 2024 गुरूवार, दि. 05 सप्टेंबर 2024
गुरूवार, दि. 09 मे 2024 शुक्रवार, दि. 06 सप्टेंबर 2024 हरतालिका
शुक्रवार, दि. 10 मे 2024 शनिवार, दि. 07 सप्टेंबर 2024 श्री गणेश चतुर्थी
शनिवार, दि. 11 मे 2024 रविवार, दि. 08 सप्टेंबर 2024 ऋषी पंचमी
रविवार, दि.12 मे 2024 सोमवार, दि. 09 सप्टेंबर 2024
सोमवार, दि.13 मे 2024 मंगळवार, दि. 10 सप्टेंबर 2024 गौरी आगमन
मंगळवार, दि.14 मे 2024 बुधवार, दि.11 सप्टेंबर 2024 गौरी पूजन
बुधवार, दि.15 मे 2024 गुरूवार, दि.12 सप्टेंबर 2024 गौरी विसर्जन
Facebook Comments Box

“प्रचारास प्रवेश बंदी” शिरवल गावातील ‘तो’ बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

   Follow us on        
कणकवली, दि. ०२ मे: कणकवली तालुक्यातील शिरवल गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला एक बॅनर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक चर्चेचा विषय बनला आहे. “प्रचारास प्रवेश बंदी” असे या बॅनर वर लिहिले असून हा बॅनर येथील ग्रामस्थांनी  लावला आहे.
“निषेध निषेध निषेध, प्रचारास प्रवेश बंदी, जो पर्यंत मुख्यरस्ता डांबरीकरण करून मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये” असे या बँनरवर लिहिण्यात आले आहे. गेली ३० वर्षे हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. गावाला तालुक्याशी जोडणारा हा एकमेव रस्ता असून त्याची सध्याची स्थिती खूपच खराब झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड झाले असून अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. हा रस्ता मंजूर होऊनही गेले काही महिने प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नाही आहे. विशेष म्हणजे कणकवली शहरापासून हा रस्ता फक्त ५ किलोमीटर अंतरावर असून याकडे दुर्लक्ष होत असून हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. त्यामुळे अशा आशयाचा बॅनर येथे लावला असे ग्रामस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जो पर्यंत मुख्यरस्ता डांबरीकरण करून मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने गावात प्रचारासाठी येऊ नये अशी ताकीदच गावकऱ्यांनी दिली आहे.
Facebook Comments Box

Video | एलटीटी थिवी एक्सप्रेस रत्नागिरीत ११ तास उशिराने पोहचली; प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत

   Follow us on        
रत्नागिरी, दि. ०१ मे: कोकण रेल्वे मागार्वर सोडण्यात आलेल्या उन्हाळी विशेष गाड्या ८ ते १० तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खासकरून ०१०१७/०१०१८ एलटीटी थिवी एलटीटी विशेष गाडी पुनर्नियोजित करून सुरवातीपासूनच ८ ते १० तास उशिराने चालविण्यात येत आहे. त्याच बरोबर १००९९/१०१०० एलटीटी मडगाव एलटीटी ही नियमित गाडीही अशीच वारंवार पुनर्नियोजित करून ४ ते ५ तास उशिराने धावत असल्याने  प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत 
काल दिनांक ३० एप्रिल रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटणारी गाडी क्र. ०१०१७ एलटीटी – थिवी सुमारे सहा तास उशिराने पहाटे ४ वाजून २७ मिनिटांनी रवाना झाली. आधीच उशिरा सुटलेल्या गाडीला प्रथम प्राधान्य देण्याची गरज असताना रेल्वे प्रशासन अगदी या विरुद्ध करून या गाडीला मागे ठेवून इतर गाडयांना प्राधान्य देत असल्याने ही गाडी रत्नागिरीला तब्बल ११ तास उशिरा दुपारी ३:४५ वाजता पोहोचली. याचा अर्थ रात्री १० वाजता आलेला प्रवासी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजेपर्यंत रत्नागिरी स्थानकातच होता. आता मात्र प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी तेथील आरपीएफ कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. तिकीट निरीक्षक आणि स्टेशन मास्तर नजरेस ही पडत नसल्याने आपली गाऱ्हाणी कोणासमोर मांडायची असे प्रवासी विचारात होते. या बाबतचा एक विडिओ पण व्हायरल झाला आहे.
विशेष गाड्या जर उशिराने चालवायच्या असतील तर अतिरिक्त भाडे का?
हंगामात रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र या गाड्यांसाठी रेल्वेकडून अतिरिक्त प्रवासी भाडे आकारण्यात येते. उदाहरणार्थ एलटीटी ते सावंतवाडी  थ्री टियर इकॉनॉमी कोचच्या सीटचे कोकणकन्या एक्सप्रेसचे भाडे ९६० रुपये एवढे आहे. त्याच अंतरासाठी समान कोचचे ०१०१७/०१०१८ एलटीटी थिवी एलटीटी विशेष गाडीचे भाडे ११६० रुपये आहे. म्हणजे २०० रुपयांचा फरक आहे. एवढे अतिरिक्त भाडे आकारूनही जर अशी सेवा मिळत असल्याने प्रवासी वर्ग नाराज आहे.

 

Facebook Comments Box

सामंत बंधुत ‘बिनसलंय’? नारायण राणेंच्या अडचणींत वाढ

   Follow us on        
रत्नागिरी, दि. ०१ मे:  सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रत्नागिरीत सामंत विरुद्ध सामंत असा सामना सुरू झाला आहे. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयावरील बॅनर बदलला आहे. उदय सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर होता. आता किरण सामंत संपर्क कार्यालय असे बॅनर लावण्यात आला आहे. त्यामुळे किरण सामंत अद्यापही उमेदवारीवरून नाराज असल्याची चर्चा तळ कोकणात सुरू झाली आहे. नव्याने लावण्यात आलेल्या बॅनरवरून उदय सामंत यांचाही फोटो काढण्यात आला आहे.
उदय सामंत यांचे बॅनर हटवण्यात आल्यानंतर किरण सामंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “माझं कार्यालय आहे. तिथेच मी बसणार. माझ्या कार्यालयात काय करायचं हे मी ठरवणार, अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली आहे. शिवसेनेचं जिल्हा संपर्क कार्यालय हे माझ्या मालकीचं आहे”, असं किरण सामंत यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंच्या अडचणींत वाढ
किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेसाठी इच्छुक होते. शेवटपर्यंत ही जागा शिवसेनेकडे जाते कि भाजपाकडे याबाबत रस्सीखेच चालू होता. अखेर भाजपने बाजी मारून नारायण राणे यांना उमेदवारी दिली. उदय सामंत आणि किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माघार घेत असल्याची घोषणा केली.. महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचा प्रचार करणार.. असं आश्वासन उदय सामंत आणि किरण सामंतांनी पत्रकार परिषदेतून दिले होते. मात्र आजची घटना नारायण राणे आणि  भाजपाची झोप उडवणारी ठरणार आहे. किरण सामंत यांची नक्की भूमिका काय आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण किरण सामंत यांनी साथ न दिल्यास ही निवडणूक जिंकणे युतीला कठीण होणार असून सामंत बंधुतील या वाढच फायदा शिवसेना (उबाठा) च्या विनायक राऊत यांना होणार आहे.

Facebook Comments Box

Mumbai Local | मुंबईत पुन्हा लोकल घसरली, तीन दिवसांत दुसरी घटना

   Follow us on        

मुंबई : मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे पुन्हा लोकल रुळावरून घसरल्याची घटना बुधवारी दुपारी ४.१३ च्या सुमारास घडली. गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. तसेच सध्या हार्बर मार्ग ठप्प झाला आहे.

लोकलची चाचणी सुरू होती. मात्र ती अयशस्वी झाली. लोकल घसरली त्याठिकाणी ब्लॉक घेऊन दुरुस्ती करण्यात आली होती. त्याच्यानंतर त्या रुळावरून एक रिकामी लोकल चालवून पाहण्यात आली. मात्र ती घसरली, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

हार्बर मार्गावरील सीएसएमटी – वडाळा रोड दरम्यान लोकल बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना सीएसएमटी आणि कुर्ला दरम्यान अप आणि डाऊन दिशेने मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Facebook Comments Box

Loksabha Eelection 2024 | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची रविवारी सावंतवाडीत सभा

   Follow us on        
सावंतवाडी, दि. ०१ मे : येत्या रविवारी (ता.५) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सावंतवाडीमध्ये सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ते सावंतवाडी येथे येणार असल्याची माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली
‘‘निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून राणेंचा विजय निश्चित आहे. सहाही विधानसभा मतदारसंघातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजित पवार गट व रामदास आठवले आरपीआयच्या माध्यमातून कार्यकर्ते व पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. केंद्राच्या ५४ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आणल्यात त्या आम्ही जनतेसमोर घेऊन जात असून कणखर नेतृत्व म्हणून मोदी हे जगभरात प्रसिद्ध आहेत. आम्ही जनतेसमोर मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कामगिरी घेऊन जात आहोत आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. ऑनलाइन अर्थात डिजिटल पद्धतीने चलनात पैसा येऊ लागल्याने अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली आहे. ती पुढील काळात तीन नंबरवर आणण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम होईल. केंद्रीय मंत्री राणे यांनी बेरोजगारीवर पर्याय शोधले असून त्यांनी प्रकल्प साकारण्याचा निश्चय केला आहे. सी वर्ल्ड प्रकल्प झाला असता तर आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दूर झाली असती. पण, खासदार विनायक राऊत आणि ठाकरे यांच्या आमदारांनी त्याला विरोध केला. रिफायनरीला देखील विरोध राहिल्याने तो होऊ शकला नाही. असे राजन तेली  या वेळी म्हणालेत.
‘‘आडाळी एमआयडीसी, दोडामार्ग तालुका निर्मिती राणे यांनी केली आहे. या ठिकाणी देखील रोजगार आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच रोजगाराच्या प्रश्नावर नारायण राणे यांचे मॉडेल तयार आहे. ते निश्चित काम करतील.’’ असे ते पुढे म्हणालेत
Facebook Comments Box

Konkan Railway | नेत्रावती एक्सप्रेसला महिनाभर लागणार ‘लेटमार्क’; कारण काय?

   Follow us on        
Konkan Railway News:रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली (MORTH) आणि राष्ट्रीय महामार्ग (NH) PWD गोवा तर्फे माजोर्डा जं- मडगाव जं.  विभागातील  रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी, मडगाव वेस्टर्न बायपाससाठी स्टील गर्डर्स लाँच करण्यासाठी लाइन आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या ब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर रोज धावणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसवर होणार आहे.
कोकण रेल्वे तर्फे आलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर दिवशी ११ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी गाडी क्रमांक  १६३४५ लोकमान्य टिळक  – तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस दिनांक ०२ मे  ते २९ मे पर्यंत करमाळी ते रत्नागिरी दरम्यान सुमारे ७० मिनिटे उशिराने धावणार आहे. या गाडीला कोकणात रोहा, खेड, चिपळूण संगमेश्वर रोड, रत्नागिरी आणि कुडाळ येथे थांबे आहेत.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Facebook Comments Box

T20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी इंडियाची टीम जाहीर; जाणून घ्या कोणाला मिळाली संधी..

India Squad for T20 World Cup 2024 : अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळने टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी आज टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये काही नवीन खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून काम करताना दिसणार आहे.

संघात दोन यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन आहे. त्याचबरोबर केएल राहुलला संघातून वगळण्यात आले आहे. राहुल गेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा भाग होता.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ (India Squad for T20 World Cup 2024) : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

टीम इंडियाचे टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक – (T20 World Cup 2024 Schedule)

5 जून – टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड

9 जून – टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान

12 जून – टीम इंडिया विरुद्ध यूएएसए

15 जून – टीम इंडिया विरुद्ध कॅनडा

 

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search