Konkan Railway: दिवा स्थानकावरून कोकणरेल्वेच्या गाड्या सोडणे नियमबाह्य़ आणि गैरसोयीचे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ५०१०३/५०१०४ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर आणि १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या दोन गाड्या दिवा स्थानकावरून सोडण्यात येतात. मात्र कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या या दोन गाड्यांसाठी सुरवातीचे स्थानक म्हणुन दिवा स्थानक गैरसोयीचे असून नियमबाह्य़ही आहे. या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी या स्थानकांवरून सोडण्यात याव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सेक्रेटरी अक्षय महापदी यांनी केली आहे.

रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन

दिवा स्थानकावर सध्या गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सोय नाही आहे. रेल्वे बोर्डाने दिनांक १६.०४.२०१० रोजी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील प्रवासात गैरसोय टाळण्यासाठी गाडयांना सुरवातीच्याच स्थानकावर पाणी भरणे बंधनकारक केले आहे. असे असताना येथून सुटणाऱ्या या दोन गाड्यामध्ये पाणी पुढील स्थानकावर म्हणजे पनवेल स्थानकावर भरण्यात येते. यावरून विभागीय रेल्वे प्रशासन रेल्वे बोर्डाच्या सुचना पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या गाड्यांना पनवेल स्थानकावर पाणी भरावे लागत असल्याने पनवेल स्थानकावर नियमित थांब्याच्या कालावधीपेक्षा अधिक कालावधीपर्यंत गाडी थांबवून ठेवावी लागत असल्याने प्रवाशांच्या वेळेचा अपव्यव होतो.
फक्त दोन गाड्यांसाठी दिवा स्थानकावर पाणी भरण्याची व्यवस्था करणे अव्यवहार्य आहे. दिवा परिसरात पाण्याची कमतरता पाहता अशी सोय केली तरी गाड्यांसाठी पाण्याची टंचाई भासू शकते. त्यापेक्षा या गाड्या पुढे दादर, सीएसएमटी नेल्यास त्यांच्यासाठी लागणारे पाणी आणि देखभालीचा प्रश्न राहणार नाही.

प्रवाशांसाठी गैरसोयीचे

मांडवी, जनशताब्दी, वंदे भारत, तेजस, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोकणकन्या, मडगाव वांद्रे, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव या गाड्या कोकणातील बहुतांश स्थानकांवर थांबत नाहीत. त्या स्थानकांवर केवळ सावंतवाडी एक्सप्रेस आणि रत्नागिरी पॅसेंजर या किंवा यांपैकी कोणतीतरी एकच गाडी थांबते. त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणार्‍या प्रवाशांना इतर पर्यायच नाही. हे प्रवासी ठाणे, भांडुप, घाटकोपर, मुंबई, बोरिवली, मीरा-भायंदर, वसई  विरार येथील आहेत. या गाड्या दिवा स्थानकापर्यंत मर्यादित असल्याने या गाड्यांचा लाभ घेताना त्यांना खासकरून आबालवृद्धांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो त्यामुळे या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी पर्यत विस्तारित केल्यास त्यांचा त्रास बर्‍यापैकी वाचेल.

फलाटाची कमी लांबी

दिवा स्थानकावरील फलाटांची लांबी पुरेशी नसल्याने या गाडयांना अधिक डबे जोडण्यावर मर्यादा येत आहेत. १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी दिवा ही गाडी एलएचबी स्वरूपात चालविण्यात येत असून सध्या ती १६ डब्यांच्या चालविण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता ही गाडी २२ डब्यांची करणे आवश्यक आहे. दिवा स्थानकांवरील कमी लांबीच्या प्लॅटफॉर्ममुळे ते शक्य होणार नाही.

दिवा स्थानकासाठी ५ डबे राखीव असावेत

सध्या या गाड्यादिवा स्थानकावरून सोडण्यात येत असल्याने कल्याण डोंबिवली आणि  दिवा भागातील प्रवाशांना ही गाडी सोयीची आहे. ही गाडी दादर किंवा मुंबई  सीएसएमटी स्थानकापर्यंत विस्तारित झाल्यास येथील प्रवाशांच्या सोयीसाठी किमान ५ जनरल डबे दिवा स्थानकाला राखीव ठेवावे, जेणेकरून या प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होईल.
या मुद्द्यांवर श्री.अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी स्थानकापर्यंत विस्तारित कराव्यात अशी इमेलद्वारे मागणी केली आहे.
Facebook Comments Box

२५ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 12:50:44 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 18:32:04 पर्यंत
  • करण-तैतुल – 12:50:44 पर्यंत, गर – 24:05:58 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-व्यतापता – 08:14:38 पर्यंत, वरियान – 29:50:33 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:03
  • सूर्यास्त- 18:41
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 29:41:59
  • चंद्रास्त- 16:04:59
  • ऋतु- वसंत

महत्त्वाच्या घटना :
  • 1510: पोर्तुगीज सरदार आल्फोन्सो आल्बुकर्क याने पणजीचा किल्ला जिंकला.
  • 1818: लेफ्टनंट कर्नल डिफेनने चाकणचा किल्ला उद्ध्वस्त केला. ब्रिटिशांनी दख्खनचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी सह्याद्रीतील बहुतेक किल्ले उद्ध्वस्त केले.
  • 1935: मुंबई-नागपूर-जमशेदपूर मार्गावर फॉक्स मॉथ विमानाने हवाई टपाल सेवा सुरू केली.
  • 1945: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू जहाजांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
  • 1945: दुसरे महायुद्ध – तुर्कीने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले.
  • 1968: मोहम्मद हिदायतुल्ला यांनी भारताचे 11 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1988: पहिल्या भारतीय बनावटीच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1884: ‘रविशंकर व्यास’ – भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म.
  • 1940: ‘विनायक कोंडदेव ओक’ – बालवाङ्‌मयकार यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1914)
  • 1943: ‘जॉर्ज हॅरिसन’ – बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक यांचा जन्म. (मृत्यू: 29 नोव्हेंबर 2001)
  • 1948: ‘डॅनी डेंग्झोप्पा’ – चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1974: ‘दिव्या भारती’ – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 5 एप्रिल 1993)
  • 1778: ‘जोस डे सान मार्टिन’ – पेरू देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 17 ऑगस्ट 1850)
  • 1981: ‘शाहिद कपूर’ – चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1599: ‘संत एकनाथ’ – यांचे निधन.
  • 1964: ‘शांता आपटे’ – चित्रपट अभिनेत्री यांचे निधन.
  • 1978: ‘डॉ. प. ल. वैद्य’ – प्राच्यविद्यासंशोधक यांचे निधन. (जन्म: 29 जून 1891)
  • 1980: ‘गिरजाबाई महादेव केळकर’ – लेखिका व नाटककार यांचे निधन.
  • 1999: ‘ग्लेन सीबोर्ग’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 19 एप्रिल 1912)
  • 2001: ‘सर डोनाल्ड ब्रॅडमन’ – ऑस्ट्रेलियन फलंदाज यांचे निधन. (जन्म: 27 ऑगस्ट 1908)
  • 2016: ‘भवरलाल जैन’ – भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1937)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

दोडामार्ग ग्रामीण भागातील गरीब मुलीच्या यकृत प्रत्यारोपणासाठी तातडीच्या मदतीची आवश्यकता

   Follow us on        

सिंधुदुर्ग: दोडामार्ग तालुक्यातील अडाळी – खालची वाडी येथील १३ वर्षे वय असलेल्या कु. वंशिका विष्णु सावंत हिचे आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे तातडीने यकृत प्रत्यारोपणाची Liver Transplant गरज निर्माण झाली आहे. सध्या ती गोवा येथील बांभूळी येथील रुग्णालयात असून यकृत प्रत्यारोपण तसेच पुढील उपचारासाठी बंगलोर किंवा मुंबई येथे हलवावे लागणार आहे.

पुढील उपचार अत्यंत खर्चिक असून घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. तिचे आई वडील शेतीवर आपला उदरनिर्वाह करत आहेत. हाती असलेली काहीशी बचत आणि नातेवाईकांनी केलेली मदत आतापर्यंतच्या उपचारासाठी खर्ची झाली असून पुढील उपचारासाठी पैसे कसे उभे करावे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. त्यामुळे त्यांनी मुलीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी जमेल तेवढी मदत करावी असे आवाहन केले आहे.

मदत करण्यासाठी Gpay नंबर – 7588862507 (उदय कोठावळे, मुलीचा मामा)

संपर्क- 7588209887 (आरती विष्णु सावंत, मुलीची आई)

रुग्णालयाचे अहवाल आणि इतर कागदपत्रे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

https://drive.google.com/file/d/1Sg0QOusEVnGz8SSQxJwSgol09lD7OyQG/view?usp=sharing

https://drive.google.com/file/d/1pAbeV4K1ReUEASzQNJM9eQwTxkU0brgE/view?usp=sharing

 

 

 

 

Facebook Comments Box

२४ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 13:48:08 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 19:00:12 पर्यंत
  • करण-बालव – 13:48:08 पर्यंत, कौलव – 25:25:02 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सिद्वि – 10:04:44 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:03
  • सूर्यास्त- 18:43
  • चन्द्र-राशि-धनु – 24:57:12 पर्यंत
  • चंद्रोदय- 28:53:59
  • चंद्रास्त- 15:03:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • केंद्रीय उत्पाद शुल्क दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1670: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म झाला.
  • 1918: एस्टोनियाला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1920: नाझी पक्षाची स्थापना झाली.
  • 1942: व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.
  • 1952:कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) सुरू झाली.
  • 1961: सरकारने मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू करण्याचा निर्णय घेतला.
  • 1987: शास्त्रज्ञ इयान शेल्डन यांनी मॅगेलेनिक नक्षत्रात 1987-ए हा तेजस्वी तेजोमेघ शोधला. त्यावेळी ते पृथ्वीपासून 1,68,000 प्रकाशवर्षे दूर होते.
  • 2010: सचिन तेंडुलकर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू बनला.
  • 2022: रशिया-युक्रेन युद्ध – रशियाने युक्रेनवर पूर्ण आक्रमण केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1670: ‘छत्रपती राजाराम’ – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म. (मृत्यू: 2 मार्च 1700)
  • 1841: ‘जॉन फिलिप हॉलंड’ – आयरिश अभियंते, एचएमएस हॉलंड चे रचनाकार यांचा जन्म (मृत्यू : 12 ऑगस्ट 1914)
  • 1924: ‘तलत महमूद’ – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा यांचा जन्म. (मृत्यू: 9 मे 1998))
  • 1942: ‘गायत्री चक्रवर्ती’ – भारतीय तत्त्वज्ञानी यांचा जन्म.
  • 1948: ‘जे. जयललिता’ – तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री, दक्षिणेतील अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 5 डिसेंबर 2016)
  • 1955: ‘स्टीव्ह जॉब्ज’ -अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑक्टोबर 2011)
  • 1985: ‘नकाश अझीझ’ – भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1810: ‘हेन्‍री कॅव्हँडिश’ – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1731)
  • 1876: ‘जोसेफ जेनकिन्स रॉबर्ट्स’ -लायबेरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष – (जन्म: 15 मार्च 1809)
  • 1936: ‘लक्ष्मीबाई टिळक’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
  • 1967: ‘मीर उस्मान अली खान’ – हैदराबाद राज्याचे शेवटचे निजाम यांचे निधन. (जन्म: 6 एप्रिल 1886)
  • 1975: ‘निकोलाय बुल्गानिन’ – सोविएत युनियनचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1895)
  • 1986: ‘रुक्मिणीदेवी अरुंडेल’ – भरतनाट्यम नर्तिका यांचे निधन. (जन्म: 29 फेब्रुवारी 1904)
  • 1998: ‘ललिता पवार’ – अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या यांचे निधन. (जन्म: 18 एप्रिल 1916)
  • 2016: ‘पीटर केनिलोरिया’ – सोलोमन बेटांचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 23 मे 1943)
  • 2018: ‘श्रीदेवी’ – पद्मश्री, भारतीय अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1963)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Mumbai Local: दिवा-मुंब्रा-कळवा दरम्यान रेल्वे मार्गावर असलेली वळणे ठरत आहेत ‘मृत्यूचे सापळे’

   Follow us on        

ठाणे: दिवा मुंब्रा कळवा दरम्यान नव्याने टाकण्यात आलेल्या नवीन पाचव्या आणि सहाव्या अप आणि डाऊन जलद उपनगरीय रेल्वे मार्गावर असलेल्या वळणांमुळे या मार्गावरून जाणार्‍या लोकल गाड्या मोठे हेलकावे खात असल्याने अपघात होण्याच्या शक्यता कित्येक पटीने वाढली असून याबाबत अनेक प्रवाशांनी आवाज उठविला आहे.

दिवा मुंब्रा कळवा हा भाग अत्यंत गर्दीचा मानला जातो. सकाळी आणि संध्याकाळी पीक अवर्स मध्ये येथून जाणार्‍या गाड्यांत तर जीवघेणी गर्दी असते. दिवा मुंब्रा कळवा या नव्याने टाकलेल्या रूळांवर जलद गाड्या चालविल्या जात आहेत. या मार्गावर काही वळणे असून येथून जाताना गाड्या मोठ्या प्रमाणात हेलकावे खातात आणि एका बाजूने झुकत असतात. त्यामुळे गर्दीमुळे गाड्यांच्या दरवाजात उभे असलेले प्रवाशांवर भार येवून ते बाहेर फेकले जात आहेत. या कारणाने बरेच प्रवासी खाली पडून जखमी झाले आहेत तर काहींनी आपला जीवही गमावला आहे. गेल्या वर्षी ठाणे रेल्वे पोलीस स्थानकात एकूण ठाणे विभागात ६८ प्रवाशांनी अपघातात जीव गमावल्याची नोंद आहे. ठाणे रेल्वे पोलीस विभागात ठाणे, कळवा, दिवा, मुंब्रा आणि ऐरोली ही स्थानके समाविष्ट आहेत. कळवा, दिवा, मुंब्रा या स्थानकांदरम्यान जास्त अपघात झाल्याची नोंद आहे.

प्रवाशांनी याबाबत आवाज उठविला असून या मार्गाची पुन्हा तपासणी करावी आणि अपघाताला कारणीभूत असलेली वळणे काढून टाकावी अशी मागणी केली आहे.

प्रवासी काय म्हणतात?

मी अंबरनाथ ते दादर असा प्रवास नेहमी जलद गाडीने करतो. गाडी अंबरनाथवरुन सुटत असल्याने मला दरवाजात उभे राहण्याचा प्रश्न येत नाही. मात्र दिवा ते ठाणे दरम्यान गाडी खूप हेलकावे घेते. हे हेलकावे एवढे मोठे असतात की आधार न घेता प्रवासी नीट उभा राहू शकत नाही. यावरून दरवाजावर उभे असलेल्या प्रवाशांच्या स्थितीचा अंदाज येतो. – श्री. चिन्मय राणे, अंबरनाथ

प्रवासी संघटनेचे सदस्य सुभाष गुप्ता म्हणाले, “रेल्वे अपघात मॉनिटरिंग समितीने या समस्येवर चर्चा केली पाहिजे, ज्याने या प्रकरणाची चौकशी करून योग्य सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे. पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या जोडणीनंतर ट्रॅक अपग्रेड केल्यापासून तक्रारी आहेत. ट्रॅक वळवल्यामुळे समस्या वाढली आहे. रेल्वेने संरेखनाची पुन्हा तपासणी करावी आणि काही अडचण आल्यास वेग मर्यादा घालावी.”

रेल्वे प्रशासन काय म्हणते?

रेल्वेला उपलब्ध झालेल्या जमिनीनुसार या मार्गाची रचना केलेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी रेल्वे मार्गावर वळणे घ्यावी लागली आहेत. ही वळणे पूर्णपणे काढणे सध्या तरी शक्य नाही असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

 

 

 

 

Facebook Comments Box

विशेष गाडीतून महाकुंभमेळ्यासाठी जाणारे गोव्यातील १०० प्रवासी रत्नागिरीहून माघारी फिरले; कारण काय?

   Follow us on        

रत्नागिरी: गोवा सरकारने महाकुंभ मेळ्यासाठी चालविलेल्या विशेष गाडीला तुफान प्रतिसाद मिळाला असून गाडीच्या एकूण क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी झाल्याने या गाडीला मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना नाईलाजाने आपला प्रवास अर्धवट सोडून परत माघारी फिरावे लागले असल्याची बातमी समोर आली आहे.

गोवा सरकारने गोव्यातील भाविकांनी महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणे सुलभ व्हावे यासाठी विशेष सवलत देवून या मार्गावर गाड्या चालविल्या आहेत. प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान मोफत जेवण आणि इतर सवलती देण्यात आल्या आहेत. या प्रवासाकरिता सरकारने पास वितरित केले होते. मात्र पासधारकां व्यतिरिक्त किमान ४०० अतिरिक्त प्रवासी या गाडीतून प्रवास करत होते. या अतिरिक्त प्रवाशांमुळे गोवा सरकारने देवू केलेल्या सवलतींवर म्हणजे जेवण आणि इतर गोष्टींवर परिणाम झाला. कारण या गोष्टी फक्त पास धारकांपुरत्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनावर ताण आला.

दुसरी गोष्ट म्हणजे पास धारक आणि बिनापासधारक प्रवाशांमध्ये जागेसाठी खटके उडू लागले. रेल्वे खचाखच भरल्याने पाय ठेवण्यासही जागा नव्हती. पास असलेल्यांची चांगली सोय झाली. रात्रीच्या जेवणाची त्यांची सोय झाली. मात्र पास नसलेल्यांना हातपाय पसरू देण्यास इतर प्रवाशांनी नकार देणे सुरू केले. प्रवास हा ६-७ तासांचा नव्हे, तर तब्बल ३६ तासांचा असल्याने प्रत्येकाला व्यवस्थितपणे, सुखकर पद्धतीने प्रवास करायचा होता. त्यांना हे आगंतुक प्रवासी नकोसे झाले होते. त्यामुळे काहींचे खटके उडणे गोवा ते रत्नागिरी प्रवासादरम्यानच सुरू झाले. कंटाळून काही प्रवाशांनी रेल्वे पाण्यासाठी आणि चालक, कर्मचारी बदलासाठी रत्नागिरी येथे थांबवली गेली, तेव्हा तेथे शंभरेक जणांनी उतरून गोव्यात परतीचा मार्ग पत्करणे सोयीस्कर मानले, असे अनेकजण आज सकाळी प्रयागराजऐवजी ते घरी परतले.

 

 

Facebook Comments Box

२३ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 13:59:03 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 18:43:46 पर्यंत
  • करण-विष्टि – 13:59:03 पर्यंत, भाव – 25:59:35 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वज्र – 11:18:13 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:04
  • सूर्यास्त- 18:40
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- 28:00:59
  • चंद्रास्त- 14:03:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • विश्व शांति आणि समझदारी दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1763: गयानामध्ये बर्बिस गुलाम उठाव: दक्षिण अमेरिकेतील पहिला मोठा गुलाम उठाव.
  • 1854: दक्षिण आफ्रिकेतील ऑरेंज फ्री स्टेटचे अधिकृत स्वातंत्र्य घोषित करण्यात आले.
  • 1934: लिओपोल्ड तिसरा बेल्जियमचा राजा बनला.
  • 1941: डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी पहिल्यांदाच प्लुटोनियम घटक वेगळे केले.
  • 1947: आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (ISO) ची स्थापना.
  • 1954: पिट्सबर्गमध्ये साल्क लसीने पोलिओ विरूद्ध मुलांचे पहिले सामूहिक लसीकरण सुरू झाले.
  • 1966: सीरियामध्ये लष्करी उठाव.
  • 1987: सुपरनोव्हा 1987अ दिसला.
  • 1997: रशियाच्या मीर अंतराळ स्थानकात आग लागली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1876: ‘संत गाडगे महाराज’ यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1956)
  • 1913: ‘पी. सी. सरकार’ – जादूगार यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1971)
  • 1957: ‘येरेन नायडू’ – तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते यांचा जन्म. (मृत्यू: 2 नोव्हेंबर 2012)
  • 1965: ‘अशोक कामटे’ – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर यांचा जन्म. (मृत्यू: 26 नोव्हेंबर 2008)
  • 1954: ‘व्हिक्टर युश्चेन्को’ – युक्रेन देशाचे 3रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1949: ‘मार्क गार्न्यु’ – पहिले कॅनेडियन अंतराळवीर, राजकारणी यांचा जन्म.
  • 1924: ‘ऍलन मॅक्लिओड कॉर्मॅक’ – नोबेल पारितोषिक विजेते, दक्षिण आफ्रिकन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.  (मृत्यू : 7 मे 1998)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1777: ‘कार्ल फ्रेड्रिक गाऊस’ – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1777)
  • 1792: ‘सर जोशुआ रेनॉल्ड्स’ – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 16 जुलै 1723)
  • 1904: ‘महेन्द्र लाल सरकार’ – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक यांचे निधन. (जन्म: 2 नोव्हेंबर 1833)
  • 1944: ‘लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड’ – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1863)
  • 1969: ‘मधुबाला’ – चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 14 फेब्रुवारी 1933)
  • 1998: ‘रमण लांबा’ – क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 2 जानेवारी 1960)
  • 2000: ‘वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे’ – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक यांचे निधन.
  • 2004: ‘सिकंदर बख्त’ – केन्द्रीय परराष्ट्रमंत्री यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1918)
  • 2004: ‘विजय आनंद’ – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 22 जानेवारी 1934)
  • 2013: ‘लोटिका सरकार’ – भारतीय वकील यांचे निधन. (जन्म: 4 जानेवारी 1923)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Odisha: बालासोर येथे एक्स्प्रेसला अपघात

   Follow us on        

Railway Accident: ओडिशामधील बालासोर येथे न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळावरून घातल्याची माहिती समोर आली आहे. बालासोर जिल्ह्यातील सबीरा पोलीस ठाण्याजवळ ही ट्रेन रुळांवरून उतरल्याचे सांगण्यात येत आहे. रुळावरून उरल्यावर ही ट्रेन एका विजेच्या खांबावर आदळली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाहीत.

दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या अपघातप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ही ट्रेन नेमकी कशी काय रुळांवरून उतरली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल.

दरम्यान, न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळांवरून उतरल्यानंतर ट्रेनमधील प्रवासी बाहेर आले. त्यामुळे अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे काही अधिकारी आणि पोलीस अपघातस्थळी पोहोचले. त्यानंतर घसरलेल्या ट्रेनला रुळावर आणून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले.

Facebook Comments Box

संतापजनक! कर्नाटकात महाराष्ट्रातील एसटी बस चालकाच्या तोंडाला काळे फासत मारहाण

   Follow us on        

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पुणे- बेंगलोर महामार्गावरील चित्रदुर्ग इथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे . याठिकाणी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसटीवर हल्ला करून चालकाला मारहाण केल्याची तसेच काळेही फासल्याची बातमी समोर आली आहे.

कर्नाटकमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे- बेंगलोर महामार्गावरील चित्रदुर्ग इथे हा धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसटीवर हल्ला केला, तसेच काळेही फासले.

कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येथे का अशी विचारणा करत मारहाणही केली. एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्याने त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरु केले आहे. तसेच राज्य सरकारनेही याप्रकरणाची दखल घेत कर्नाटकला जाणाऱ्या बसेस तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.

Facebook Comments Box

धक्कादायक! तारकर्ली समुद्र किनार्‍यावर पुण्याचे ३ युवक बुडाले; दोघांचा मृत्यू, एक अत्यवस्थ

   Follow us on        
सिंधुदुर्ग : तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर गंभीर असलेल्या एका युवकावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी ११.२० वाजण्याच्या दरम्यान तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रात घडली.
याबाबतची माहिती अशी हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (वय- २१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), आँकार अशोक भोसले (वय- २६), रोहित बाळासाहेब कोळी (वय २१) शुभम सुनील सोनवणे (वय २२) सर्व रा. उरुळी देवाची पोलीस चौकीच्या मागे हडपसर ता. हवेली, जि. पुणे हे युवक तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळ लगतच्या समुद्रात हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. पर्यटक बुडत असल्याचे निदर्शनास येताच किनाऱ्यावरील स्थानिक आणि तसेच पर्यटन व्यवसायिकांनी तत्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा पाण्यात शोध घेण्यात आला. अखेर स्थानिकांकडून समुद्रात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडून आले. त्यांना तत्काळ किनाऱ्यावर आणल्यावर रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून अधिक उपचार करण्यासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्यात समीर गोवेकर वैभव सावंत दत्तराज चव्हाण महेंद्र चव्हाण राजेश्वर वॉटर स्पोर्ट्स चे कर्मचारी सहभागी झाले होते या घटनेची माहिती येथील पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search

Join Our Whatsapp Group.