

आषाढी वारीसाठी राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पंढरपूर येथे येणाऱ्या व पंढरपूर येथून जाणाऱ्या पालख्या, वारकरी व भाविकांच्या वाहनांना टोल माफी देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित केले आहे.
गणेश चतुर्थी दरम्यान दिल्या जाणार्या टोल मुक्तीच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह्या वर्षी वारकऱ्यांना टोलमुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक ०७.०७.२०२२ ते १५.०७.२०२२ पर्यंत ही टोलमुक्ती देण्यात येणार आहे.
ह्या परिपत्रकासोबत टोलमुक्ती साठी लागणाऱ्या स्टिकर्सची उपलब्धता याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्टिकर साठी कराव्या लागणाऱ्या अर्जाचा नमुना जोडला आहे.
कोकण रेल्वेने आज गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष फेर्या चालवण्याचे आज जाहीर केले आहे.
मागच्या आठवड्यात जाहीर केलेल्या विशेष गाडय़ांची बूकिंग फूल झाली त्यामुळे ह्या गाड्यांच्या स्वरुपात प्रवाशांसाठी एक पर्याय उपलब्ध होईल.
दिनांक १३.०८.२०२२ ते ११.०९.२०२२ दरम्यान ही गाडी रोज चालवली जाईल. ही गाडी रात्री २२.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई वरून निघेल ती ठोकूर, मंगलोरला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४.३० वाजता पोहोचेल.
डब्यांची स्थिती 1 AC (2A) + 12 Sleeper (SL) + 5 General + 4 AC (3A) + 2 SLR = एकूण २४ डबे
दिनांक १४.०८.२०२२ ते १२.०९.२०२२ दरम्यान ही गाडी रोज चालवली जाईल. ही गाडी संध्याकाळी ठोकूर, मंगलोरवरून ७.३० वाजता निघेल ती दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबईला पोहोचेल.
डब्यांची स्थिती 1 AC (2A) + 12 Sleeper (SL) + 5 General + 4 AC (3A) + 2 SLR = एकूण २४ डबे
जिल्ह्यात सद्या पावसाचा रेड अलर्ट असल्याच्या पार्श्वभूमीवर पालक सचिव श्रीमती नायर-सिंह यांनी आज सर्व विभागांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली होती.
सर्व यंत्रणांचे आपत्ती व्यवस्थापन नियोजन आहे आणि जिवितहानी होणार नाही ही आपली जबाबदारी आहे असे त्या म्हणाल्या.
दरड प्रवण भागात विशेष खबरदारी घ्या. साधन सामग्री, त्यांची सुस्थिती, त्यांचे इंधन याची चोख व्यवस्था करा. सद्यस्थितीत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. सामाजिक संस्थांची यादी संपर्कासाठी तयार ठेवा. असे त्या पुढे म्हणाल्या.
प्रत्येक जिल्ह्यात NDRF ची पथके तयार ठेवली आहेत. मागील वर्षाच्या पुरामुळे झालेली जिवितहानी ह्या वर्षी होऊ नये ह्याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहेत. जिथे डोंगर खचण्याचा धोका आहे तिथून नागरिकांना हलवण्यात येत आहे. नद्या आणि धरणांच्या पातळीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नदीने धोका पातळी ओलांडल्यावर त्या परिसरातील नागरिकांना सावध करण्यात येत आहे.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो वारकरी येतात. ह्या वारकर्यांसाठी एक आनंदाची बातमी आज समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात येणार्या भाविकांच्या गाड्यांसाठी टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकणातील गणेशोत्सवासाठी जाणार्या भाविकांना जशी टोल मुक्ती भेटते तशीच सुविधा आता पंढरपुरात वारीला येणार्या वारकर्यांना मिळणार आहे. आषाढी वारीसाठी राज्यातूनच नाही तर पूर्ण देशातून भाविक येतात. या भाविकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
कोकणातील गणेशोत्सवासाठी जसे भाविक गाडी नंबर आणि नावनोंदणी करून स्टिकर घेतात तसेच वारकर्यांना घ्यावा लागणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई – आज पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे.
आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एका सिलेंडरसाठी आता मुंबईत १०५२.५० रुपये मोजावे लागणार आहेत.
देशातील चार मोठ्या शहरांचा विचार केल्यास दिल्लीमध्ये एका सिलेंडरसाठी १०५३ रुपये, कोलकातामध्ये १०७९ रुपये, तर चेन्नईमध्ये १०६८.५० रुपये मोजावे लागणार आहेत.
५ Kg च्या घरगुती गॅस सिलिंडर वर ही वाढ १८ रुपयांनी झाली आहे
अतिवृष्टी झाल्याने पावसाळ्यात पूरस्थिती होते. आजूबाजूच्या परिसरात पाणी साचायला सुरू झाले की प्राणी आपल्यासाठी सुरक्षित आसरा शोधायला सुरवात करतात आणि हा आसरा तुमचे घर पण असू शकते. आपल्यासाठी धोकादायक गोष्ट म्हणजे या प्राण्यांमध्ये आजूबाजूचे विषारी साप पण असू शकतात. याशिवाय पुराच्या पाण्यात पण साप वाहून येतात व घरात शिरू शकतात.
ह्या गोष्टीवर खबरदारी म्हणजे ह्या सापांविषयी संपूर्ण माहिती असणे. त्यासाठी आम्ही ह्या पोस्ट सोबत एक pdf स्वरुपात पुस्तिका जोडत आहोत. “उपाय” बहुद्देशीय संस्थेने ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखायचे, अगदी सारखे दिसणाऱ्या सापाच्या जाती कोणत्या, सर्पदंश झाल्यावर कोणते प्रथमोपचार करावे. सर्पदंश टाळण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगायची याबद्दल माहिती दिली आहे.
हि पोस्ट शेयर करा म्हणजे ह्या माहितीने अनेकांचे जीव वाचू शकतील.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1544252287521935360?t=KCKyBFZKqgRr_bCOifhHsA&s=19
शिवसेना गटनेता पदी अजय चौधरी यांची नियुक्ती अवैध असून एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी कायम राहतील अशा निर्णयाचे पत्र काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र विधान मंडळाने पाठवला आहे. त्याच प्रमाणे शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणुन नियुक्ती करण्यात आलेले सुनील प्रभूंची नियुक्ती पण रद्द करून भरत गोगावले यांना त्याजागी कायम करण्यात आले आहे. आमदारांच्या संख्याबळाच्या आधाराने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिंदे गटातील आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. ह्या निर्णयाविरुद्ध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांनी आक्षेप घेतला होता आणि तसे पत्र विधिमंडळाला २२ जून रोजी पाठवले होते.
एकीकडे नेमकी खरी शिवसेना कोणती हा वाद चालू असताना हा एक शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. आता एकनाथ शिंदे गटाचे व्हीप आदित्य ठाकरेसह शिवसेनेच्या १६ आमदारांना मानावे लागेल. तसे न केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला असेल.
या निर्णयाबद्दल बोलताना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ह्या निर्णयाविरुद्ध आपण न्यायालयात आव्हान देणार आहोत असे ते म्हणाले.
कोकण किनारपट्टीवर पुढील ५ दिवसांत मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस होणार आहे असे IMD (भारतीय हवामान खाते) ने जाहीर केले आहे.
ऑरेंज अलर्ट४ जुलै रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.५ जुलै रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.६ जुलै रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
यलो अलर्ट३ जुलै ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.४ आणि ५ जुलै मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.६ जुलै मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर.
Content Protected! Please Share it instead.