Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-includes/functions.php on line 6114
Konkan Blog - Page 31 of 172 - Kokanai

अखेर रेल्वेला आपली चूक उमजली, सामान्य वर्गातील प्रवाशांसाठी घेतला मोठा निर्णय

   Follow us on        




Indian Railway News: भारतीय रेल्वे अपग्रेड करण्याच्या आणि उत्त्पन्न वाढविण्याच्या नादात प्रशासनाला सामान्य वर्गातील प्रवाशांचा विसर पडला होता. मात्र उशिरा का होईना सरकारला आपली चूक उमजली आहे. रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नॉन एसी कोच निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे.
रेल्वे गाड्यांमधील वाढलेली प्रचंड गर्दी आणि जनरल कोचची कमी असलेली संख्या यामुळे सामान्य वर्गातील प्रवाशांची प्रचंड कुचंबना होत आहे. त्या संबंधाने मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. त्या लक्षात घेता  यातील ५३०० कोच जनरल राहणार आहेत, हे विशेष !गेल्या वर्षभरात सर्वच मार्गावर रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात रेल्वेकडून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गाड्यांमधील जनरल कोचची संख्या कमी केल्याने गरिब वर्गाच्या रेल्वे प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. एसीचे तिकिट काढून प्रवास करणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे ते जनरलच्या तिकिटा घेऊन गाडीत चढतात. जागा मिळेल तेथे बसून, उभे राहून प्रवास करतात. त्यामुळे अन्य प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे रेल्वे गाड्यात वाद होतात. त्याच्या तक्रारीही होतात अन् अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा केला जातो. हा सर्व प्रकार प्रवाशांसाठीच नव्हे तर रेल्वे अधिकाऱ्यांसाठीही मनस्तापाचा विषय ठरला आहे. तो लक्षात घेता रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नवीन कोच निर्माण करण्याची योजना तयार केली आहे. त्यात ५३०० कोच जनरलचे राहणार आहेत. असा आहे कोच निर्मितीचा आराखडा२०२४ -२५ मध्ये अमृत भारत जनरल कोच सह एकूण २६०५ कोच, १४७० स्लीपर आणि नॉन एसी कोच, ३२३ एसएलआर कोच, ३२ पार्सल व्हॅन आणि ५५ पॅन्ट्री कार तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे २०२५-२६ मध्ये अमृत भारत जनरल कोचसह २७१० कोचची निर्मिती केली जाणार असून, १९१० नॉन एसी स्लीपर, ५१४ एसएलआर कोच, उच्च क्षमतेच्या २०० पार्सल व्हॅन आणि ११० पॅन्ट्री कार निर्माण करण्याची योजना रेल्वेने बनविली आहे.




Loading

Facebook Comments Box

Konkan Railway | लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी वाढीव थांबे देण्यास रेल्वेचा नकार

कोकण रेल्वे सांतरण हॉल्ट ‘Staggering Halt’ या धोरणाचा अवलंब करत असून या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी या गाड्यांना स्थानकांवर आलटून पालटून काही मोजकेच थांबे देण्यात आले असल्याचे उत्तर एका निवेदनाला उत्तर देताना कोकण रेल्वेने सांगितले आहे. 
   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडी क्रमांक 01139/40 नागपूर मडगाव या विशेष द्विसाप्ताहिक गाडीला कोकण रेल्वे मार्गावर दिलेल्या थांब्याव्यतिरिक्त अन्य स्थानकांवर थांबे देण्यास असमर्थता दर्शविली आहे. ही गाडी कायमस्वरूपी करावी तसेच वाढीव थांबे मिळावेत अशी मागणी कोकण रेल्वेकडे आली होती. मात्र या गाडीची मुदतवाढ करणे, कायमस्वरूपी करणे किंवा थांबे देणे हे सर्व मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डच्या अधिकार कक्षेत येत असल्याचे सांगून कोकण रेल्वेने हात वर केले आहेत.
खान्देश, विदर्भ व कोकणाला जोडणाऱ्या या विशेष गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या गाडीला अतिरिक्‍त थांबे देवून ती कायमस्वरूपी करावी अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना, शेगांव यांनी देशाचे विद्यमान पंतप्रधान, केंदीय रेल्वे मंत्री, कोकण रेल्वे, रेल्वे बोर्ड तसेच संबधित लोकप्रतिनिधींना पोस्टल निवेदनातून केली होती. कोकण रेल्वे मार्गावरील वीर, आडवली, विलवडे, वैभववाडी रोड, नांदगाव, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी टर्मिनस येथे थांबेही देण्याची मागणी या निवेदनात केली होती. या निवेदनाचे उत्तर कोकण रेल्वेने दिले असून त्यात या गाडीची मुदतवाढ करणे, कायमस्वरूपी करणे किंवा थांबे देणे हे सर्व मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डच्या अधिकार कक्षेत येत असल्याचे सांगून कोकण रेल्वेने हात वर केले आहेत.
कोकण रेल्वे ‘Staggering Halt’ या धोरणाचा अवलंब करत असून या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी या गाड्यांना स्थानकांवर आलटून पालटून काही मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. आपण विनंती केलेल्या स्थानकात गरजेप्रमाणे थांबे या आधीच देण्यात आले आहेत. तसेच गणेश चतुर्थी, होळी आणि इतर हंगामात चालविण्यात येणाऱ्या विशेष गाडयांना या स्थानकांवर थांबे देत येत असल्याचेही या उत्तरात कोकण रेल्वेने नमूद केले आहे.
सावंतवाडीचा थांबा अजूनही पूर्ववत नाही.
या गाडीला सावंतवाडी स्थानकावर पूर्वी थांबा होता. मात्र या गाडीला प्रवासीसंख्या Footfall जास्त असुनही या गाडीचा थांबा काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीने ही गाडी महत्वाची  मानली जात आहे. कारण विदर्भातील आणि खान्देशातील पर्यटक या गाडीने कोकणात उतरत आहे. सावंतवाडी तालुका येथील लाकडी खेळण्यांसाठी तसेच रेडी, आंबोली या सारख्या पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध मानला जात असताना या गाडीला सावंतवाडी स्थानकावर थांबा असणे गरजेचे आहे.

Loading

Facebook Comments Box

सावंतवाडी – वेंगुर्ल्यात मायनिंग प्रकल्प? ग्रामपंचायतीला आलेल्या ‘त्या’ पत्रामुळे खळबळ

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जेएसडब्लू कंपनीने तळकोकणातील आजगाव ग्रामपंचायतीला पत्र देऊन खनिज उत्खननाच्या सोमवारपासून गावातील ८४० हेक्टर भागात सोमवार पासून ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आजगाव ग्रामपंचायत कडे गुरुवार दिनांक ४ जुलै २०२४ सायंकाळी सहा वाजता JSW (जिंदाल कंपनी )चे अधिकारी मायनींग संदर्भात पत्र घेऊन ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आले होते. त्यांनी आपण सोमवार पासून सर्व्हे सुरू करीत आहोत याची माहिती ग्रामपंचायत ला कळवीत आहोत असे सांगितले. सदरील पत्रात ८४० हेक्टर एवढी आजगाव ब्लॉक मधील जमीन महाराष्ट्र सरकार कंपनी ला मायनींग साठी देणार आहे ,त्यासाठी खनिज साठा किती आहे याची तपासणी करण्याबाबत चे हे पत्र आहे. त्या पत्रात असे नमूद आहे की, मायनींग साठी ड्रोन ने सर्व्हे करायची परवानगी कंपनी ला महाराष्ट्र सरकार ने तसेच जिल्हाधिकारी (कलेक्टर )सिंधुदुर्ग यांनी दिली आहे .आणि ते सोमवार दिनांक ८ जुलै ते ३० जुलै या कालावधीत ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार आहेत. मात्र या सर्व्हे साठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली नसल्याची माहिती आहे.

याआधीही येथे मायनींग विषयक चाचणी करण्याचे प्रयत्न झाले होते मात्र येथील स्थानिक ग्रामस्थांकडून त्याला विरोध केला गेला होता. मायनिंग मुळे या क्षेत्रातील जमिनीचे तसेच परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कारण संभाव्य खनिज क्षेत्रामध्ये ड्रिलिंग होणार असून भविष्यात याचे परिणाम धोकादायक असल्याचं सांगत ग्रामस्थांकडून विरोध केला जात आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता जर संबंधित खनिज प्रकल्पाला मान्यता दिल्यास तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. तसेच कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास करणारा प्रकल्प होऊ देणार नाही. परिणामी आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला त्यावेळी होता. आता पुन्हा मायनिंगसाठी प्रयत्न चालू झाल्याने येथील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

 

 

Loading

Facebook Comments Box

गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी: एसटी महामंडळाने एसटी आरक्षणाबाबत घेतला मोठा निर्णय.

   Follow us on        

मुंबई:कोकणातील सर्वात मोठा सण म्हणुन ओळखला जाणारा गणेशचतुर्थी सण अवघ्या दोन महिन्यांवर आला. यंदा गणेश भक्तांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यतः एसटीचे आरक्षण एक महिना अगोदर सुरू होते, मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा एसटी गाड्यांचे आरक्षण 60 दिवसआधी खुले करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

अॅप किंवा वेबसाईटवरुनही करता येईल बुकींग
कोकणातील अनेक चाकरमानी हे गावी जाण्यासाठी गणेशोत्सवासाठी वाड्या-वाड्यांचे एकत्रित आरक्षण करतात. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रवाशांना वैयक्तिक आरक्षणासह समूह आरक्षणही एकाच दिवशी करता येणार आहे. महामंडळाच्या आरक्षण केंद्रासह मोबाईल अॅप आणि महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवाशांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
कोकणासह राज्यातील सर्व विभागांमध्ये गणेशोत्सव काळासाठी नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण गुरुवारपासून खुले होणार आहे. सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. त्यासोबतच मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणाहून २ आणि ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यासोबतच गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway: सावंतवाडी स्थानकाच्या नामकरणासाठी शासनातर्फे सकारात्मक हालचाली सुरू….

   Follow us on        

मुंबई:कोकणरेल्वेच्या सावंतवाडी स्थानकाचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDT असे नामकरण करावे या कोकणकरांच्या मागणीला महाराष्ट्र शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या स्थानकाचे लवकरच नामकरण होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

या स्थानकाच्या नामांतराची मागणी झाली तेव्हा एखाद्या रेल्वे स्थानकाचे नामांतर करावयाचे झाल्यास त्या राज्यातील शासनाने रेल्वे विभागाला तशी शिफारस करणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून उत्तर आले होते. त्यानुसार कोकण विकास समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिनांक ०३ जून २०२४ रोजी निवेदन सादर करून शासनातर्फे तशी शिफारस करण्याची विनंती केली होती. सरकारतर्फे या निवेदनाची दखल घेतली गेली आहे. दिनांक २७ जून रोजी राज्य गृह (परिवहन) विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या नामकरणाबाबत लिखित स्वरूपात त्यांचे अभिप्राय सादर करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यावरून मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय मधु दंडवते यांच्याकडे जाते. सावंतवाडी स्थानकाचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDT असे नामकरण केल्यास त्यांच्या कार्याचा गौरव होईल यासाठी प्रयत्न चालू आहेत.

 

Loading

Facebook Comments Box

महत्त्वाचे: माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ; नियमांतही बदल

   Follow us on        

मुंबई:राज्यातल्या महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही अटी शिथिल केल्या आहेत. कोणते नियम शिथिल करण्यात आले आहेत. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. त्यानुसार महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. शिवाय जमिनीबाबतची अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहे.

या योजने अंतर्गत महिलांना दर महीना दिड हजार रूपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत, याची नियमावली सरकारने जाहीर केली होती त्यामध्ये आता काहीसा बदल केला गेला आहे. यातले काही नियम सरकारने शिथिल केले आहेत.

नव्या नियमा नुसार कोणात्या महिला पात्र? 

आता यातील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत.  त्यानुसार पात्र महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. जा महिलांचे वय 65 वर्षे आहे त्या महिलांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. पहिल्यांदा वयाची अट ही 21 ते 60 वर्षापर्यंत होती. त्यात आता बदल करण्यात आला असून ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षा पर्यंता आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवाय जमिनीची अटही शिथिल करण्यात आली आहे. ज्या महिलेकडे किंवी तिच्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असेल ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार होती. मात्र त्यातही आता बदल करण्यात आला आहे. जमिनीबाबतची अट आता वगळण्यात आली आहे. या योजनेत पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
सदर योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी 01 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत होता. आता हा कालावधी 2 महिने केला असून दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे निवेदन.. 👇🏻

Loading

Facebook Comments Box

… तर येत्या विधानसभा निवडणुकीत NOTA पर्याय वापरू- जनआक्रोश समिती सभेत कोकणकरांचा ईशारा

   Follow us on        

मुंबई :मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याच्या न पाळलेल्या तारखा, लोकप्रतिनिधींकडून मिळणारी पोकळ आश्वासने आणि नेहमीप्रमाणे पाहिल्याच पावसात महामार्गाची होणारी दयनीय अवस्था यामुळे वैतागलेला कोकणकर जनआक्रोश समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

रखडलेला महामार्ग पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. कोकणातील बहुतेक लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षात असूनही ही अवस्था आहे. केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री महाराष्ट्रातील असूनही ही परिस्थिती आहे. राज्य सरकारने जनतेला नको असलेले महामार्ग बनवण्याच्या अट्टहास धरला आहे. त्यांना मुंबई गोवा महामार्गाच्या परिस्थितीबद्दल देणे घेणे नाही. या सर्वांना वैतागून पुन्हा एकदा जनआक्रोश समिती आक्रमक झाली आहे. शनिवार दिनांक २९ जून रोजी समितीची निर्धार सभा मुंबई येथे पार पडली. या सभेत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या पूर्ततेसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले.

प्रशासनाला जागे करण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे २८ जुलै २०२४ रोजी जनआक्रोश समितीतर्फे होमहवन घालण्यात येणार आहे. तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. कोकणातील लोकप्रतिनिधी महामार्ग संदर्भात आवाज उठवीत नसल्याने त्यांच्या घरासमोर निदर्शन करून त्यांना जागे करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

निवडणुकीवर बहिष्कार टाकणे

लोकसभेला ३७००० कोकणकरांनी नोटाला मतदान केले. विधानसभेला देखील कोकणातील उमेदवार यांच्या विरोधात NOTA मतदान करण्यात येईल असा सज्जड इशारा देण्यात आला.

 

 

Loading

Facebook Comments Box

गणेशभक्तांना खुशखबर: तब्बल १५ स्लीपर असलेल्या विशेष गाडीला ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

    Follow us on        
Konkan Railway News: या वर्षी उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी एका गाडीची सेवा या वर्षीच्या ऑक्टोबर अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १५ स्लीपर डबे असलेली ही गाडी यंदा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना फायद्याची ठरणार आहे.
पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष गाडीची सेवा  दिनांक ३१ ओक्टोम्बर २०२४ पर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. या गाडीची सेवा दिनांक जून अखेरपर्यंत समाप्त होणार होती. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या गाडीचा ओक्टोम्बर अखेरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून दिनांक  दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती  मंगळुरू जंक्शनला  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५  वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल  ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.गुरुवार आणि सोमवारी रात्री २२:१०  वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३ :०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Loading

Facebook Comments Box

Traffic block at LTT: कोकण रेल्वेच्या २ दैनिक गाड्यांची सेवा महिनाभरासाठी पनवेलपर्यंतच

   Follow us on        
Konkan Railway News : लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरील आठ नंबर प्लॅटफॉर्म वरील पिट लाईनच्या दुरुस्तीसाठी एका महिन्याचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दिनांक ०१ जुलै ते ३० जुलै पर्यंत चालणार आहे. या ब्लॉक मुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन दैनिक गाड्यांची सेवा पनवेल स्थानकापर्यंत मर्यादित केली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 16346 – तिरुअनंतपुरम – एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस आणि 12620 – मंगुळुरु – एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन एक्सप्रेस गाड्यांची सेवा दिनांक ३०/०६/२०२४ ते ३०/०७/२०२४ पर्यंत पनवेल स्थानकावर संपविण्यात येणार आहे.
16345 एलटीटी – तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस आणि 12619  एलटीटी – मंगुळुरु मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाड्यांची सेवा पनवेल स्थानकापासून सुरु करण्यात येणार आहे. दिनांक ०१/०७/२०२४ ते ३०/०७/२०२४ पर्यंत 16345 एलटीटी – तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस दुपारी १२:५० तर 12619 एलटीटी – मंगुळुरु मत्स्यगंधा एक्स्प्रेस संध्याकाळी १६:२५ वाजता पनवेल स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावरील अजून एक गाडी आता एलएचबी कोचसहित धावणार; डब्यांच्या संख्येतही वाढ

   Follow us on        
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आणखी एक गाडी आता एलएचबी कोच सहित धावणार आहे. गाडी क्रमांक 12202 / 12201 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Kochuveli Garib Rath Express  ही गाडी उद्या दिनांक २३ जूनपासून एलएचबी कोचसहित चालविण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एलटीटी मुंबई ते कोचुवेली या मार्गावर धावताना गाडी क्रमांक (12202) दिनांक 23 जून 2024 च्या फेरीपासून तर कोचुवेली ते एलटीटी मुंबई  या मार्गावर धावताना गाडी क्रमांक (12201) दिनांक 24 जून 2024 च्या फेरीपासून या नवीन बदलासह चालवण्यात येणार आहे.
डब्यांच्या संख्येत वाढ 
या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला असून डब्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत ही गाडी थ्री टायर एसी – 11, एसी चेअर कार – 02 आणि जनरेटर कार – 02 असे मिळून एकूण १५ डब्यांची चालविण्यात येत होती. आता त्यात बदल करून थ्री टायर इकॉनॉमी एसी – 16, एसी चेअर कार – 02 आणि जनरेटर कार – 02 असे मिळून एकूण 21 एलएचबी डब्यांची चालविण्यात येणार आहे.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search